भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितले जाते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ. सिंग यांनी 1948 साली ...
अधिक संग्रहण लिंक"लोकनेते असा नावलौकिक असलेले श्री. अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्ध्तेसाठी ओळखले जातात. 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली. 1996 साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पहिले होते. पंडित नेहरुनंतर सलग दोनदा पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले. ज्येष्ठ संसदपटू असलेले ...
अधिक संग्रहण लिंकलोकनेते असा नावलौकिक असलेले श्री.अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्ध्तेसाठी ओळखले जातात. 13 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली. 1996 साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. पंडित नेहरुनंतर सलग दुसऱ्यांदा जनादेश मिळवून पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले. ज्येष्ठ संसदपटू ...
अधिक संग्रहण लिंकश्री. चंद्रशेखर यांचा जन्म 17 April 1927 रोजी उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यामधील इब्राहीमपट्टी या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. 1977 ते 1988 या कालावधीमध्ये ते जनता पक्षाचे अध्यक्ष होते. शालेय जीवनापासूनच चंद्रशेखर राजकारणाकडे आकर्षित झाले होते. एक आदर्शवादी, जहाल मतवादी, क्रांतिकारी उत्साह असणारी व्यक्ती म्हणून ते सर्वपरिचित होते. 1950-51 दरम्यान अलाहाबाद विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातील ...
अधिक संग्रहण लिंकश्री. चरण सिंह यांचा जन्म 1902 मध्ये उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्हयातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी 1923 मध्ये विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. 1925 मध्ये आग्रा विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या श्री. चरण सिंह यांनी गाजियाबाद येथून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. 1929 मध्ये ते मेरठ ...
अधिक संग्रहण लिंकश्री. गुलजारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1998 रोजी पंजाबच्या सियालकोट येथे झाला. त्यांचे शिक्षण लाहोर, आग्रा आणि अलाहाबाद येथे झाले. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात (1920-1921) श्रम संबंधी समस्यांवर संशोधक म्हणून काम केले. 1921 मध्ये ते नॅशनल महाविद्यालय (मुंबई) येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याचवर्षी ते असहकार चळवळीत सामील झाले. 1922 मध्ये ...
अधिक संग्रहण लिंकश्री. गुलजारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1998 रोजी पंजाबच्या सियालकोट येथे झाला. त्यांचे शिक्षण लाहोर, आग्रा आणि अलाहाबाद येथे झाले. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात (1920-1921) श्रम संबंधी समस्यांवर संशोधक म्हणून काम केले. 1921 मध्ये ते नॅशनल महाविद्यालय (मुंबई) येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याचवर्षी ते ...
अधिक संग्रहण लिंकसामाजिक आर्थिक विकास व भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे कट्टर समर्थक असलेल्या श्री. एच. डी. देवेगौडा यांचा जन्म 18मे 1933 रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होलेनारासिपुरा तालुक्यात असलेल्या हरदनहल्ली गावात झाला. सिविल इंजिनीरिंग पदविका धारक श्री. देवेगौडा यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला. 1953 साली त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला ...
अधिक संग्रहण लिंकश्री. इंदरकुमार गुजराल यांनी सोमवार 21 एप्रिल 1997, रोजी भारताचे 12वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दिवंगत श्री. अवतार नारायण गुजराल व श्रीमती पुष्पा गुजराल ह्यांचे पुत्र असलेल्या श्री. गुजराल ह्यांनी एमए, बी कॉम, पी एचडी व डी लिट पदवी संपादन केली. त्यांचा जन्म 4 डिसेंबर1919 रोजी अखंड भारतातील झेलम येथे झाला. 26 ...
अधिक संग्रहण लिंकपंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात उडी ...
अधिक संग्रहण लिंकश्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली. लहान गावात ...
अधिक संग्रहण लिंकश्री.मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 रोजी भादेली गावात झाला. हे गाव आता गुजरातमधील बुलसर जिल्हयात आहे. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते आणि अत्यंत कडक शिस्तीचे होते. लहानपणापासूनच, छोटया मोरारजींनी वडिलांकडून कोणत्याही परिस्थितीत कठोर मेहनत आणि सचोटी ही मूल्ये आत्मसात केली. सेंट ...
अधिक संग्रहण लिंकपी. रंगराव यांचे सुपूत्र असलेले पी.व्ही.नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 रोजी करीमनगर येथे झाला. उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. श्री. पी.व्ही. नरसिंह राव यांना तीन मुलगे आणि पाच मुली आहेत. शेतकरी आणि वकील असूनही त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि काही महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. आंध्र प्रदेश सरकारमध्ये ...
अधिक संग्रहण लिंकवयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान बनलेले श्री. राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी एक होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले. त्यांच्या मातोश्री श्रीमती इंदिरा गांधी 1966 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हा त्या 48 वर्षांच्या होत्या तर त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले ...
अधिक संग्रहण लिंकराजा बहादूर राम गोपाल सिंह याचे पुत्र श्री. व्ही. पी. सिंग यांचा जन्म 25 जून 1931 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी अलाहाबाद आणि पुणे विद्यापीठामधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. 25 जून 1955 ला श्रीमती सीता कुमारी यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. त्यांना दोन मुले आहेत. बुद्धिमान असलेले श्री. व्ही. पी. सिंग कोरॉव स्थित ...
अधिक संग्रहण लिंकपंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्यांनी इकोले नौवेल्ले, बेक्स (स्विझरलैंड), इकोले इंटरनेशनेल, जिनेवा, पुणे व मुंबई स्थित प्युपल्स ओन स्कूल, बैडमिंटन स्कूल, ब्रिस्टल, विश्व भारती, शांति निकेतन आणि समरविले कॉलेज, ऑक्सफोर्ड सारख्या प्रमुख संस्थांमधून शिक्षण प्राप्त केले ...
अधिक संग्रहण लिंकपंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्यांनी इकोले नौवेल्ले, बेक्स (स्विझरलैंड), इकोले इंटरनेशनेल, जिनेवा, पुणे व मुंबई स्थित प्युपल्स ओन स्कूल, बैडमिंटन स्कूल, ब्रिस्टल, विश्व भारती, शांति निकेतन आणि समरविले कॉलेज, ऑक्सफोर्ड सारख्या प्रमुख संस्थांमधून शिक्षण प्राप्त केले ...
अधिक संग्रहण लिंक