पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिग्गज अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदर्श व प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व म्हणून गौरवले असून, त्यांच्या देशभक्तीने भरलेल्या चित्रपटांमुळे ते विशेषतः लक्षात राहतील, असे म्हटले.
त्यांनी ‘एक्स‘वरील एका संदेशामध्ये लिहिले,
“प्रख्यात अभिनेते आणि चित्रपट निर्माते श्री मनोज कुमार जी यांच्या निधनाने मन अतिशय दुःखी झाले आहे. ते भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदर्श व प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व होते, ज्यांची देशभक्ती त्यांच्या चित्रपटांमधूनही प्रकट होत असे. मनोज जींच्या कलाकृतींनी राष्ट्रीय अभिमानाची भावना जागवली आणि त्या पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणास्त्रोत ठरतील. या दुःखद प्रसंगी माझ्या भावना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आणि सर्व चाहत्यांबरोबर आहेत. ॐ शांती.”
Deeply saddened by the passing of legendary actor and filmmaker Shri Manoj Kumar Ji. He was an icon of Indian cinema, who was particularly remembered for his patriotic zeal, which was also reflected in his films. Manoj Ji’s works ignited a spirit of national pride and will… pic.twitter.com/f8pYqOxol3
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2025
***
SonaT/Raj/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Deeply saddened by the passing of legendary actor and filmmaker Shri Manoj Kumar Ji. He was an icon of Indian cinema, who was particularly remembered for his patriotic zeal, which was also reflected in his films. Manoj Ji's works ignited a spirit of national pride and will… pic.twitter.com/f8pYqOxol3
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2025