Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चंडीगड येथील पीजीआयएमईआरच्या 34 व्या दीक्षांत सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

चंडीगड येथील पीजीआयएमईआरच्या 34 व्या दीक्षांत सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

चंडीगड येथील पीजीआयएमईआरच्या 34 व्या दीक्षांत सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

चंडीगड येथील पीजीआयएमईआरच्या 34 व्या दीक्षांत सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

चंडीगड येथील पीजीआयएमईआरच्या 34 व्या दीक्षांत सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

चंडीगड येथील पीजीआयएमईआरच्या 34 व्या दीक्षांत सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

चंडीगड येथील पीजीआयएमईआरच्या 34 व्या दीक्षांत सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

चंडीगड येथील पीजीआयएमईआरच्या 34 व्या दीक्षांत सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

चंडीगड येथील पीजीआयएमईआरच्या 34 व्या दीक्षांत सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण


आज जे आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत, ‘ते सर्व पदक विजेते आणि पदवी प्राप्त करणारे सहकारी’ व उपस्थित सर्व मान्यवर,

आज 11 सप्टेंबर आहे. 11 सप्टेंबर म्हटल्यानंतर फारसे काही लक्षात येत नाही, मात्र, 9/11 म्हटल्यानंतर ताबडतोब लक्षात येते, की इतिहासात या तारखेची कशा प्रकारे नोंद झाली आहे. हीच 9/11 आहे, ज्या दिवशी मानवतेला उद्ध्वस्त करण्याचा एक हीन प्रयत्न झाला. हजारो लोकांना मृत्यूच्या दारात लोटले आणि तीच 11 ही तारीख आहे आणि आजच PGI चे नवयुवक इतरांचे आयुष्य वाचवण्यासाठी समाजात पाऊल टाकण्यास सज्ज झाले आहेत.

एखाद्याला मारणे फार सोपे आहे. पण एखाद्याला जीवन द्यायचे असेल तर पूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. म्हणून त्या अर्थाने तुमच्या आयुष्यातही आज या 9/11 चे विशेष महत्त्व आहे. इतिहासाच्या दृष्टीने 9/11 चे आणखी एक महत्त्व आहे. 1893 मध्ये सुमारे 120 वर्षांपूर्वी, याच देशाच्या एका महापुरुषाने अमेरिकेच्या धर्तीवर पाऊल ठेवले होते आणि 9/11 च्या शिकागो येथील धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी व्याख्यान दिले होते. त्यांनी व्याख्यानाची सुरुवात, अमेरिकेतील बंधु आणि भगिनींनो (“Sister and Brothers of America”) अशी केली होती, या एका वाक्याने पूर्ण सभागृहात कित्येक वेळ टाळ्यांचा कडकडाट होता. त्या एका क्षणाने पूर्ण मानवजातीला बंधुभावाने जोडल्याची भावना निर्माण केली होती. हे एक वाक्य म्हणजे मानवतेसोबत प्रत्येक मानवी जीवन कशाप्रकारे उत्तुंग उंची गाठू शकते याचा संदेश होता. परंतु, 9/11,1893 चा स्वामी विवेकानंदांचा संदेश जर जगाने स्वीकारला असता, तर कदाचित दुसरे 9/11 घडले नसते. आणि याच पार्श्वभूमीवर मला आज चंडीगड पीजीआयच्या दीक्षांत सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. पीजीआयशी मी पूर्णपणे परिचित आहे. मी खूप वेळा याठिकाणी आलो आहे. माझ्या परिचयातील आजारी व्यक्तींना भेटण्यासाठी मी याठिकाणी येत होतो, कारण मी दीर्घकाळ चंडीगड येथे राहिलो आहे. ते माझे कार्यक्षेत्र होते. त्यामुळे मी पीजीआयशी पूर्णपणे परिचित आहे.

आजच्या समारंभात तुम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेले दृश्य पाहिले असेल, ते म्हणजे सरकारी शाळांमधील वंचित मुलांची उपस्थिती. माझा एक आग्रह असतो की, मला ज्याठिकाणी दीक्षांत सोहळ्यासाठी जाण्याची संधी मिळते, त्याठिकाणी त्या शहरातील गरीब वस्त्यांमधील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना कार्यक्रमासाठी बोलवावे. ते जेंव्हा पदवीदान सोहळ्याचा कार्यक्रम पाहतील तेंव्हा त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण होईल. एक आत्मविश्वास निर्माण होईल, “की कधीकाळी आम्हीपण याठिकाणी असू”.

या पदवीदान सोहळ्याच्या दोन बाबी म्हणजे, एक ज्यांनी हे शिक्षण पूर्ण करून जीवनाच्या एका नव्या वाटचालीस सुरूवात केली आहे आणि दुसरे जे आज या पावलांवर चालण्याचा संकल्प करुन आज येथून जातील. एका शिक्षकाच्या शिकवणीपेक्षा दृश्याचा मनावर होणारा परिणाम फार मोठा असतो. म्हणून माझा आग्रह असतो की, गरीब कुटुंबांतील मुले अशाप्रकारच्या सोहळ्यासाठी उपस्थित असली पाहिजेत. आणि म्हणूनच मी पीजीआयचा आभारी आहे की त्यांना माझा हा विचार रुचला आणि या छोट्या-छोट्या मुलांना आज या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी दिली. एका अर्थाने ते आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणेच आहेत.

दीक्षांत सोहळ्यानिमित्त मला आणखी दोन शब्दांचा उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे की ज्यावेळी हा दीक्षांत सोहळा होतो, त्यावेळी आपल्या मनात हा तर विचार येत नाही ना, की हा शिक्षांत सोहळा आहे. नाहीतर, हा विद्यांत सोहळा आहे? जर आपल्या मनात हा विचार येत असेल की हा शिक्षांत सोहळा वा विद्यांत सोहळा आहे तर खऱ्या अर्थाने हा दीक्षांत सोहळा होऊ शकत नाही.

हा शिक्षांत सोहळा नाही. शिक्षण संपत नाही. हा विद्यांत सोहळा नाही, हा विद्या उपासनेचा अंतकाळ नाही. हा दीक्षांत सोहळा आहे. आपल्या मानवी इतिहासाकडे नजर टाकल्यास आपल्या लक्षात येते की, सुमारे 2500 हजार वर्षापूर्वी सर्वात प्रथम दीक्षांत सोहळा झाला होता. याबाबतचा लिखित उल्लेख आढळून येतो. 2500 हजार वर्षापासूनची ही परंपरा आहे. तैत्रेयी उपनिषदात सर्वात प्रथम दीक्षांत सोहळ्याची चर्चा झालेली आहे. अशाप्रकारचा सोहळा ही 2500 हजार वर्षापासून चालत आलेली घटना आहे. आपल्या देशातूनच ही संस्काराची प्रक्रीया सुरू झाली आहे.

