प्रश्न –सर, तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा आहे ?
पंतप्रधान – अच्छा, पूर्णा मला हे सांग, एवरेस्टवरून खाली आल्यानंतर तुझे मित्रमंडळी तुझ्या सोबत कसे वागतात ? तुला खुप मोठे मानून तुझ्यापासून दूर पळतात, असे तर होत नाही ना ? कसे होते ? मोठे झाल्यावर खूप अडचणी येतात, बेटा ! तुझे सारे मित्र तुझ्याबरोबर पूर्वीसारखीच मैत्री कायम ठेवतात ? नाही ठेवत .
बेटा तुझा प्रश्न फारच महत्वाचा आहे की, माझ्या जीवनावर कुणाचा जास्त प्रभाव राहिलेला आहे ? तसे जीवन कुणा एका व्यक्ती मुळे बनत नाही. आपण जर ग्रहणशील बुद्धीचे असलो, तर सर्व गोष्टींना ग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करतो, ही प्रक्रिया निरंतर चालते. लोक आपल्याला काही ना काही देत जातात. कधी कधी रेल्वे मधून प्रवास करतांना दोन तासाच्या दरम्यान एक-दुसरी गोष्ट शिकावयास मिळते. अशा तऱ्हेने, माझा तर स्वभाव अगदी लहानपणा पासूनच जिज्ञासू राहिला. गोष्टींना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, जिज्ञासा होती. त्याचा फायदा पण मला मिळाला. दुसरे म्हणजे,माझ्या सर्व शिक्षकांप्रती मला आपुलकी होती. माझ्या कुटुंबामध्येही माझी आई, वगैरे माझी खूप काळजी घेत होत्या. परंतु ; लहानपणी गाव खूपच छोटे होते. कुठल्याच गतिविधी होत नसत, तेव्हा वेळ कसा घालावयाचा, तेव्हा आम्ही ग्रंथालयामध्ये जात असू. माझ्या गावामध्ये एक चांगले ग्रंथालय होते, त्यातील पुस्तके-सुद्धा छान होती. तेव्हा मला स्वामी विवेकानंदाविषयी वाचण्याची संधी मिळाली आणि मग त्यातच जास्त वेळ मग्न राहण्यात मला आनंद मिळत होता. मला असे वाटते कदाचित त्या, पुस्तकांनी आणि त्यांच्या जीवनाने माझ्यावर जास्त प्रभाव पाडला.
धन्यवाद !
प्रश्न – सर मला एक यशस्वी नेता बनायचे आहे आणि राजकारणामध्ये योगदान दयायचे आहे. तर मला माझ्या व्यक्तिमत्वामध्ये असे कोणते विशेष गुण आणि गुणवत्ता जपावी लागेल ?
पंतप्रधान – देशात एक जी राजकीय जीवनाबद्दल बदनामी झाली आहे, त्यामुळे लोक घाबरतात, की येथे तर आपण जाऊ शकत नाही, गेलेच नाही पाहिजे, चांगल्या लोकांचे तेथे काही काम नाही. यामुळे देशाचे नुकसान होत आहे. आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये आहोत. राजकारण-राजकीय व्यवस्था-राजकीय पक्ष हे सर्व त्याचाच महत्वपूर्ण भाग आहेत. राजकारणामध्ये चांगले लोक आले पाहिजे, जीवनातील वेगवेगळया क्षेत्रातील, सर्व क्षेत्रातील लोकांनी आले पाहिजे, हे देशासाठी अत्यावश्यक आहे. आणि तेव्हाच आपले राजकीय आयुष्य अत्यंत समृद्ध बनेल. तुम्ही बघत असाल, महात्मा गांधीनी जेव्हा स्वतंत्रता आंदोलन चालवले, तेव्हा सर्वच क्षेत्रातील लोकांनी या आंदोलनात सहभाग घेतला, आणि याच कारणांमुळे या स्वतंत्रता आंदोलनाची ताकद खूप मोठी होती, पूर्ण आंदोलनाच्या शब्दांचे सामर्थ्यच खूप मोठे होते.आणि, याचमुळे जितक्या जास्त प्रमाणात चांगले लोक येथे येतील, तितक्या जास्त प्रमाणात देश कल्याणामध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहणार आहे. जर तुम्हाला राजकारणामध्ये प्रवेश करायचा असेल, तर तुम्हाला नेतृत्वगुणाची भूमिका पार पाडावी लागेल. ज्याप्रकारे तुम्ही ऑल्मिपियाडमध्ये विजयी झालात, म्हणजेच नेतृत्वगुण तुमच्यात असतील म्हणूनच तुम्ही ते करू शकलात. जरा विचार करा, तुमच्या गावामधल्या शाळेत एखादी घटना घडली, तर सर्वप्रथम तुम्ही तेथे पोहचता का ? प्रयत्न करा आणि तसे आपण तेथे पोहचलात, तर लोकांना वाटायला लागते की, ही तर गेली तेथे, चला आपण पण जाऊ या म्हणजेच तुमच्या मधील नेतृत्वगुण हळू-हळू प्रस्थापित होतील.तुम्हाला पण असा विश्वास वाटेल, की चला मी दहा लोकांना घेऊन जाते, वीस लोकांना सोबत घेऊन जाते. नेतृत्वगुणाची गुणवत्ता सोपी असते, तिची निर्मिती केली जाऊ शकते दुसरे म्हणजे, नेता कशासाठी बनायचे, याबाबत स्पष्टता असली पाहिजे निवडणूक लढण्यासाठी, सत्ता प्राप्त करण्यासाठी,खुर्ची मिळवण्यासाठी की ज्या समाजामध्ये आपण जगतो त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी? त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी हे करायचे असेल तर त्यांच्या प्रती आपल्याजवळ आपुलकी असली पाहिजे, त्यांच्याविषयी इतके प्रेम पाहिजे की, त्यांचे दु:ख आपल्याला झोप विसरवेल आणि त्यांचे सु:ख आपल्या सुखापेक्षा अधिक चांगले होवो ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत नेता बनणे अवघड आहे. आणि यासाठी तुम्ही स्वत:ला विचारा, की हे आपण कोणत्या प्रकारे करू शकतो का ? जेव्हा तुम्ही हे करू शकता तेव्हा तुम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही. आपोआप, देश तुम्हाला नेता बनवून टाकेल.
ऑल दि बेस्ट !
प्रश्न – पंतप्रधान महोदय, डिजिटल इंडिया हा एक अभिनव कार्यक्रम आहे, परंतु भारताच्या अनेक ठिकाणी वीज पोहचतच नाही तर कसे शक्य होईल ?
पंतप्रधान – डिजिटल इंडियाबद्दल तुम्ही बोलता परंतु पुष्कळ ठिकाणी वीजच नाही असा प्रश्न तुम्ही विचारला. तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी आताच 15 ऑगस्टला लालकिल्ल्यावर बोललो होतो, की, आपल्या देशात 18,000 गाव असे आहेत, जेथे वीज नाही, मी आतापर्यंत आपल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या दोन-तीन बैठका घेतल्या आहेत. येत्या 1000 दिवसामध्ये 18,000 गावांमध्ये वीज पोहचवायची आहे, यासाठी मी त्यांच्या मागेच लागलो आहे.तेव्हा आपण कामाबद्दल बोलत आहात, ते पूर्ण करण्याच्या दिशेने आता प्रयत्न केले जात आहेत. दुसरे म्हणजे, जर वीज नसेल तर डिजिटल ॲक्टिव्हिटी प्रक्रिया थांबत नाही. ते सोलर-प्रणालीद्वारे सुद्धा केले जाऊ शकते आणि आपण डिजिटल इंडियापासून अलिप्त राहु शकत नाही. ते आपल्या आयुष्याचा एक भाग बनत आहे. आणि आपल्याला जर आपला वेग वाढवायचा असेल. पारदर्शकता,आणायची असेल, सु-प्रशासनाच्या दिशेने जायचे असेल तर ई-गर्व्हनसचा उपयोग करणे आवश्यक आहे. सामान्य माणसासंबंधी त्यांच्या सर्व गोष्टी हातातल्या मोबाइलमध्ये का असु शकत नाही ? एक प्रकारे सक्षमीकरण मोहिमच डिजिटल इंडिया हा कार्यक्रम आहे.हा कोणता गाजावाजा असलेला कार्यकम नाही की आपल्या देशात इतके मोबाइल आहेत की नाहीत. हे अभियान सामान्य माणसाला सक्षम करण्यासाठी आहे आणि यामध्ये विजेचा कधीच अडथळा येणार नाही. असे स्वप्न आहे की, 2022 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करेल, तेव्हापर्यंत प्रत्येक घरी 24 x 7 वीज असली पाहिजे.वीज तर मधे-मधे जातच राहते ना, दिल्लीला अनुभव आहे, जनरेटर ठेवावे लागते. तेव्हा त्यापासून मुक्ती मिळाली पाहिजे.यावर मी काम करत आहे, तेव्हा आपणास जे वाटते, ते होईलच.
प्रश्न – तुम्हाला कोणता खेळ आवडतो ?
पंतप्रधान – हे बघा, जेव्हा जो कोणी खेळामध्ये प्रगती करतो, त्यातल्या त्यात मुली जेव्हा प्रगती करतात, तेव्हा मी असे म्हणतो की, यामध्ये त्यांच्या आईची भूमिका खूप मोठी असते, आईला असे वाटते की, जेव्हा मुलगी मोठी होत असते, तेव्हा तिने स्वयंपाक-घरात मदत केली पाहिजे, प्रत्येक कामामध्ये मदत केली पाहिजे, पण ती हे सर्व न सांगता म्हणते जा बेटा तु खेळायला जा प्रगती कर. आईने केलेला त्याग खरोखच फार मोठा आहे. ईश्वराने हिला शारिरिक क्षमतेमध्ये काहीतरी कमतरता दिली आहे तरीसुद्धा या मुलीने ही कामगीरी केली आहे. मी तिच्या शिक्षकांचे विशेषत: अभिनंदन करतो. त्याने या बालकाच्या रूपात किती वेळ खर्च केला असेल, तेव्हा, सोनियामध्ये इतकी हिंमत आली असेल.
मी शिक्षकांना व सोनियांना सुद्धा शुभेच्छा देतो.आता तिने मला विचारले की, तुम्ही कोणता खेळ खेळता ? आता राजकारणातील लोक काय खेळतात हे सर्वांना माहित आहे. पण, मी एका सामन्य छोटया गावामध्ये राहत होतो. आजकालच्या खेळाची नावेसुद्धा आम्ही त्यावेळी ऐकली नव्हती, त्यामुळे असा प्रश्नच उद्भवत नव्हता.आमची कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा अशा प्रकारची नव्हती. झाडावर चढणे, लटकणे, उडया मारणे असेच आमचे खेळ असायचे. बहुतेकदा आम्ही कबड्डी-खोखो सारखे खेळ शाळेत खेळायचो. मला माझे कपडे हातानेच धुवावे लागत असत, मी तलावावर जात असे, त्याच कारणाने मला पोहणे आले.आणि तो माझा छंद बनला, खुप वेळपर्यंत मी तलावात पोहत असे, ते माझ्या सवयीचा भागच बनले. अजुन पुढे गेल्यानंतर, योग विश्वाशी नाते जुळल्यानंतर त्याच्यात मला आवड निर्माण झाली. माझे एक शिक्षक होते. परमार साहेब, आता काठे आहेत ते तर मला माहित नाही, त्यांना शोधण्याचा मी प्रयत्न केला तरी ते मला सापडले नाहीत ते कदाचित बडोदयाजवळील बांद्रा येथील रहिवाशी आहेत. माझ्या गावात ते शारिरिक शिक्षणाचे शिक्षक होते. आणि त्यांनी एका जुन्या व्यायामशाळेला पुर्नजिवित केले होते. मी तर सकाळी पाच वाजेपासूनच त्या व्यायामशाळेत जात असे आणि मल्लखांबाचा सराव करत असे. परंतु, स्पर्धेत जाण्यासाठीची लागणारी क्षमता माझ्यात नव्हती. पण, आपल्याला जसे माहित आहे की, आपल्या देशातील गावांमध्ये त्याप्रकारचे खेळ होत नाही, पण भारतातील प्रत्येक मूल असे असतेच, जे क्रिकेट खेळत नसले तरी कमीत-कमी जेथे क्रिकेट खेळले जाते, तेथे बसून राहते.त्यांचा चेंडू बाहेर गेल्यास तो उचलून देतो अशी सेवा मी पुष्कळदा करायचो.सोनिया तुझे खूप-खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !
प्रश्न – कचरा व्यवस्थापनामधील भारताची असंघटित स्थिती लक्षात घेता सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे. सर, स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करत असतांना, तुम्हाला कोणत्या आव्हानांना आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे ?
