Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

योगोदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाच्या 100 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी केले टपाल तिकिटाचे अनावरण

योगोदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाच्या 100 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकिटाचे अनावरण केले. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी स्वामी परमहंस योगानंदांचे कौतुक केले. त्यांनी दाखवलेला मार्ग मुक्तीचा नसून अंतयात्रेचा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

स्वामी परमहंस योगानंदांनी आपल्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी भारत सोडला असला तरी ते नेहमीच भारताशी जोडलेले राहिले, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताचे अध्यात्म ही भारताची ताकद आहे. अध्यात्म आणि धर्म वेगळे आहेत, मात्र काही लोक अध्यात्माचा संबंधही धर्माशी जोडतात, हे दुर्दैवी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar