Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विकसित भारत घडवण्यात योगदान देणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा.पंतप्रधानांनी केला गौरव


आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोपवून भारतातील महिलांच्या अफाट योगदानाचा गौरव करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.  सकाळपासून आपल्याला कर्तुत्ववान महिलांच्या प्रेरणादायी पोस्ट दिसत आहेत. या पोस्ट त्यांचा स्वतःचा प्रवास सांगत आहेत आणि इतर महिलांना प्रेरणा देत आहेत, असे मोदी म्हणाले, “त्यांचा दृढनिश्चय आणि यश आपल्याला महिलांमध्ये असलेल्या अमर्याद क्षमतेची जाणीव करून देते.” “आज आणि दररोज, आम्ही विकसित भारत घडवण्यात त्यांचे योगदान साजरे करतो,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट केले की :”सकाळपासून, तुम्ही सर्वांनी कर्तुत्ववान महिलांच्या प्रेरणादायी पोस्ट पाहिल्या असतील. या पोस्ट मधून त्यांचा स्वतःचा प्रवास त्या सामायिक करत आहेत आणि इतर महिलांना प्रेरणा देत आहेत. या महिला भारताच्या वेगवेगळ्या भागातील आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, परंतु या मागची संकल्पना एकच आहे- भारताच्या नारी शक्तीचा सन्मान’ .

त्यांचा दृढनिश्चय आणि यश, आपल्याला महिलांमध्ये असलेल्या अमर्याद क्षमतेची जाणीव करून देतो. आज आणि दररोज, आम्ही विकसित भारत घडवण्यात त्यांचे योगदान साजरे करत आहोत.”

***

S.Tupe/H.Kulkarni/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com