Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महसूल सेवेतील 168 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

महसूल सेवेतील 168 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


भारतीय महसूल सेवेतील 168 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यामध्ये भूतान रॉयल सर्व्हिसच्या दोघा अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

या अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी विविध मुद्दे, विषयांवर चर्चा केली. यामध्ये अलिकडेच सादर झालेला अर्थसंकल्प, करदात्यांची वाढलेली संख्या आणि तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधन याविषयांचा समावेश होता.

लोकांच्या आकांक्षा पूर्तीसाठी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी कार्य करावं, अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

B. Gokhale/S. Bedekar/D. Rane