ज्यावेळी दीक्षांत सोहळा होतो, त्यावेळी काही क्षणासाठी वाटते, “चला आता खूप झाले,” किती दिवस त्याच शवविच्छेदन गृहात (पोस्टमार्टम रुममध्ये) काढले. चला आता सुटी झाली. प्रयोगशाळांमध्ये किती वेळ जात होता आणि आमचे साहेब लोकही किती त्रास द्यायचे. रात्री-अपरात्री कामावर बोलवत होते. रुग्णाला साधा खोकलाही आलेला नसतो, पण आम्हाला सांगायचे “बघा जरा यांना काय होत आहे ते”. तुम्हाला वाटतंय की या सगळ्या जाचातून सुटका झाली. पण खरी परिस्थिती अशी आहे की, तुम्ही जे शिकला आहात, समजला आहात, अनुभवले आहे त्याची आता खरी कसोटी सुरू झाली आहे. एखाद्या प्राध्यापकाने तुमची घेतलेली चाचणी, आणि त्यानंतर मिळालेले गुण, त्यामुळे मिळालेले प्रमाणपत्र आणि जीवन जगण्यासाठी खुला झालेला रस्ता, येथेच ही बाब संपत नाही. एका अर्थाने आता प्रत्येक क्षणी कसोटी सुरू होते. आतापर्यंत तुम्ही रुग्णाला पाहत होता ते एका विद्यार्थ्याच्या नात्याने, त्‍यावेळी रुग्ण कमी आणि अभ्यासाचे मॉडेल म्हणून जास्त अशा भावनेतून तुम्ही त्याकडे बघायचे. पुस्तकांमध्ये लिहिलेले असायचे की एवढा पल्स रेट असेल तर असे होते. त्यावेळी आम्हाला रुग्णाची आठवण पण नसायची, त्याची नाडीचे ठोके लक्षात राहायचे नाही. प्राध्यापकांनी सांगितले की “अरे जरा याच्याकडे पाहा तर पुन्हा पुस्तकात पाहावं लागायचं. त्याच्या नाडीचे जे होईल ते होवो, पण आम्ही पुस्तकात पाहून म्हणायचो अरे, हे काय झाले.” आपण अशाप्रकारे आतापर्यंत इथला काळ घालवला. परंतु आता जेंव्हा आम्ही रुग्णाचे नाडीपरीक्षण करण्यासाठी हात पकडू तेव्हा पुस्तक लक्षात येणार नाही. एक जिवंत व्यक्ती तुमच्यासमोर बसला आहे. त्याचे नाडीचे ठोके खाली वर झाले तर तुमच्या काळजाचे ठोकेही खाली वर होणार. इतके तुम्ही एकरुप होऊन जाता. पुस्तकांच्या विश्वातून बाहेर प्रत्यक्ष पडून आयुष्याशी जोडण्याची संधी आजपासून तुम्हाला मिळत आहे.

आणि तुम्ही डॉक्टर आहात, मेकॅनिक नाही. एक मेकॅनिकही आपले कामकाज मशीन व यंत्रांच्या सहाय्याने करतो. आजकाल डॉक्टरही आपला व्यवसाय मशीनच्या सहाय्याने करतात. सर्व स्पेअर पार्टसची त्यांना माहिती असते. तंत्रज्ञानामुळे प्रत्येक स्पेअर पार्टचे काम काय आहे, हे सांगितले आहे. तरीसुद्धा आपण एका मशीनसोबत कारभार नाही करु शकत. आपण जिवंत व्यक्तीवर इलाज करत असतो, म्हणून केवळ पुस्तिका ज्ञान पुरेसे नाही. प्रत्येक घटकाच्या अडचणींसंदर्भात केवळ ज्ञान असून पुरेसे नाही, तर मानवी संवेदनांचा सेतू जोडणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. यशस्वी डॉक्टरांचा जरा इतिहास चाळून पाहा, आजारावर लक्ष केंद्रीत करणारे डॉक्टर फार यशस्वी होत नाहीत. मात्र, रुग्णावर लक्ष केंद्रीत करणारे डॉक्टर जास्त यशस्वी झालेले दिसून येतील. जो केवळ आजारावर लक्ष केंद्रीत करतो, तो ना रुग्णाला बरं करतो ना स्वत:च्या आयुष्यात यशस्वी होतो. परंतु, जो रुग्णावर लक्ष केंद्रीत करतो, त्याची मानसिक अवस्था जाणून घेतो, त्याची परिस्थिती समजून घेतो, गरीबातील गरीब रुग्ण असेल तर, माहित नाही आपली फी देईल की नाही. पण डॉक्टरने जर रोगाऐवजी एका गरीब रुग्णाकडे पाहिले तर 20 वर्षानंतर का होईना तो गरीब रुग्ण मजूरी करुन डॉक्टरची फी परत करेल. कारण, तुम्ही रोगाला नाही तर रुग्णाला जवळ केले होते. आणि जर का एकदा तुम्ही रुग्णावर प्रेम केले तर त्याच्या रोगाविषयीची कारणंही तुम्हाला कळतील.

