Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-उरुग्वे यांच्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि उरुग्वे यांच्या दरम्यान सीमा शुल्क व्यवहारात परस्पर सामंजस्य राखण्याच्या कराराला मान्यता देण्यात आली.

या करारामुळे सीमा शुल्‍क प्रकरणात घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करण्यास सहाय्य होणार असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचे आदानप्रदान उभय देशात सुलभतेने होऊ शकणार आहे.

भारतीय सीमा शुल्‍क खात्याला माहिती घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा विचार संबंधित करार करताना करण्यात आला आहे. भारत आणि उरुग्वे यांच्या दरम्यान व्यापार केला जात असताना उत्पादनाची नेमकी किंमत, मालाच्या अधिकृततेविषयीचे प्रमाणपत्र आणि मालाचा तपशील आदि माहिती देण्याची आवश्यकता असल्याचे करारात स्पष्ट करण्यात आले आहे.

N.Sapre/S.Bedekar/P.Kor