Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. केवळ शालेय विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केलेल्या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमात, पंतप्रधानांनी, भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त काढलेल्या 10 आणि 125 रुपयांच्या विशेष नाण्यांच अनावरण केलं. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘कला उत्सव’ या उपक्रमाच्या संकेतस्थळाचं उद्‌घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. देशातील माध्यमिक स्तरावरील शिक्षणात कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलाविष्कार जोपासून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा हा उपक्रम असेल.

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याला विशेष महत्व असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात सांगितले. विद्यार्थ्यांनी जे साध्य केलं आहे, त्याद्वारे शिक्षकाची ओळख निर्माण होते. आई जरी जन्म देत असली तरी प्रत्यक्षात शिक्षकच जीवन कसं जगायचं हे शिकवतो असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या जीवनात परस्परांना एक वेगळच स्थान आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. विविध विद्यार्थ्यांबाबत आलेले अनुभव शिक्षकांनी लिहायला हवेत, असंही ते म्हणाले. सर्वच विद्यार्थी महत्त्वाचे आहेत असा विचार शिक्षकांनी केला पाहिजे आणि केवळ हुशार विद्यार्थीच नव्हे तर सर्व विद्यार्थी लक्षात ठेवले पाहिजेत असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं स्मरण यावेळी केलं. एक शिक्षक म्हणून आपली आठवण राहिली पाहिजे, अशी डॉ. कलाम यांची इच्छा होती असं पंतप्रधानांनी सांगितलं. डॉ. कलाम शिक्षणाप्रती समर्पित होते आणि आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते, असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

जागतिक पातळीवर ठसा उमटवणारे अभियंते, डॉक्टर आणि वैज्ञानिक घडवणारे अनेक महान शिक्षक आजही भारतात आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं. शिक्षकांनी केवळ यंत्रवत विद्यार्थी न घडवता, संपूर्ण पिढी जोपासण्याचं लक्ष्य समोर ठेवलं असं ते म्हणाले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती झुबीन इराणी तसंच केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, रामशंकर कथेरीया आणि जयंत सिन्हा यावेळी उपस्थित होते.

J. Patankar/S.Tupe