Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

टी आय आर अंतर्गत आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीवरच्या सीमाशुल्क कराराच्या भारताच्या स्वीकृतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


टीआयआर अंतर्गत आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीवरच्या सीमाशुल्क कराराच्या भारताच्या स्वीकृतीला आणि भारताच्या समावेशासाठीच्या आवश्यक प्रक्रियेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या करारामुळे भारतीय व्यापाऱ्यांना,जलदगती,सहज आंतरराष्ट्रीय मालाची ने-आण करण्याशी सुलभपणे जोडले जाता येणार आहे. यामुळे जागोजागीच्या तपासण्या कमी होणार आहेत. सीमाशुल्क विषयक प्रक्रिया अंतर्गत भागात होणार असल्यामुळे सीमेवरच्या सीमाशुल्क नाक्यावर होणारी कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे. टीआयआर अंतर्गत होणारी मालाची ने-आण केवळ मालावरचे सील पाहून आणि कंटेनरची बाहेरून तपासणी करून न्यायला मुभा राहणार असल्याने सीमेवरच्या नाक्यामुळे होणार उशीर टळणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha