Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दुसऱ्या दुतावासासाठी जमिनीच्या हस्तांतरणाला मान्यता


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवी दिल्लीतल्या द्वारका परिसरातल्या सेक्टर – 24 मधील 34.87 हेक्टर भूमीच्या हस्तांतरणाला मान्यता देण्यात आली. ही जमीन दिल्ली विकास प्राधिकरणाकडून भूमी आणि विकास कार्यालयाला देण्यात येणार आहे. या भूमीचा वापर प्रस्तावित दुसऱ्या दुतावासाची इमारत बांधण्यासाठी करण्यात येणार आहे.

सध्या चाणक्यपुरी येथे एक दुतावास इमारत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर राजदुतांसाठी जागा कमी पडत असल्याने आणखी एक दूतावास इमारत बांधण्याचा प्रस्ताव आला असून त्यासाठी द्वारका भागातील ही जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor