Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘परीक्षा पे चर्चा 2025’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद

‘परीक्षा पे चर्चा 2025’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी  विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद


नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2025

विद्यार्थी: परीक्षा पे चर्चा साठी आम्ही खूप उत्सुक आहोत.

खुशी: मी जणू एखादे स्वप्न पहात आहे , असेच मला वाटत आहे.

वैभव:आमच्यासाठी ही विशेष बाब आहे,  यासाठी इतक्या  मुलांनी नोंदणी केली होती आणि आम्ही त्यामधले एक होतो.

साई  शास्त्रा : मी याधीचे परीक्षा पे चर्चा हे कार्यक्रम पाहिले आहेत आणि ते प्रेक्षागृहात झाले होते,मला वाटले हा कार्यक्रमही असाच असेल.

इरा शर्मा: पण यावेळी हा कार्यक्रम एकदम वेगळा आहे, त्याचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.

अक्षरा: या वेळी एका मोकळ्या जागेत ज्याचे नाव सुंदर रोपवाटिका आहे, इथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  

एड्रिएल गुरुंग: मी खूपच उत्सुक आहे,मी खूप आनंदी आहे,मी अतिशय उत्साही आहे.

अद्वितीय सादुखन: अखेर तो दिवस येऊन ठेपला जेव्हा आम्ही पंतप्रधानांना थेट भेटू शकतो.   

एड्रिएल गुरुंग: आज मी यांच्याशी संवाद  साधण्यासाठी इथे आलो आहे.

लोपोंगशाई लावाई: भारताचे पंतप्रधान

अक्षरा जे. नायर: पंतप्रधान मोदी जी,जेव्हा ते आले तेव्हा प्रत्येक जण सकारात्मक उर्जेने भारून गेला.  

सर्व  विद्यार्थी: नमस्ते सर!

पंतप्रधान: नमस्ते! तुम्हाला स्वतंत्र  बसवले गेले आहे का ?

विद्यार्थी: नाही सर!

ऋतुराज नाथ: त्यांना पाहून चैतन्य आले.

पंतप्रधान:यापैकी किती लोकांना ओळखता ?

 विद्यार्थी: सर, बहुतेक सर्वाना!

पंतप्रधान: मग सर्वाना घरी बोलावले का ?

विद्यार्थी: नक्की बोलावेन , सर !

पंतप्रधान: बोलावेन काय, आधीच बोलावायला  हवे होते.  

आकांक्षा अशोक:त्यांचे व्यक्तिमत्व भरून टाकणारे होते.

 पंतप्रधान: मकर संक्रांतीला काय देतात ?

सर्व  विद्यार्थी: तीळगुळ!

पंतप्रधान: तर एकच घ्यायचा असा नियम नाहीये.ज्याला तीळगुळ जास्त आवडतो तो जास्तही घेऊन शकतो.

विद्यार्थी: पंतप्रधान सर जेव्हा आम्हाला तिळाचा लाडू देत होते तेव्हा मला खूप छान वाटले.

पंतप्रधान: काय म्हणतात,तीळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला !

 विद्यार्थी: तीळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला !

पंतप्रधान: वा!

अनन्या यू:आपल्या घरात कोणी पाहुणे आल्यावर आपण त्यांना देतो ना, त्याचप्रमाणे त्यांनी तीळगुळ दिला आम्हाला !

पंतप्रधान:केरळ मध्ये काय म्हणतात याला ?

 विद्यार्थी: तिळाचे लाडू म्हणतात.

पंतप्रधान:  ते पण तिळाचे लाडू म्हणतात.

विद्यार्थी:तिथे हे फार कमी मिळतात.

पंतप्रधान: कमी मिळतात ?

विद्यार्थी: हां!

पंतप्रधान: अच्छा!

विद्यार्थी: आमचाही कोणी विचार करतं हे जाणवले.

पंतप्रधान:आणखी कोणाला हवा आहे का ?

 विद्यार्थी: सर, आणखी एक द्या!

पंतप्रधान: हा,हे चांगले आहे.

विद्यार्थी: खूप छान होते, सर !

पंतप्रधान: हा, बसा ! मला सांगा, हा तीळगुळ खाण्यासाठी कोणता हंगाम चांगला असतो ?

विद्यार्थी: थंडीचा !

पंतप्रधान: का खातात ?

विद्यार्थी: शरीरात स्निग्धता राखली जाते.

 पंतप्रधान: शरीरात स्निग्धता राखली जाते,आपण सर्व जण पोषणाबाबत काय जाणता  ?  