पंतप्रधान – जेव्हा मी हा विचार मांडला होता तेव्हा असे वाटले होते, की खूप आव्हाने आहेत. पण आता असे नाही वाटत. हे याकरिताच नाही वाटत की, जर 8 वी, 9वी इयत्तेत विद्यार्थी कचरा व्यवस्थापनावर एखादे अॅप बनवत असतील आणि जगात पारितोषिक मिळवत असतील, तर याचाच अर्थ माझा देश स्वच्छच राहणार. हे स्वच्छ भारत अभियान, प्रामुख्याने आपल्या स्वभावाशी निगडीत आहे. जर आपण, अस्वच्छतेला दूर करण्याचा स्वभाव विकसित केला तर स्वच्छता आपोआपच ठेवता येईल. मला तर आज-काल किती लोक भेटतात आणि सांगतात, आमच्या घरात 3 वर्षाचा आमचा नातू आहे, तो कचरा फेकू देत नाही आणि मोदी-मोदी असे म्हणतो. मी येथे हे सांगू इच्छितो की, सामान्यपणे सरकार जेव्हा कोणताही कार्यक्रम घेऊन येते किंवा एखादा नेता जेव्हा त्या कार्यक्रमाविषयी बोलतो, तेव्हा विरोधीपक्ष तर सोडाच पण इतर लोक पण त्याची टेर उडवायला लागतात. त्यांना त्रास दयायला सुरूवात करतात, हे नाही झाले ते नाही झाले हा एक कार्यक्रम असा आहे, ज्याचे सर्वजण समर्थन करत आहेत. आपण तर बघितलच असेल की, प्रसार माध्यमांतील लोकांनी याला कसे पुढे नेले आहे. आपल्या कमाईचा विचार सोडून स्वच्छतेसाठी ते कॅमेरा घेऊन जातात आणि कोणी कचरा फेकला तर त्याची मुलाखत घेऊन त्याला घाबरवतात. दुसरी बाजू आहे व्यवस्थेची,ही गोष्ट खरी की, कचरा व्यवस्थापनाच्या शिवाय अंतिम उपाय आपणास मिळू शकत नाही. काही सरळ सोपे उपाय आहेत, समजा एक छोटे शहर आहे, त्याच्या पाच किलोमीटरच्या क्षेत्रात काही गावे आहेत, जर त्या गावातील गांडुळ आणून शहरातील कचऱ्यांच्या जागी टाकले आणि त्या गांडूळामार्फत बनणाऱ्या खताची जर विक्री केली तर, शहर पण स्वच्छ राहील आणि गावाला सुद्धा उत्पन्न मिळेल. अधिक सोप्या पद्धतीने या गोष्टींना जोडता येते, छोटे-छोटे प्रयोग करून आपण वेस्ट चे वेल्थ मध्ये रूपांतर करू शकतो. वेस्ट हा स्वत: एक मोठा उद्योग आहे. मोठा व्यापार आहे. व्यावसायिक कचरा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये पुष्कळजण येत आहे. आणि आमची पण, अशीच इच्छा आहे की, सरकारला तिथे व्हॉयबिलीटी गॅप फंडिंग दयायची आहे, तेथे ती देऊन या कामाला पुढे नेणे. नगरपालिकांना, महानगरपालिकांना प्रोत्साहित केले जात आहे. गावांमध्ये पण हीच गोष्ट मुख्य असते. ती म्हणजे पाण्याचा निचरा, अस्वच्छ पाणी एकदा आपण मार्गी लावले,तर ही समस्या उद्भभवत नाही. बाकी गोष्टी तर आपण आपल्या शेतात टाकु शकतो, ज्या आपोआप खतांमध्ये रूपांतरित होतात. तर आपल्या देशात वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया वृत्ती दिसून येतात. त्याला लक्षात घेऊन , सरकारतर्फे पुष्कळ योजनेचा आरंभ केला आहे, त्यांना अर्थसंकल्पात तरतूद पण केली जात आहे.त्याचा परिणामही बघावयास मिळत आहे.तुमचे हार्दिक अभिनंदन,तुम्ही एक चांगले कार्य केलेत.
प्रश्न – खुप साऱ्या विद्यार्थ्यांना अभियंता, डॉक्टर वगैरे होण्यासाठी संगणकाद्वारे घेतल्या जाणाऱ्या तीन तासाच्या परिक्षेत नैपुण्य दाखवणे हाच शिक्षणाचा एकमेव हेतु झाला आहे, यासाठी ते त्यांचे शालेय जीवन, त्यांचे बालपण आणि जिज्ञासा याची आहुती देतात सर, तुम्ही त्यांना कोणता संदेश दयाल आणि ही स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काणती पाऊले उचलणार आहात?
पंतप्रधान – अनमोल तू इतका लहान आहेस आणि आता जो चित्रपट दाखवला त्यामध्ये तर तू सुद्धा एक अभियंता बनु इच्छितो.कोणी तरी तुझ्यावर दबाब टाकला असेल ना ? अच्छा, तुला शिक्षक त्रास देतात का ? हे कर, ते कर, तुला तर अशी बुद्धिमत्ता आहे, असे होते का ? आणि घरी काय म्हणतात ? घरात पण असेच म्हणत असतील की तू, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर गोष्टीत वेळ वाया घालवतो, तु तुझे डोके एकाठिकाणी लाव, असे सांगत असतील, वडील काय करतात ? नोकरी करतात, की उद्योगधंदा?
हे बघा, आपल्या आई-वडिलांचा असा एक स्वभाव असतो, की जे कार्य त्यांना करण जमले नाही, ते आपल्या मुलांमार्फत करवून घेण्याची त्यांना इच्छा असते, ही गोष्ट खरी आहे. जे वडील स्वत: डॉक्टर बनू शकले नाही,ते मुलांच्या मागे लागतात तू डॉक्टर बन, डॉक्टर बन ही सर्वात मोठी समस्या आहे. खरच, मी एक परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करीत आहे, जे येणा-या दिवसामध्ये कदाचित घडेल.
तुम्ही बघत असाल, की आपल्या येथे शाळांमध्ये चारित्र्याचा दाखला-प्रमाणपत्र देतात, जेव्हा शाळा सोडण्याचा दाखला मिळतो, तेव्हा त्या सोबत हे चारित्र्य प्रमाणपत्रसुद्धा मिळाले असेल. सर्वांजवळ हे चारित्र्य प्रमाणपत्र असेल आणि जे कारागृहात आहे, त्यांच्या जवळ सुद्धा हे असेल.
जो फासावर लटकला, त्याच्या घरामध्येसुद्धा शाळेचे चारित्र्य प्रमाणपत्र पडलेले आढळेल. याचा अर्थ असा की, असाच हा कागद वाटला जातो, हा एक विधी म्हणुन पाळला जातो. तेव्हा मी विभागाला असे सुचविले की, चारित्र्य प्रमाणपत्राऐवजी, क्षमता-कौशल्य प्रमाणपत्र दिले जावे. दर तीन महिन्यांनी एका सॉफ्टवेअरमार्फत मित्रांनी ते भरुन घेतले पाहिजे, की हा तुझा मित्र आहे, त्याच्यात अशी कोणती विशेष गोष्ट आहे? तो शिस्तप्रिय आहे का ?वेळेचे पालन करतो का? इत्यादी, मित्रांसोबत ज्या ज्या चांगल्या गोष्टी तो करतो, ते ते लिहा. त्याच्या आई-वडीलांनीसुद्धा हे भरले पाहिजे. शिक्षकांनी चहुबाजुंनी त्याच्याविषयी माहिती एकत्र केली पाहिजे. परिणामी, जेव्हा त्यांच्याबद्द्लच्या तीन- चार विशेष गोष्टींची माहिती त्याच्या आई-वडीलांना दिली पाहिजे,यामुळे त्याला जीवनाची दिशा ठरवण्यासाठी खूप सहकार्य मिळेल. हे एक परिवर्तन आहे, कठिण काम आहे. पण, ते घडविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.यावर आता विभागसुद्धा पुष्कळ कार्य करत आहे. त्यामुळे ही अडचण दूर होणार आहे.
दुसरे म्हणजे आपल्याला असे वाटले की, हे केल्यानंतरच आपली कारकीर्द-भविष्य घडेल. असे नाही आपण कधी छोटे कार्य घेऊन-सुद्धा खूप काही करू शकतो. आपण स्वत:च काही प्राप्त करू शकतो तरी सुद्धा आपण केवळ पदवी आणि व्यवसायाच्या पलिकडे विचार करत नाही. सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा पदवी आणि नोकरी सोबत जोडली जाते, तेव्हा ही समस्या राहते. आपण स्वत:ला मोकळे सोडून,मला कविता लिहायच्या आहेत, तरी मी कविताच लिहणार, असे समजावून पुढे काय होईल ते बघून घेऊ, असे वागावे.तुम्ही स्वत:मध्ये रममाण होऊन जाल. तुम्हाला चित्र कलेचा छंद आहे, तुम्ही ते करत रहाल, तुम्ही आयुष्यात कधी-ना-कधी इतके समाधान प्राप्त कराल की, अजुन कोणतीही गोष्ट तुम्हाला एवढे समाधानी करू शकत नाही. यासाठी, या तीन तासाच्या परिक्षा व त्याचे परिक्षण, त्याचा निकाल या सर्वांमधून बाहेर निघून स्वत:ला ओळखणे, ओळखून मार्ग निश्चित केल्यास फायदा होईल, असे मी मानतो. अनमोल तुला खूप खूप शुभेच्छा: खूप प्रगती कर.
प्रश्न – सर, मला माझ्या भारत देशासाठी काम करायचे आहे. मी माझ्या देशाची सेवा कोणत्या प्रकारे करू शकतो ? तुम्ही मला काय करावे, यासाठी सल्ला देऊ शकता का ?
पंतप्रधान – हे पहा, तू आता जे केले आणि आता जे करत आहे, ती देशाची सेवाच आहे. काही लोकांच्या मनात असे असते की, देश सेवा करणे म्हणजे, सैन्यात जाणे, राजनेता बनणे, निवडणूक लढणे. असे नाही.देशसेवा आपण छोटया-छोटया गोष्टींमधून सुद्धा करू शकतो. एक मुलगा आपल्या घरातील विजेचे बील 100 रूपये येते म्हणून, विनाकारण सुरू असलेले दोन पंखे, दोन-दिवे जर बंद करत असेल, तर 100 रू ऐवजी 90 रू येईल. माझ्या मते, ही पण एक प्रकारची देशसेवा आहे.देशाची सेवा करणे म्हणजे खूप मोठी-मोठी गोष्टी करणे होत नाही. आपण जेवण करतो, आणि कधी कधी ते तसेच टाकून देतो-उरवतो. ते वाया जाते. आता मला सांगा, की जितके लागेल तितकेच जर जेवणासाठी घेतले तर ती देशाची सेवा नाही तर काय आहे ? ती देशसेवा आहे. आपण आपल्या वृत्तीमध्येच, आपल्या सामन्य वागणूकीमधून देशाचे काही नुकसान तर करत नाही ना, याविषयी एक समज घालून दिला पाहिजे, मी माझ्या वेळेच्या शक्तीचा उपयोग, देशासाठीच करत आहे का ? तुम्हीच बघा, मी स्कुटर चालू केली आणि इतक्यात फोन आला आणि मी घरात पळून फोन घ्यायला गेलो. बाहेर स्कुटर तशीच चालू आहे, पेट्रोल जळत आहे.पेसे तर तुमचेच जात आहे, पण देशाचेही पैसे वाया जात आहे. खुप साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या सोप्या पद्धतीने केल्यास आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो. आपण थोडे शिक्षित तरी आहोत,आपल्या घरी कपडे धुणारी कोणी बाई येत असेल तर मी तिच्या सोबत बसून तिला निदान अर्धा तास तरी काही शिकवणार, असे आपणास वाटायला पाहिजे.माझ्या मते, आपल्यापेक्षा मोठया असणाऱ्या आपल्या घरात काम करणाऱ्या बाईला आपण लिहिणे, शिकवले,ती शिक्षित-साक्षर झाली तर ते तुम्ही केलेल्या देशसेवेमध्ये एक महत्वाचा भाग बनेल. लोकांमार्फत छोटया-छोटया देश-हितासंबंधी केलेल्या या कार्याशिवाय कोणतीच देशभक्ती असू शकत नाही. ितुम्ही हे कराल ?
धन्यवाद.
प्रश्न- सर, आजचा तरुण वर्ग शिक्षकी पेश्याला किफायतशीर व्यवसाय म्हणून का नाही स्वीकारत? आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की भारतात चांगल्या शिक्षकांची कमतरता आहे. सर, तुम्ही आजच्या सर्वात चांगल्या तरुण वर्गाला शिक्षकी पेशाकडे कसे आकर्षित कराल आणि उद्याचे शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन् बनण्यासाठी त्यांना कसे प्रेरीत कराल?
पंतप्रधान – असे नाही की देशात चांगले शिक्षक नाहीत. आजही देशात खूप चांगले शिक्षक आहेत आणि आजही आपण… आज देश पाहत असेल; या मुलांसोबत मी बोलत आहे. ही ती हुशार मुले आहेत ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे आणि त्यांच्या शिक्षकांनी तो ओळखला आणि त्या शिक्षकांनी त्यांच्या आयुष्याला आकार दिला आणि त्याचा परिणाम हा आहे की या लोकांनी आपापल्या क्षेत्रात देशाला फार मोठा सन्मान दिला आहे. या मुलांच्या माध्यमातून मी शिक्षकांना पाहत आहे. ज्यांनी या मुलांना तयार केले आहे. याचा अर्थ असा की आजचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना देखील अशी प्रेरणा देतो की आम्ही पण काही करू शकतो आणि शिक्षकांनाही प्रेरणा देतो की आपणही आपल्या एखाददुसऱ्या विद्यार्थ्याला असे तयार करू शकतो. हा आजचा ५ सप्टेंबरचा शिक्षक दिनाचा कार्यक्रम खरच एक अनोखा कार्यक्रम बनला आहे आणि प्रत्येकाजवळ काहीना काही देशासमोर गौरव देणारे असे आहे. माझी अशी इच्छा आहे की शिक्षकी पेशा पिढयांना घडविण्याचे काम आहे. जसे शिक्षकी व्यवसायात चांगले लोक आहेत, चांगले लोक येत आहेत पण आपण अजून एक काम करू शकतो; सामाजिक जीवनात ज्यांनी कामगिरी केली आहे, असे लोक आठवड्यातून एक तास… जास्त मी म्हणत नाही… आठवड्यातून १ तास किंवा एका वर्षात १०० तास, ते विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी देऊ शकतात. डॉक्टर असो, वकील असो, इंजिनिअर असो, न्यायाधीश असो, आपण काही दुसरे शिकवून येऊ. पण हे लोक जे खरोखरच आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत, ते जर जातील आणि ठरवतील की मी येथे राहतो, माझा व्यवसाय येथे आहे; वर्षातले १०० तास अमुक एका शाळेत आठवीच्या वर्गातल्या मुलांसोबत घालवेन यावर्षी; तुम्ही बघाल शिक्षणात एक नवीन ताकद येऊ शकते. एका व्यवस्थेतून शिक्षक तयार झाला असे नाहीये. कुठूनही ते करू शकतो. जर आपण देशात ही सवय लाऊन घेतली आणि माझी इच्छा आहे देशात अशाप्रकारची जी लोकं माझे विचार ऐकत आहेत, त्यांनी देखील ठरवावे की आठवड्यातून एक तास किंवा एका वर्षात १०० तास कोणत्याही एका निश्चित शाळेत जाईन, स्वत: शिकवीन, त्यांच्याशी बोलेन, तुम्ही पहा कसा बदल घडतो आणि आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही. फक्त त्याला थोडा मार्ग दाखवायचा आहे. आत्मिक तुला शुभेच्छा तब्येत कशी असते आता तुझी? तुझी वैद्यकीय चाचणी नियमित होते? तुला काही अडचण तर नाही ना?
