पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) विधेयक 2017 ला मंजुरी दिली. यामुळे आयआयएमला राष्ट्रीय महत्वाची संस्था घोषित केले जाईल ज्यामुळे त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करता येतील.
विधेयकाची ठळक वैशिष्टये :-
• आयआयएमला त्यांच्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करता येतील.
• या विधेयकामुळे जबाबदारीसह संस्थांना संपूर्ण स्वायत्ता मिळेल.
• या संस्थांचे व्यवस्थापन मंडळामार्फत चालेल, संस्थेचे अध्यक्ष आणि संचालकांची निवड मंडळ करेल.
• मंडळात तज्ञ आणि माजी सदस्यांचा अधिक सहभाग असेल.
• संस्थांच्या कामगिरीचा स्वतंत्र संस्थांकडून कालबध्द पध्दतीने आढावा घेतला जाईल आणि याचे निष्कर्ष सार्वजनिकरित्या जाहीर केले जातील.
• संस्थांचे वार्षिक अहवाल संसदेत सादर केले जातील आणि नियंत्रक आणि महालेखापाल लेखा परक्षिण करतील.
• सल्लागार संस्था म्हणून आयआयएमच्या समन्वय मंचाची तरतूद आहे.
B.Gokhale/S.Kane/Anagha