Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ITS अधिकाऱ्यांच्या, वरिष्ठ प्रशासकीय श्रेणी या पदावर, मूळ पदे कायम राखून पदोन्नतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


1989 ते 1991 च्या तुकडीतल्या ITS अर्थात भारतीय व्यापार सेवेतल्या अधिकाऱ्यांना, व्यक्तिगत स्तरावर आणि एका वेळेसाठी शिथिलता देऊन, वरिष्ठ प्रशासकीय श्रेणी स्तरावरच्या पदोन्नतीला, केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. वरिष्ठ प्रशासकीय श्रेणीमधे रिक्त पदे असतील त्या वेळी, या अधिकाऱ्यांना सामावून घेतले जाईल त्याचबरोबर, या अधिकाऱ्यांच्या निवृत्तीनंतर, त्यांची पदे, कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी या मूळ पदावर कायम राखली जातील या शर्तीवर ही मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे, भारतीय निर्यात क्षेत्राच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशासाठी, व्यापार सेवेतल्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेता येणार आहे.

N.Sapre/N.Chitale/D.Rane