Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीलंकेतल्या नैसर्गिक आपत्तीतील जिवित आणि वित्त हानीबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त


श्रीलंकेत पूर आणि भू-स्खलनामुळे झालेल्या जिवित आणि वित्त हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

‘श्रीलंकेत पूर आणि भू-स्खलनामुळे झालेल्या जिवित आणि वित्त हानीबद्दल भारताला दु:ख होत आहे.

या संकटाच्या काळात आम्ही श्रीलंकेतील आपल्या बंधू-भगिनींसोबत आहोत.

मदत सामुग्री घेऊन आमची जहाजे रवाना करण्यात येत आहेत. पहिले जहाज उद्या सकाळी कोलंबोत पोहोचेल.

दुसरे जहाज रविवारी पोहोचेल. आणखी मदत येत आहे’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

S.Tupe/J.Patankar/D.Rane