Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ख्वाजा मोईनुद़दीन चिश्ती दर्ग्यावर अर्पण करण्यासाठी पाठवली चादर

पंतप्रधानांनी ख्वाजा मोईनुद़दीन चिश्ती दर्ग्यावर अर्पण करण्यासाठी पाठवली चादर


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अज़मेर शरीफ येथे ख्वाजा मोईनुद़दीन चिश्ती दर्ग्यावर अर्पण करण्यासाठी आज चादर पाठवली. अल्पसंख्यक आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याकडे पंतप्रधानांनी ही चादर सुपूर्द केली.

ख्वाजा मोईनुद़दीन चिश्ती दर्ग्याचा वार्षिक उर्स/उत्सव होत असून, ख्वाजा मोईनुद़दीन चिश्ती यांच्या जगभरातील अनुयायींना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

“ भारताच्या महान आध्यात्मिक परंपरेचे ख्वाजा मोईनुद़दीन चिश्ती एक प्रतीक आहेत. गरीब नवाजने मानवतेच्या सेवेचा दाखवलेला मार्ग आगामी अनेक पिढयांना प्रेरणादायी ठरणारा आहे. यावर्षी उरूस / उत्सवाचे यशस्वी आयोजन व्हावे, यासाठी आपल्या शुभेच्छा,” असे पंतप्रधानांनी संदेशात म्हटले आहे.