भारत आणि बांगलादेश यांच्यात दृक श्राव्य सहनिर्मिती संदर्भातील कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
या कराराची प्रमुख वैशिष्ट्ये
• चित्रपट, माहितीपट व ऐनिमेशन चित्रपट यांच्या सह-निर्मितीचा या करारात समावेश आहे.
• प्रस्तावित करारानुसार तयार झालेल्या एखाद्या दृक श्राव्य निर्मितीला दोन्ही देशांचे संबंधित करार व नियामक अटी यांना अनुसरून कोणत्याही राष्ट्रीय दृक श्राव्य कार्याला दिले जाणारे फायदे लागू असतील.
• यामुळे दोन्ही देशांदरम्यान कला व संस्कृती यांची देवाणघेवाणा होईल आणि दोन्ही देशांच्या लोकांमध्ये परस्परांविषयी अधिक चांगल्या समजुतीची भावना निर्माण होईल.
• सहनिर्मितीमुळे आपले सृजनशील सामर्थ्य निर्माण करण्याची व प्रदर्शनाची संधी उपलब्ध होईल.
• दृक श्राव्य सहनिर्मितीमध्ये निर्मिती प्रक्रियेबरोबरच निर्मिती पश्चात कार्यात, मार्केटिंगंमध्ये गुंतलेल्या कलात्मक, तांत्रिक त्याच बरोबर बिगर तांत्रिक मनुष्यबळाला रोजगार उपलब्ध होईल आणि त्यामुळे दोन्ही देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नात(जीडीपी) भर पडेल.
• भारतीय स्थळांचा चित्रिकरणासाठी वापर झाल्यामुळे जगभरात भारतीय स्थळांना चित्रिकरणासाठी पसंतीचे स्थळ म्हणून मान्यता मिळण्याच्या शक्यता वाढतील
भारताने आतापर्यंत अशा प्रकारचे करार इटली, युके, जर्मनी, ब्राझील, फ्रान्स, न्यूझीलंड, पोलंड, स्पेन, कॅनडा, चीन व कोरियन प्रजासत्ताक यांच्याबरोबर केला आहे.
N.Sapre/S.Patil/Anagha