विद्यार्थी:आपल्या शरीराला आवश्यक ती खनिजे लागतात सर ……   (अस्पष्ट)

पंतप्रधान: त्याची जर माहितीच नसेल तर काय कराल ?

विद्यार्थी: खरे तर भारतात भरड धान्याला प्रोत्साहन दिले जाते. कारण भरड धान्ये पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात.

पंतप्रधान: भरड धान्ये कोणी कोणी खाल्ली आहेत ? खाल्ली  तर सर्वांनी असतील मात्र माहित नसेल.

विद्यार्थी: बाजरी , नाचणी, ज्वारी !

पंतप्रधान: सर्व जण खातात.बरं, भरड धान्याला जगामध्ये काय स्थान मिळाले आहे हे माहित आहे का  ?  

विद्यार्थी:यामध्ये भारत हा सर्वाधिक उत्पादक आणि वापर असलेला देश आहे.  

पंतप्रधान:2023 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी,2023 हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केले होते आणि संपूर्ण जगात भरड धान्यांना प्रोत्साहन दिले होते आणि हा भारताचा प्रस्ताव होता. पोषणाविषयी अतिशय जागरूकता असली पाहिजे अशी भारताची आग्रही भूमिका आहे. पोषणामुळे अनेक आजारांना रोखण्याचे काम शक्य होते.आपल्याकडे भरड धान्यांना काय म्हणतात, सुपर फूड म्हणतात.आपल्यापैकी किती जणांच्या घरी बाराही महिने आहारात कोणते ना कोणते भरड धान्य असते ?    

विद्यार्थी: सर, थोडे गहू,ज्वारी आणि बाजरी यांचे   पीठ एकत्र करतो,सर !

पंतप्रधान:आपल्याकडे काही गोष्टी परंपरेशी जोडलेल्या आहेत हे आपण पाहिले असेल. हंगामातले कोणतेही पहिले फळ देवाला ठेवले जाते.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: आणि त्याचा एक  उत्सव साजरा करतात.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: प्रत्येक ठिकाणी होतो.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: आणि त्यानंतर त्याचे सेवन केले जाते आणि त्याला म्हणतात प्रसाद!  

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: याचाच अर्थ हंगामातले जे फळ असते ते खाण्याची ईश्वरालाही गरज भासते, मग आपण तर माणूस आहोत.आपण हंगामातली फळे खायला हवीत की नाही ?

विद्यार्थी: हो  सर! खाल्ली पाहिजेत  सर!

पंतप्रधान: आपल्यापैकी किती जण या हंगामात  गाजर चावून खातात ? लोक गाजराचा हलवा तर खातात

विद्यार्थी: हो  सर!

पंतप्रधान: फळांचा  रस तर घेत असाल ,पोषणासाठी काय खावे, याचे महत्व आहे असे आपल्याला वाटते का ?  

विद्यार्थी: हो  सर!

पंतप्रधान: काय खावे याचेही महत्व आहे ?

विद्यार्थी: हो  सर!

पंतप्रधान: काय खाता कामा नये?

विद्यार्थी: जंक फूड!

पंतप्रधान: जंक फूड!

विद्यार्थी: तळलेले पदार्थ,मैदा  खाऊ नये कारण त्यामुळे रक्तातले साखरेचे प्रमाण वाढते.

पंतप्रधान:हो! अच्छा, काय –काय खावे, काय खाऊ नये हे तर माहित आहे मात्र कसे खावे हे माहित आहे का ? आपल्याला किती दात असतात ?

विद्यार्थी: 32!

पंतप्रधान: 32!कधी कधी शाळेतले शिक्षक सांगतात,घरी आई-वडील सांगतात की 32 दात आहेत तर कमीत कमी 32 वेळा चावून खाल्ले  पाहिजे.  

 विद्यार्थी: चावून खाल्ले पाहिजे हो  सर!

पंतप्रधान: तर कसे खावे हे सुद्धा महत्वाचे आहे.

विद्यार्थी: हो  सर!

पंतप्रधान: आपल्यापैकी किती जण , खाताना ज्यांना  हे माहीतच नाही , टपाल पेटीत पत्र टाकल्याप्रमाणे खातात,असे खाता का, की एखादा मित्र बरोबर असेल तर मनात येते याने जास्त खाल्ले तर !

विद्यार्थी: हो, बरोबर !

पंतप्रधान:मला सांगा आपल्यापैकी किती जणांना  पाणी पिताना त्याची चव जाणवली आहे ? म्हणजे पाण्याची चवही घेतात,मोठ्या आनंदाने घेतात असे किती जण आहेत ?

