Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी झारखंडमध्ये विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला

पंतप्रधानांनी झारखंडमध्ये विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला

पंतप्रधानांनी झारखंडमध्ये विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला

पंतप्रधानांनी झारखंडमध्ये विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमधील साहेबगंज येथे विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला.

त्यांनी गंगा नदीवरील चार पदरी पुलाचे आणि एका मल्टि-मोडल टर्मिनलचे भूमिपूजन केले. वाराणसी ते हल्दिया दरम्यान राष्ट्रीय जलमार्ग एक च्या विकासाचा मल्टिमोडल टर्मिनल हा महत्वाचा घटक आहे.

पंतप्रधानांनी 311 किलोमीटर लांबीच्या गोंविदपुर-जामतारा-दुमाका-साहेबगंज महामार्गांचे उद्‌घाटन केले आणि साहेबगंज जिल्हा रुग्णालय येथील सौर ऊर्जा सुविधांचे लोकार्पण केले.

पहारिया विशेष भारत राखीव तुकडीच्या हवालदारांना नियुक्तीचे प्रमाणपत्र आणि बचत गटांच्या महिला उद्योजकांना स्मार्टफोनचे प्रतिकात्मक वितरणही पंतप्रधानांनी केले.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, या विकास प्रकल्पांचा संथाल परगणा परिसराला लाभ मिळेल आणि आदिवासी समुदायांचे अधिक सक्षमीकरण करण्यास मदत मिळेल. ते म्हणाले की भारताील गरीबाची सन्मानाने आयुष्य जगण्याची इच्छा आहे आणि स्वत:ला सिध्द करण्याची संधी ते शोधत आहेत. त्यांच्या क्षमतेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, प्रामाणिकपणाचे युग भारतात सुरु झाले आहे. गरीबांना त्यांचा अधिभार मिळवून देण्याच्या कार्यासाठी त्यांनी जनतेकडून आशिर्वाद मागितले.

B.Gokhale/S.Kane/Anagha