आजकाल वैद्यकशास्त्र तंत्रज्ञानाने ओतप्रोत भरले आहे. तंत्रज्ञान-प्रणित वैद्यकशास्त्र आहे. आज एखादा रुग्ण आला तर डॉक्टर चार प्रश्न विचारून औषध देत नाही. तर, प्रथम रक्तचाचणी, नंतर, मूत्रचाचणी करावयास सांगतो. तंत्रज्ञानाने रुग्णाची चिरफाड करुन, सर्व गोष्टी कागदावर टाकतो. त्यानंतर तुम्ही असे म्हणता की, ठीक आहे, आता तुम्ही असे करा, ते जे लाल औषध आहे ते दे, हे दे, ते दे, असे आपल्या कंपाऊंडरला सांगता. डॉक्टरांना निर्णय घेण्यासाठी इतक्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्याच्याकडे खूप वस्तू उपलब्ध आहेत. थोडासाही अनुभव डॉक्टरला तज्ज्ञ बनण्यास मोठी ताकद देतो. जेंव्हा मी ऐकतो की, पीजीआय एक तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणारी (डिजीटल इनिशिएटीव) संस्था आहे. याचा अर्थ तुम्ही सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडलेले डॉक्टर आहात. जर तुम्ही सर्वात अद्ययावत अशा तंत्रज्ञानाने जोडलेले डॉक्टर आहात, तर तुमच्यासाठी आता रुग्णांना समजून घेणे, त्याचे आजारपण ओळखणे, त्याचा रोग बरा करणे यासाठी तंत्रज्ञान तुमच्या मदतीला आहे.

हे जे परिवर्तन घडून आले आहे, त्यामुळे पूर्ण वैद्यक शास्त्रात कशाप्रकारे परिवर्तन घडून येईल. मला पूर्ण विश्वास आहे की येथे तुम्ही जे शिक्षण घेतले आहे..हे ही समजले पाहिजे की आपण डॉक्टर झालात, आम्हाला डॉक्टर कोणी बनवलं? आम्ही खूप हुशार आहोत, प्रवेश चाचणीत चांगले गुण मिळाले होते. त्यावेळी आमची शिकवणी फार चांगली होती. यामुळे आम्ही डॉक्टर बनलो आहोत? आम्ही यासाठी डॉक्टर बनलो आहोत का, 5 वर्षे, 7 वर्षे जेवढा काळ इथे आम्हाला घालवायचा होता, तो आम्ही खूप चांगल्या पद्धतीने घालवला, यासाठी डॉक्टर बनलो आहोत? जर आपण असा विचार करत असू, तर ती आपली विचारसरणी अपूर्ण आहे, आमचे विचार अपूर्ण आहेत.

आम्हाला डॉक्टर बनण्यासाठी एखाद्या वॉर्डबॉयची पण महत्त्वाची भूमिका असेल. परीक्षेच्या काळात रात्री उशिरापर्यंत चहा विकणाऱ्याला जाऊन म्हटला असाल“ मित्रा, रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा आहे, उठून जरा चहा दे”. तो म्हटला असेल“साहेब, थंडी खूप आहे, जरा झोपू द्या,”. तुम्ही त्यावर म्हणाला असाल-“नाही रे चहा दे उद्या परीक्षा आहे.” आणि त्या गरीब व्यक्तीने, झाडाखाली झोपलेल्या व्यक्तीने झोपेतून उठून चहा तयार करुन तुम्हाला दिला असेल. त्यानंतर रात्री तुम्ही पुन्हा दोन तास अभ्यास केला असेल आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा दिली असेल आणि काही गुण मिळवले असतील. त्या चहावाल्याचे यात काही योगदान नाही का?