 विद्यार्थी: हो  सर!

प्रधानमंत्री: असे करत नसाल, शाळेतून धावत येत असाल !

विद्यार्थी: नाही  सर! नाही  सर!

प्रधानमंत्री:  बघा, खरे-खरे सांगा,असे करू नका.                           

विद्यार्थी: खरंच सर!

प्रधानमंत्री: आपण चहाचा घोट घेतो ना, कधी कधी पाणीही असे पिऊन बघायला हवे. पाण्याची चव जाणवली पाहिजे, तर कसे खावे, काय खावे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कधी खावे ?  

विद्यार्थी : सर, संध्याकाळी लोणचे खायचे नसते, सॅलड खायचे नसते, सॅलड सकाळी खाल्लेले खूप चांगले असते.

विद्यार्थी : संध्याकाळी साधारण सात वाजण्यापूर्वी जेवण झालेले असायला हवे. जैन समाजातही मोठ्या प्रमाणावर हे पाळले जाते , कारण आपले पचन उत्तम रीतीने होते.

पंतप्रधान : आपल्याकडे इथे देशात शेतकरी कधी जेवतात ?

विद्यार्थी :  दुपारी सर !

पंतप्रधान: जेवढे मी शेतकऱ्यांना ओळखतो,  शेतकरी सकाळी 8, 8:30 वाजता भरपेट नाश्ता करतात आणि नंतर शेतात जातात. दिवसभर काम करतात. दिवसभरात काहीतरी थोडे- फार  तिथे काही असेल तर खातात आणि संध्याकाळी 5-6 च्या सुमारास घरी येऊन सूर्यास्तापूर्वी जेवतात. तुम्ही गेल्याबरोबर म्हणत असाल , मला आता खेळायला जायचे आहे किंवा टीव्ही शो पहायचा आहे किंवा माझा मोबाईल तपासायचा आहे आणि त्यानंतर, आई , आता राहू दे, आता  भूक नाही.

विद्यार्थी : नाही सर!

पंतप्रधान: आजार नाही म्हणजे आपण निरोगी आहोत असे नाही. निरोगीपणाच्या तराजूवर तोलले पाहिजे. झोप पूर्ण होते की नाही , याचाही  पोषणाशी संबंध असतो,  का जास्त झोप लागते.

विद्यार्थी: सर, परीक्षेच्या वेळेस, जेव्हा तयारी करण्याची वेळ असते , तेव्हा जास्त झोप येते.

पंतप्रधान : त्यावेळी जास्त झोप येते ?

विद्यार्थी: हो आणि परीक्षेनंतर अजिबात येत नाही.

पंतप्रधान: त्यामुळे पोषणामध्ये, शरीराच्या निरोगीपणासाठी, तंदुरुस्तीसाठी झोप खूप महत्त्वाची आहे आणि या दोन्हीसाठी, संपूर्ण वैद्यकीय शास्त्र यावर केंद्रित होत आहे की जो रुग्ण येतो, त्याची झोप कशी आहे, किती तास झोपतो , या सर्व प्रश्नांचा अतिशय बारकाईने अभ्यास केला जात आहे.  तुम्हा लोकांना वाटत असेल, हे पंतप्रधान तर झोपायला सांगत आहेत. तुमच्यापैकी कितीजण रोज उन्हात जाऊन सूर्यस्नान करतात?

विद्यार्थी : सर, जेव्हा ऊन येते,  तेव्हा आम्ही शाळेत किंवा विशेष सभेत उभे राहावे लागते, मग…

पंतप्रधान: अरुणाचल, तुम्हाला काही बोलायचे होते का?

विद्यार्थी: अरुणाचल ही उगवत्या सूर्याची भूमी आहे , त्यामुळे दररोज सकाळी आम्ही कोवळी उन्हे अंगावर घेतो !

पंतप्रधान : प्रत्येकाने सकाळी लवकर काही वेळ उन्हात फिरण्याची  सवय लावावी, जे सोयीचे असेल, शक्य तितका शरीराचा जास्तीत जास्त थेट उन्हाच्या संपर्कात येऊ द्यावा , 2 मिनिटे, 5 मिनिटे, 7 मिनिटे , असं नको, शाळेत जाताजाता वाटेत ऊन लागले, ते घेतले , असं नाही, व्यवस्थित नियोजन करा,  तुमच्यापैकी किती जण आहेत ज्यांनी झाडाखाली उभे राहून सूर्योदयानंतर किमान 10 वेळा दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न केला आहे ? झाडाखाली उभं राहून, एकदम छाती भरून जाईल एवढा  श्वासोच्छ्वास एकाच दमात जेव्हा वाटेल की बस, आता फुटून जाईल, असं करता का नियमितपणे ?

