नवी दिल्ली, 05 मार्च 2025
जपान -भारत व्यावसायिक सहकार्य समितीच्या 17 सदस्यीय शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.समितीचे अध्यक्ष तात्सुओ यासुनागा यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. या शिष्टमंडळात उत्पादन, बँकिंग, विमान वाहतूक, औषधनिर्माण, प्रकल्प अभियांत्रिकी आणि लॉजिस्टिक अशा विविध क्षेत्रांतील जपानमधील आघाडीच्या उद्योग समूहांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.
या भेटीत तात्सुओ यासुनागा यांनी पंतप्रधानांना येत्या 06 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या जपान – भारत व्यावसायिक सहकार्य समिती आणि भारत-जपान व्यावसायिक सहकार्य समितीच्या 48व्या संयुक्त बैठकीची माहिती दिली. या भेटीत उच्च गुणवत्ता, भारतातील किफायतशीर उत्पादन, जागतिक बाजारपेठेसाठी विशेषतः आफ्रिका खंडावर लक्ष केंद्रित करून भारताच्या उत्पादन क्षेत्राचा विस्तार तसेच मानवी संसाधनांचा विकास आणि परस्पर हस्तांतरणात वाढ करण्याच्या शक्यता अशा अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली गेली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानी उद्योग समुहाच्या भारतातील विस्तार योजनांची तसेच मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या दृष्टिकोनाशी त्यांनी व्यक्त केलेल्या दृढ वचनबद्धतेची प्रशंसा केली. याशिवाय भारत आणि जपानमधील द्विपक्षीय संबंधांचा महत्वाचा पाया असलेल्या कौशल्य विकासातील व्यापक सहकार्याचे महत्वही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
N.Chitale/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
Pleased to meet the Japanese business delegation led by Mr. Tatsuo Yasunaga today. Encouraged by their expansion plans in India and steadfast commitment to ‘Make in India, Make for the World’. Looking forward to deepening economic collaboration with Japan, our Special Strategic… pic.twitter.com/UUCYErZTfW
— Narendra Modi (@narendramodi) March 5, 2025