म्हणूनच आपण जे काही होतो, ते आपल्या एकट्यामुळे नाही. त्यात समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तींचे काही ना काही योगदान असते. आपल्या आयुष्यातील बदलासाठी प्रत्येकाने काही ना काही भूमिका निभावलेली असते. एकंदरीत सारांश असा की- आपण सरकारमुळे डॉक्टर झालो असे नाही तर आपण समाजामुळे डॉक्टर झालो आहोत. आणि समाजाच्या या कर्जाची परतफेड करणे ही आमची जबाबदारी आहे.

तुमच्यापैकी बहुतकांचे पारपत्र तयार असतील. बहुतेकजण व्हीसासाठी अर्जही करुन आले असतील. परंतु, हा देश आमचा आहे. आज आम्ही जे काही आहोत, त्यासाठी कोणत्या ना कोणत्या गरीब व्यक्तीची हक्काची वस्तू त्याच्यापासून घेऊन आम्हाला दिली असेल. त्यामुळेच तर आम्ही इथपर्यंत पोहचलो आहोत. म्हणून आयुष्यात काहीही निर्णय घ्या. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे

“माझ्या आयुष्यातील निर्णय वा सरकारचा कोणताही निर्णय असो- चूक वा बरोबर याविषयी संभ्रम वा द्विधाअवस्था असेल तर एका क्षणासाठी समाजातील शेवटच्या व्यक्तीला आठवून पाहा, जरा त्याचा चेहरा नजरेसमोर आणू, आणि मग ठरवू हे त्याच्या कल्याणासाठी आहे किंवा नाही”. तुमचा निर्णय खरा ठरेल. मी पण तुम्हाला आज एक आग्रह करतो, दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने तुम्ही आयुष्यातील एक फार मोठी जबाबदारी घेत आहात. मात्र, तुम्ही अशा एका व्यवस्थेशी जोडलेले आहात, एका क्षेत्राशी जोडलेले आहात, की आजपासून तुम्ही फक्त तुमच्या आयुष्याबाबतच निर्णय घेऊ शकत नाहीत. तुम्ही समाजजीवनाची जबाबदारी सांभाळण्याचाही निर्णय करत आहात. आणि म्हणूनच आयुष्यात कधी संभ्रम निर्माण झाला तर हे करु की ते करू अशी अवस्था झाली तर क्षणभर कोणत्या ना कोणत्या गरीब व्यक्तीने तुमचे आयुष्य सफल बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली असेल. कोणीतरी तुमची काळजी केली असेल, तुमच्यासाठी काही ना काही काम केले असेल. क्षणभरासाठी त्याची आठवण करा आणि मग आपण योग्य करत आहोत की चुकीचे करत आहोत, याबाबत निर्णय घेणे तुम्हाला सोपे जाईल. आणि जर अशाप्रकारे निर्णयप्रक्रीया राहिली तर भारताला कधीच अडचणींतून जाण्याची वेळ येणार नाही.

सर्वांगीण आरोग्यसेवा ही आपल्या देशाची निरंतर परंपरा आहे. आज जगात एक फार मोठा बदल घडून आला आहे सर्वांगिण आरोग्यसेवेचा व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा. याबाबतीत लोकांमध्ये जाणीव जागृती होत आहे. आपण नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. कधी कोणी विचारही केला नसेल की संयुक्त राष्ट्रसंघटनेचे सदस्य असलेले सर्व 193 देश या उपक्रमाला पाठिंबा देतील. 193 देश सह-प्रायोजक बनून शंभर दिवसांच्या आत संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय योग दिनाचा निर्णय घोषीत करेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना आहे. हे कसे शक्य झाले? हे शक्य झाले कारण पूर्ण विश्व वैद्यक शास्त्राकडून आणखी भरपूर काही मागणी करत आहे. औषधोपचारांवर जीवन जगण्यापेक्षा त्यांना सुदृढ शरीर, उत्तम आपल्या आरोग्याची काळजी आहे. जन-मन बदलत आहे.

रोगावर लक्ष केंद्रीत करायचा काळ आता राहिला नाही. आता आरोग्यावर लक्ष केंद्रीत करायची वेळ आली आहे. आम्ही रोगावर लक्ष केंद्रीत करु की आरोग्यावर लक्ष केंद्रीत करु? आता आम्हाला एका व्यापक विचारांमार्फत पुढे गेले पाहिजे. ज्यात केवळ रोगावर लक्ष केंद्रीत करायचे नाही तर आरोग्यावर लक्ष केंद्रीत करुन, आम्ही हे लोककल्याणासाठी करणार आहोत. हे आपल्या लक्षात आले तर लोक योगाकडे का आकर्षित झाले आहेत, ते समजेल. आणि त्या अर्थाने योगाच्या माध्यमातून पूर्ण जग प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, सर्वांगिण आरोग्यसेवा, कल्याणाकडे पावले टाकत आहे.

कधी-कधी मला वाटते की आमचे जे डॉक्टर आहेत, ते यशस्वी डॉक्टर बनण्यासाठी चांगले योग शिक्षक असणे फार आवश्यक आहे. तुम्ही पाहिले असेल की, तुमची फिजिओथेरेपी आणि योग यात कमालीचे साम्य आहे. जर फिजिओथेरेपीचा कोर्स करताना योगाचाही अभ्यास केला तर तो कदाचित उत्कृष्ट फिजिओथेरेपिस्ट बनू शकेल.

सांगायचे तात्पर्य हे की, समाजजीवनात फार मोठे परिवर्तन घडून येत आहे. लोकांना औषधं नको आहेत. त्यांना औषधांच्या दुष्परिणामांच्या (साईड इफेक्टसच्या) चक्रात अडकायचे नाही. ते रोगापासून निरोगीपणाकडे जाऊ इच्छितात. म्हणून आरोग्य क्षेत्राला या सर्व बाबी लक्षात घेऊन आगामी धोरणं आखावी लागणार आहेत. मला खात्री आहे, की आपल्यासारख्या विद्वान लोकांकडून हे होऊ शकते.

आज या दीक्षांत सोहळ्यातील सर्व मान्यवर ज्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे, त्यांना माझ्याकडून विशेष शुभेच्छा. काही जण यापासून वंचित राहिले असतील, त्यांनी निराश होण्याचे काही कारण नाही. कधी कधी अपयश हेच यशासाठी मोठा शिक्षक ठरते. म्हणून ज्यांनी असे ठरवले असेल की, हे मिळवायचे, हे बनायचे, काही जणांना शक्य झाले नसेल त्यांनी निराश होण्याचे काही कारण नाही. त्यांनी विश्वासाने पुढची वाटचाल करावी. जे असफल ठरले आहेत व ज्यांनी आपल्या आयुष्यात नवीन शिखर गाठले आहे, त्या सर्वांना माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा. तुम्ही आज ज्या पदावर आहात, तिथून तुम्हाला केवळ रुग्णांवर उपचार नाही तर येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही तयारी करुन घेण्याची संधी मिळेल. माझी इच्छा आहे की, तुमच्याकडून एक संवेदनशील डॉक्टर तयार होईल. आपणाकडून हे संपूर्ण आरोग्यक्षेत्र…कारण की सामान्य व्यक्तीसाठी तुम्ही ईश्वराचे अवतार आहात. सामान्य व्यक्ती डॉक्टरांना देव मानतो. कारण त्याने देव तर पाहिला नाही पण कोणी त्याचे आयुष्य वाचवले तर हाच देव आहे, असे तो मानतो.

तुम्ही कल्पना करा की, तुम्ही ज्या क्षेत्रात आहात जेथे सामान्य व्यक्ती तुम्हाला देवाच्या रुपात पाहतो आणि तीच तुमची प्रेरणा आहे. तीच तुमच्या आयुष्याची ऊर्जा आहे. या ऊर्जेकडे लक्ष ठेवूनच पुढची वाटचाल करू. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. खूप-खूप धन्यवाद.

S. Thakur/N. Sapre