नवी दिल्ली, 19 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (बीव्हीएफसीएल), नामरुप, आसामच्या सध्याच्या संकुलात युरियाचे वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन (एलएमटी ) इतकी उत्पादनक्षमता असलेल्या एका नव्या ब्राऊनफिल्ड अमोनिया-युरिया कॉम्प्लेक्स उभारणी ला मंजुरी दिली. या कारखान्यासाठी नवे गुंतवणूक धोरण, 2012 अंतर्गत, 7 ऑक्टोबर 2014 रोजी केलेल्या सुधारणांसह 70:30 या ऋण इक्विटी प्रमाणासह एका संयुक्त प्रकल्पाच्या माध्यमातून अंदाजे 10,601.40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नामरुप- IV प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी एकूण कालमर्यादा 48 महिने आहे.
त्याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल फर्टिलायजर्स लिमिटेड (NFL)च्या सार्वजनिक उपक्रम विभागाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये विहित केलेल्या मर्यादेत सूट देत 18% समभाग सहभागाला आणि नामरुप IV खत कारखान्याच्या उभारणी प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी एका आंतर-मंत्रालयीन समितीच्या स्थापनेला देखील मंजुरी दिली.
या प्रस्तावित संयुक्त प्रकल्पात, समभागाची विभागणी खालीलप्रमाणे असेलः
(i) आसाम सरकार: 40%
(ii) ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड (BVFCL): 11%
(iii) हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड: 13%
(iv) नॅशनल फर्टिलायजर्स लिमिटेड (NFL): 18%
(v) ऑईल इंडिया लिमिटेड:18%
बीव्हीएफसीएलचा समभागाचा वाटा स्थावर मालमत्तेच्या प्रमाणात असेल.
या प्रकल्पामुळे देशातील विशेषतः ईशान्य भागात देशांतर्गत युरिया उत्पादन क्षमता वाढेल. यामुळे ईशान्य, बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील युरिया खतांच्या वाढत्या मागणीची पूर्तता होईल. नामरूप-IV युनिटची स्थापना अधिक ऊर्जा कार्यक्षम असेल. यामुळे या भागातील जनतेसाठी रोजगाराच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संधी खुल्या होतील. त्याबरोबरच युरिया उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी देखील त्याची मदत होईल.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
The Cabinet’s approval for a new Brownfield Ammonia-Urea Complex at BVFCL, Namrup, Assam will enhance domestic urea production, benefit farmers in the Northeast & Eastern India and create new employment opportunities. It will also strengthen our vision of an Aatmanirbhar Bharat…
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2025
অসমৰ নামৰূপৰ বিভিএফচিএলত নতুন ব্ৰাউনফিল্ড এমোনিয়া-ইউৰিয়া কমপ্লেক্সৰ বাবে কেবিনেটে জনোৱা অনুমোদনে ঘৰুৱা ইউৰিয়া উৎপাদনৰ হাৰ বৃদ্ধি, উত্তৰ-পূব আৰু পূব ভাৰতৰ কৃষকসকলক উপকৃত কৰাৰ লগতে নতুন কৰ্মসংস্থাপনৰ সুযোগ সৃষ্টি কৰিব। তদুপৰি সাৰ সুৰক্ষা সুনিশ্চিত কৰাৰ লগতে শক্তি-দক্ষ উৎপাদনক…
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2025