प्रश्न- तुम्हाला काय वाटते की एखाद्या विद्यार्थ्यासाठी यशस्वीतेची काय कृती असू शकते?
पंतप्रधान- हे बघा, यशस्वीतेची काही कृती असू शकत नाही आणि असूही नये. ठाम असले पाहिजे की अपयशी व्हायचेच नाहीये आणि जे असे ठरवतात कधी ना कधी यश त्यांच्या पायाशी येते. एक समस्या असते जास्त करून लोकांमध्ये की एकप्रकारे जर एखादे अपयश आले, तर ते अपयश त्यांच्या स्वप्नांची स्मशानभूमी बनून जाते. अपयशाला कधीच स्वप्नांची स्मशानभूमी बनू दिले नाही पाहिजे. खरतर अपयशाला आपण स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आधार बनविले पाहिजे. एक पाया अवलंबिला पाहिजे आणि जो अपयशातून शिकतो तोच यशस्वी होतो. जगात कोणी अशी व्यक्ती असू शकत नाही की ज्याला कधीच अपयश आले नाही, आणि फक्त यशच यश मिळाले, त्यामुळे अपयशाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यशासाठी खूप महत्वाचा असतो. तुम्हाला मी एक पुस्तक वाचण्याचा सल्ला देतो, १९१३ मध्ये बहुदा हे पुस्तक लिहिले गेले होते आणि कदाचित जगातील सर्व भाषेत या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे. Pollyanna असे पुस्तकाचे नाव आहे. त्यामध्ये सर्व गोष्टींना सकारात्मक पद्धतीने कसे पहायचे हा दृष्टीकोन दिला आहे; खूप छोटे पुस्तक आहे.६०-७० पानांचे पुस्तक आहे. तुम्ही तर एकदम पटकन वाचून पूर्ण कराल आणि तुम्ही शाळेत त्या पुस्तकावर एक खेळ खेळू शकता. Pollyanna पुस्तकातून प्रत्येक घटनेला पाहून तुम्ही सांगू शकता की याचा अर्थ काय आहे. प्रत्येक गोष्टीतून अर्थ काढू शकता.तुमच्या शाळेत खेळाचे निमित्त बनू शकते हे पुस्तक. तर मी आग्रह करेन की तुम्ही सर्व मुलांनी ते पुस्तक वाचायला हवे, ज्यात सकारात्मक विचारांसाठी खूप चांगले मार्गदर्शन केलेले आहे आणि म्हणून मी म्हणतो की याला पाककृतीसारखे या चार गोष्टी घाला, हे सकाळी करा, एक दिवस संध्याकाळी करा, मग यश मिळेल; अशी कोणतीही कृती असू शकत नाही. म्हणून आपल्या मनाची रचना अशी हवी की आम्हाला अपयशी व्हायचे नाही.
कधी पहिले असेल आपण की कोणी व्यक्ती ड्रायव्हिंग शिकतो आणि शिकल्यानंतर एखादवेळी गाडी घेऊन जातो आणि एक छोटासा अपघात होतो, तर घाबरून जातो. मग आयुष्यभर गाडीला हात लावत नाही. मग तर तो कधीच ड्रायव्हर बनू शकणार नाही. काही लोक विचार करतात की मला पोहायला शिकायचे आहे, पण पाण्यात उडी घेणार नाही. जर तुम्ही पाण्यात उडी नाही मारली, तर तुम्ही जलतरणपटू कसे होणार? तर पहिली गोष्ट ही की स्वत:ला झोकून द्यावे लागते. तुम्ही झोकून दया, यश कधी न कधी मिळेल. यशाला काळाच्या मर्यादेत नका बांधू. यशाची कोणतीही फुटपट्टी नका बनवू. समजा तुम्ही १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत गेलात आणि तुम्ही १०व्या क्रमांकाने जिंकलात; जगाच्या नजरेत तुम्ही अपयशी झालात. पण तुम्ही मागच्या वेळी चार मिनीटात स्पर्धा पूर्ण केली असेल, आणि यावेळी तीन मिनीटात स्पर्धा पूर्ण केली, म्हणजे तुम्ही यशस्वी आहात. गोष्टींना कसे पाहता त्यावर आहे. जर तुम्ही हे केलेत तर मी नाही मानत की अपयश कधी तुमच्याजवळ येईल आणि तुम्ही तर स्वत: नेते आहात. आता झारखंडचे नेते इथे बसले आहेत, मी त्यांना सांगतोय की अंशिकाचे नाव लिहून घ्या, चार वर्षांनी ही नेता बनेल.
प्रश्न- तुम्ही जेव्हा विद्यार्थी होता, तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीने भुरळ घातली होती? तुमचे वर्गातील शिक्षण की वर्गाबाहेरील उपक्रम ?
पंतप्रधान – मी अभ्यासात… जास्तकरून मी बाकीचेच उद्योग करत असायचो. काही मित्रांच्या, काही कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी बराच वेळ जायचा. पण निरीक्षण करण्याचा माझा स्वभाव होता. मी गोष्टींना बारकाईने पाहायचो, समजायचो आणि ते केवळ वर्गात नाही तर वर्गाबाहेरही असायचे. मी संधी शोधत राहायचो. जेव्हा १९६५चे युद्ध झाले, आम्ही तर लहान होतो, तर आम्ही आमच्या गावातील लोक, आमच्या गावापासून दूर दुसरे स्टेशन होते, जिथून सैनिक जाणार होते, त्यांच्यासाठी मिठाई वैगेरे घेऊन जात होते; तर आम्ही पण गेलो, पहिल्यांदा आम्ही काही पाहिले की हे तर वेगळेच जग आहे, हे सगळे बघा मरायला जात आहेत, देशासाठी प्राण द्यायला जात आहेत. अशा गोष्टी बघायला लागलो तेव्हा मनात आले की आपण जिथे आहोत त्याबाहेर पण मोठे जग आहे. तर अशाच गोष्टींमधून हळूहळू शिकायचा प्रयत्न करायला लागलो. पण ही गोष्ट खरी आहे की वर्गात आपल्याला प्राधान्य ठरविण्याची एक समज मिळते, ध्येय ठरविण्याची समज मिळते. बाकी सर्व गोष्टी आपल्याला त्याला आधार बनवून शोधाव्या लागतात. आपल्याला आपली प्रवृत्ती विकसित कारावी लागते आणि माझे बहुदा बाहेर लक्ष जास्त होते आणि कदाचित त्यानेच मी घडलो. असे मला वाटते. धन्यवाद.
प्रश्न- सर्वांना माहित आहे की तुम्ही एक काव्यसंग्रह लिहिला आहे, ज्याचे नव आहे ‘ आँख आ धन्य छे’- आपले डोळे धन्य आहेत. साहित्यामधील तुमची रुची कशी वाढली?
पंतप्रधान – तुम्ही कुठून, आसाम मधून आहात? अच्छा दिल्लीत राहता. मग आसाम आणि बंगालमध्ये तर कला मोठ्या प्रमाणावर आहे. ही गोष्ट खरी असणार की इथे सर्वजण असतील, जितके विद्यार्थी आहेत… तुमच्यापैकी कोण आहे ज्यांनी कविता लिहिल्या आहेत? कधी एखादी ओळ, दोन ओळी, किती आहेत? जरा हात वर करा बरं. पहा, पुष्कळ आहेत. म्हणजे प्रत्येकामध्ये कवितेचा वास असतो. प्रत्येक माणसामध्ये. काही लोकांची कविता लेखणीतून ओसंडते. काही लोकांची कविता अश्रुंमधून येते, तर काही लोकांची कविता अशीच अंतर्मनात सामावून जाते. तर या गोष्टी देवाने दिलेल्या असतात. हे असे नाही की कोण्या एकाला या दिल्या जातात. कोणी त्याला जरा सजवते, जपते. मी जे लिहिले आहे त्याला कविता म्हणण्याची माझी आता तयारी नाही. पण दुसरे काही म्हणू शकत नाही, म्हणून कविता असे म्हणावे लागत आहे. आता जसे दोन चाके असेल, एक फ्रेम असेल, सीट असेल, तर लोक म्हणतील सायकल आहे. जरी चालत नसेल तरी सायकलच म्हणतील. तर अशाच माझ्या रचना आहेत, त्यांना एकदम कवितेच्या तराजूमध्ये तोलण्याने त्या कविता म्हणून मानल्या जाव्यात अशा तर नसतील. पण माझ्या मनात जे भाव येतात, मी पहिलेच सांगितलं माझा निरीक्षणाचा स्वभाव होता, निसर्गासोबत अधिक जोडलेलो राहायचो, त्याच गोष्टींना कधीतरी कागदावर उतरवायचो. अजून एक, मी कधी विचारही केला नव्हता, पण आमच्या गुजरातच्या साहित्य जगतातील एक मोठे व्यक्ती होते, ते माझ्या मागे लागले आणि त्यांच्या आग्रहावरून त्या छापल्या गेल्या; छापल्यावर जगाला कळाले की हा हे देखील काम करतो. काही विशेष कारण नाही. जाता-जाता जगाला पाहायचो, अनुभवायचो, तेव्हा स्वत:ची अभिव्यक्ती कागदावर व्यक्त करायचो. त्याचेच तर पुस्तक आहे. आता तर कदाचित आणखी काही भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे. तुम्ही पाहिले आहे ते पुस्तक? ऑनलाईन पण उपलब्ध आहे. ऑनलाईन माझी सर्व पुस्तके उपलब्ध आहेत, तुम्ही ऑनलाईन त्यांना पाहू शकता. धन्यवाद.
प्रश्न- आम्ही तुम्हाला जेव्हाही सार्वजनिकरीत्या भाषण करताना पाहतो, आजही, तुम्ही कधीच लेखी भाषण वापरत नाही, जे आम्हाला खूप प्रेरीत करतं. सर, मला जाणून घ्यायचे आहे की तुम्ही वक्तृत्वावर प्रभुत्व कसे मिळविले ?
पंतप्रधान – आता तू बोलातीयेस न… छान बोलत आहेस. तुला वक्तृत्व येतं? बघा, चांगल्या वक्तृत्वासाठी सगळ्यात पहिले गरज आहे, तुम्ही चांगले श्रोता झाले पाहिजे. जर तुम्ही खूप चांगले श्रोते आहात आणि खूप चांगल्या पद्धतीने ऐकता; म्हणजे फक्त कानांनी नाही, डोळे, विचार सर्व गोष्टी जर सहभागी आहेत, तर हळूहळू तुम्ही ग्रहण कराल आणि तुम्ही सहज… तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढू लागेल. अच्छा हे करतात, तर मी पण करू शकतो. हा करू शकतो, मी पण करू शकतो.
दुसरे, ही चिंता नका करू की कोणी काय म्हणेल. बहुतेक लोक या गोष्टीला घाबरतात की उभा राहीन, माईक नाही चालू झाला तर काय होईल, माझा पाय घसरेल… चिंता नका करू. जास्तीत जास्त पहिल्या वेळी दोन लोकं हसतील, हसू दया, त्यात काय इतकं. हा आत्मविश्वास हवा.
तिसरे, टिपण काढायची सवय हवी. आपल्या आवडीचे जे विषय आहेत, त्याबाबत कुठेही काही वाचलं तर लिहून घ्यायला हवं. टिपण तयार होत जाईल. मग जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा ते टिपण तुमच्या ज्ञानासाठी खूप मदतगार असेल आणि या गोष्टी वाचाल-बोलाल तर उच्चारण जमेल. वक्त्यांची दुसरी एक अडचण असते की त्यांना जे सांगायचे आहे ते सांगायला खूप वेळ लावतात आणि तोपर्यंत लोकांचे लक्ष उडून जाते. हे सुधारण्यासाठी जर लिहिण्याची सवय लाऊन घेतलीत की तुम्हाला जे म्हणायचे आहे ते दोन वाक्यात सांगाल तर चांगले राहील. मुद्देसूदपणा येईल आणि हे सरावाने होऊ शकते.
मी हे सर्व नाही केले कारण माझ्याकडे काही काम नव्हते तर मी बोलायचो तर बोलून टाकले. असंच आहे. पण पद्धतशीर करायचे असेल तर. दुसरे, या दिवसात तुम्ही तर गुगल गुरुचे विद्यार्थी आहात; तर सार्वजनिक भाषणांचे खूप अभ्यासक्रम चालतात त्यावर. तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. तुम्ही यू-ट्यूब वर जाऊन जगातील कित्येक मान्यवर लोक आहेत, त्यांची भाषणे उपलब्ध आहेत. ते थोडे पाहिले पाहिजेत. तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की हो, आपण पण काही करू शकतो, आपण पण बोलू शकतो. मी कागद यामुळे नाही ठेवत की जर मी तो ठेवला तर गडबड होते; म्हणून मी ठेवत नाही स्वत:जवळ. धन्यवाद.
प्रश्न- आजकाल विद्यार्थ्यांवर खूप दबाव असतो, इंजिनिअर अथवा डॉक्टर बनण्यासाठी. आम्ही आमच्या पालकांना कसे समजावू की जर तुमच्या पालकांनी देखील तुमच्यावर असा दबाव टाकला असता, तर कदाचित आज या देशाला तुमच्यासारखा अद्भुत पंतप्रधान नसता मिळू शकला. काय सांगू इच्छिता याबाबतीत ?
पंतप्रधान – हे बघा, माझ्या नशिबात तर ते नव्हते. कदाचीत मी शाळेत लिपिक जरी झालो असतो तर माझ्या आई-वडिलांसाठी तो मोठा उत्सव असता. त्यांच्यासाठी असा आनंद असता की चला मुलगा मोठा माणूस झाला. त्यामुळे मी डॉक्टर बनावे की इंजिनिअर बनावे ही स्वप्न पाहण्याची परिस्थिती नव्हती, क्षमता नव्हती, ती अवस्था नव्हती. पण मी या मताशी सहमत आहे की आईवडिलांनी आपली स्वप्ने आपल्या मुलांवर थोपू नयेत. तुम्ही जेव्हा तुमची स्वप्ने मुलांवर थोपता, तेव्हा त्याचा अर्थ असतो की तुम्ही तुमच्या मुलांना ओळखत नाही. न त्यांची क्षमता जाणता, न त्यांचा स्वभाव जाणता, कारण तुम्ही लक्ष नाही दिले आणि वडील तर माहित नाही इतके काय व्यस्त असतात, त्यांना वेळच नसतो. कधी पाहुणे येतात तर मुलाला बोलावून तू कितवीत आहेस, आठवीत… हो.. माझी मुलगी आठवीत शिकते. असंच करतात वडील. त्यांना माहित नसतं. माझा एक मुलगा आठवीत आहे, एक सातवीत, एक पाचवीत आहे. ते इतके आपल्या जगात व्यग्र असतात आणि मग ते म्हणतात की तू डॉक्टर बन, इंजिनिअर बन. म्हणून आईवडिलांना आपल्या मुलांसोबत वेळ घालवायला हवा. त्यांना विचारात राहिले पाहिजे, तुला काय वाटतं, तुला काय आवडतं? आणि जे आवडतं त्यात त्याला मदत करायला हवी. तर यश खूप सहज मिळेल. लादल्यामुळे नाही मिळणार आणि त्यामुळे तुझी चिंता स्वाभाविक आहे. मी तुझ्या आईवडिलांना जरूर संदेश देईन की जर तुला पत्रकार व्हायचे आहे तर तुला जरूर मदत करावी. धन्यवाद.
प्रश्न- नुकताच आपण जागतिक योग दिन साजरा केला. भारताने संपूर्ण विश्वाला योगाचे धडे दिले, ज्याला तुम्ही पुन्हा एकदा गौरव प्राप्त करून दिला आहे. सर, याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तुमच्या मनात हा विचार कसा आला ?
पंतप्रधान – खरंतर मी खूप वर्षांपूर्वी, जेव्हा मी मुख्यमंत्री पण नव्हतो, कधी पंतप्रधान पण नव्हतो. ऑस्ट्रेलिया सरकारच्या निमंत्रणावर मी तिथे गेलो होतो आणि मी आश्चर्यचकित होतो की ज्यालाही माहित पडायचे की मी भारतीय आहे तर तो मला योगाबद्दल विचारायचा आणि ऑस्ट्रेलियाचे कदाचित १० पैकी ६ लोक असतील जे मला योगाबद्दल विचारायचे. मी आश्चर्यचकित होतो की त्यांच्यापैकी काही लोकांना योगांची नावेही सांगता यायची आणि खूप उत्सुकतेने. तेव्हा मला वाटले की एक अशी ताकद आहे ज्याला आपल्याला ओळखायला हवे. मी सर्वांना सांगत राहायचो, पण माझे म्हणणे तितकेसे लोक मनावर घेत नव्हते. मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी संयुक्त राष्ट्र संघात जाऊन विषय मांडला आणि त्याला देशाने, जगाने असेच समर्थन दिले. कदाचित संयुक्त राष्ट्र संघात असा एकमेव प्रस्ताव आहे, ज्याला फक्त १०० दिवसात मान्यता मिळाली आणि जगातील १७७ देश त्याचे सह-प्रायोजक बनले, अशी भूतकाळात एकही घटना नाही. म्हणजे योगाचे किती महत्व आहे हे आपल्याला नाहीत नव्हते, जितके जगाला माहित आहे.
दुसरे असे की, 21 जूनला मी पाहिले की आपल्या माध्यमांमधून अशा काही गोष्टी आल्या की 21 जून तारीख का ठेवली? मी आज पहिल्यांदा सांगतो. आपल्यासाठी उर्जेचा सर्वात मोठा स्रोत सूर्य आहे आणि 21 जूनला आपल्या जमिनीवर, संपूर्ण पृथ्वीवर तर नाही पण आपल्या भू-भागावर 21 जून सर्वात मोठा दिवस असतो. सूर्य सर्वात जास्त काळ असतो. आपल्याला उर्जा सर्वाधिक त्यादिवशी मिळते आणि म्हणून मी २१ जून सुचविले होते, जे जगाने मान्य केले आणि आज तर पूर्ण विश्व. मी मानतो की भारतातील तरुण जर योगाला एक व्यवसाय बनवतील तर संपूर्ण विश्वात चांगली योग शिक्षकांची मागणी आहे. खूप मोठी आर्थिक उलाढाल देखील आहे. पवित्र आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. तणावमुक्त आयुष्यासाठी खूप उपयोगी आहे आणि तुम्ही बुद्धिबळ खेळता? बुद्धिबळाचा एक गुण आहे, त्याची सगळ्यात मोठी ताकद असते, संयम, धैर्य. बाकी सर्व खेळात उत्तेजन असते, यात संयम असतो आणि बालकांच्या मनासाठी बुद्धिबळाच्या खेळाने संयम या गुणाचा विकास होतो. योगाचा देखील हाच स्वभाव आहे, जो तुमच्या आतील शक्तींना ताकदवान करतो. तर आता जगाने त्याला स्वीकारले आहे, आता आपणा सर्वांची देखील जबाबदारी आहे की आपण याची तीव्रता कमी होऊ नाही दिली पाहिजे आणि जे खरे योग आहे त्याचा परिचय जगाला होईल, ही भारताची जबाबदारी आहे. धन्यवाद.
प्रश्न- तुमची पेहरावाची विलक्षण समज आम्हाला खूप आवडते. तुम्ही जणू भारतीय कपड्यांचे व रंगांचे विशेष दूत आहात. “मोदी कुर्ता” खूप प्रसिद्ध झाला आहे. तर, जगभरात भारतीय कपड्यांचा प्रचार करण्याबाबतची कल्पना तुमच्या मनात कशी आली?
पंतप्रधान – हे पहा, बाजारात काही भ्रम आहेत की मोदींचा कोणी फॅशन डिझायनर आहे आणि मी पाहिले, मी तर आश्चर्यचकित झालो काही फॅशन डिझायनर सुद्धा स्वत:च दावा करतात की आम्ही मोदींचे फॅशन डिझायनर आहोत. आता आम्ही प्रत्येक प्रश्नांची उत्तरे कुठे देत बसणार, आम्ही कधी बोलत नाही, पण ना मी कोण्या फॅशन डिझायनरला ओळखतो ना कोण फॅशन डिझायनरला भेटलो आहे. आयुष्याची कथा काहीशी अशीच आहे, मी खूप लहान वयात घर सोडले होते. मी एका प्रवाशासारखा ३५-४० वर्ष फिरत राहिलो. एक छोटी पेटी जवळ असायची आणि तोच माझा संसार होता. त्यात एक-दोन कपडे असायचे, एखाद-दुसरे पुस्तक असायचे, तेच घेऊन मी फिरत राहायचो. गुजरात तुम्हाला माहित आहे की तिथे थंडी नसते. कधी थंडी पडली तर पूर्ण बाह्यांचा सदरा घातला की पुरेसे असते. तिथे थंडी-बिंडी नसते. तर मी कुर्ता-पायजमा घालायचो, कपडे स्वत: धुवायचो तर माझ्या मनात दोन विचार आले की इतके जास्त धुवायची काय गरज आहे आणि दुसरा विचार आला की पेटीमध्ये जास्त जागा जाते. मग मी काय केले एकदिवस स्वत:च कात्री घेऊन याच्या लांब बाह्या होत्या, तर त्याला कापून टाकले आणि ते मला सोयीस्कर झाले आणि तेव्हापासून हे चालू आहे.
आता माहीत नाही याला कोणी फॅशन डिझायनर आपल्या नावाशी जोडत आहे. तर एकप्रकारे माझी सुविधा आणि सहजता यांच्याशी संबंधित हा विषय होता. पण लहानपणापासून माझा एक स्वभाव होता, पद्धतशीर राहायचा. माझी कौटुंबिक परिस्थिती तर अशी नव्हती इस्त्री करण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे तर आम्ही काय करायचो स्वत:चे कपडे स्वत: धुवायचो. तलावात जायचो. मग सकाळी शाळेत जाण्याआधी मी भांड्यात, लोटी.. लोटी म्हणतात ना? त्यात कोळसा टाकायचो, गरम कोळसा आणि मग त्यानेच इस्त्री करायचो. मग तेच कपडे घालून मोठ्या दिमाखात शाळेत जायचो. तर चांगल्या रीतीने राहण्याचा स्वभाव पहिल्यापासून होता. आमच्या नातेवाईकांनी एकदा आम्हाला बूट भेट दिले होते, कॅनव्हासचे. बहुदा त्यावेळी ते १० रुपयांचे मिळत असतील. तर मी काय करायचो, शाळेत तास संपल्यानंतर वर्गात थोडा वेळ थांबायचो आणि ज्या खडूने शिक्षक लिहायचे आणि तुकडे फेकून द्यायचे, ते गोळा करायचो आणि घेऊन यायचो. मग दुसऱ्या दिवशी त्या कॅनव्हास बुटावर खडू फिरवायचो, पांढरे दिसायचे. असा स्वभाव होता माझा, पण कोणी फॅशन डिझायनर वैगेरे कोणी नाही. पण मी मानतो की आपल्याला नेटके तर राहायला हवे, प्रसंगानुरूप राहण्याचा प्रयत्न करायला हवा. त्याचे एक महत्व असते. धन्यवाद.
आता आभार मानून झाले आहेत, पण मी देखील आभार मानतो त्या मुलांचे आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचे अभिनंदन करतो की पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलांकडून करून घेतले आणि सगळ्या मुलांनी उत्तमरित्या ते केले. खूप खूप अभिनंदन.
D.Wankhede/S.Pophale/N.Sapre
Who has been the biggest influence on you - the first question to PM @narendramodi by Malavath Purna.
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
I don't think any one person makes a life. It is about having a receptive mind, people keep teaching us something or the other: PM
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
You can learn something new even during a train journey. I have learnt a lot from my teachers. I spent lot of time in the library: PM
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Reading about Swami Vivekananda was a big influence: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
The next question is from Imphal- want to be a successful leader and contribute in politics. What personality and traits are needed.
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Good people and people from all walks of life are required in politics: PM @narendramodi https://t.co/I8jovXoECQ
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Do you recall how people from all walks of life joined Mahatma Gandhi during freedom struggle. It benefitted the nation: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Leadership quality is essential. You must also be clear why you want to be a leader: to fight elections only or to make a difference: PM
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Sarthak Bhardwaj from Uttarakhand asks PM - Digital India is a great effort but many places in India do not have electricity...
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
You are right, there are villages with no electricity. In next 1000 days we have taken up the effort to give power to 18,000 villages: PM
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Next question from Sonia Patil - what game do you enjoy. https://t.co/I8jovXoECQ
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Whenever a woman shines on the sports field, the mother of the child has a very important contribution: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
A question from Bengaluru: what are the challenges on Swachh Bharat initiative? #MyCleanIndia
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
If school students are achieving so much, making Apps on Swachh Bharat & winning laurels then am sure India can be Swachh: PM #MyCleanIndia
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Anmol from Patna asks the next question: what message for students wanting to give engineering and medical exams.
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Can serve the nation not only by joining the armed forces or being in politics. Several ways to contribute to nation building: PM
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Question from Bengaluru- why can't the youth take up teaching as a profession. How to make teaching more attractive to youth.
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
I don't think India lacks good teachers: PM @narendramodi pic.twitter.com/uisV4QjdmH
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
A question to the Prime Minister from Jammu and Kashmir - when you were a student what fascinated you the most?
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Classroom gives a sense of mission and a sense of priority: PM @narendramodi https://t.co/I8jovXoECQ
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Question to PM - you never use a written speech. How did you develop this mastery in oratory? pic.twitter.com/O0E0b8H9YQ
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
To speak well you need to be a good listener. And this will increase your confidence level: PM @narendramodi https://t.co/I8jovXoECQ
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015
Want to thank you all, and am happy children played a key role in this programme: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 4, 2015