विद्यार्थी: सर, मी दीर्घ श्वास तर घेत नाही, पण सर , खूप आराम मिळतो.

पंतप्रधान: माझ्या सांगण्याचे तात्पर्य होते,जीवनात कोणतीही प्रगती करण्यासाठी पोषण महत्त्वाचे असते. तुम्ही काय खाता, कधी खाता, कसे खाता आणि का खाता.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान: मला आठवतंय  की मी एका कुटुंबाकडे कधी जेवायला जायचो,  तेव्हा त्यांचा एक मुलगा गहू किंवा तांदूळ यापासून बनवलेली भाकरी खातच नव्हता, त्याला कधीतरी शिक्षकाने सांगितले असेल किंवा त्याने ऐकले असेल, की बाजरीची भाकरी खाल्ली, गहू खाल्ला तर हा तुमच्या त्वचेचा जो रंग आहे तो काळा होईल, त्यामुळे तो फक्त भातच खात असे, असे तर नाही ना ,गुगल गुरूला विचारून ठरवता , चला, आज काय खायचे?

विद्यार्थी : नाही सर!

पंतप्रधान: असे करत नाही ना?

विद्यार्थी : नाही सर!

पंतप्रधान: बरं , मला सांगा, मी कितीतरी वेळ  बोलत आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे?

विद्यार्थी : नमस्कारम सर ! माझे नाव आकांक्षा आहे आणि मी केरळ मधून आले आहे. माझा प्रश्न असा होता की…

पंतप्रधान: इतके चांगले हिंदी कसे बोलते ?

विद्यार्थी : कारण मला हिंदी खूप आवडते.

पंतप्रधान: कारण समजले का , का तुला हिंदी शिकायला आवडते ?

विद्यार्थी: नाही, मी कविता लिहिते.

पंतप्रधान : अरे वाह !  आता आधी  एक कविता ऐकवावी  लागेल.

विद्यार्थी : मला आठवली तर म्हणून दाखवेन.

पंतप्रधान: हो, ठीक आहे, जितकी आठवते तितकी , माझ्या अजिबात लक्षात राहत नाही.

विद्यार्थी: इतना शोर है इन बाजारों में, इतना शोर है इन गलियों में, क्यों तू अपनी कलम लेकर बैठा है फिर एक गजल लिखने, फिर उस किताब के पन्नों पर तू लिखना क्या चाहता है, ऐसा क्या है तेरे मन में, सवालों भरे तेरे मन में एक स्याही शायद जवाब लिख रही है, फिर क्यों तू आसमान देखता है, ऐसा क्या है इन सितारों में, ऐसा क्या है तेरे मन में!

पंतप्रधान : वाह! वाह! वाह!

विद्यार्थी: खूप आपुलकीने बोलत होते आणि असे वाटले की आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांशी बोलत आहोत.

पंतप्रधान : मग तुम्हाला कसले दडपण आहे?

विद्यार्थी : दडपण हे आहे की परीक्षेत चांगले गुण मिळाले नाहीत तर , असे म्हणतात की परीक्षेत चांगले गुण मिळवावे लागतात आणि जर चांगले गुण मिळवले नाहीत तर आपले भविष्य चांगले असणार नाही.

पंतप्रधान : काय उत्तर असू शकते याचे ?

विद्यार्थी : आयुष्यात परीक्षेतील गुण तितके महत्वाचे नसतात.

पंतप्रधान : चांगले गुण महत्वाचे नसतात?

विद्यार्थी: ज्ञान महत्त्वाचे असते.

पंतप्रधान: बरं ,तसेही सर्व शिकवणी वगैरे बेकार आहेत,परीक्षांची तर काही गरज नाही?

विद्यार्थी: सर मला वाटते की प्रत्येकाने लक्षात ठेवावे की परीक्षा हा केवळ आपल्या प्रवासाचा एक भाग आहे आणि आपले ध्येय नाही.

पंतप्रधान : नाही, पण घरी कुणी समजूनच घेत नाही ना , हे तुम्हा लोकांना समजले आहे.

पंतप्रधान : मग  काय कराल?

विद्यार्थी : सर, आपण केवळ मेहनत करत रहायचे , बाकी देवावर सोपवायचे.

पंतप्रधान : हे बघा , तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे,  आकांक्षा, दुर्दैवाने आपल्या समाजजीवनात हे इतके रुजले आहे की जर आपल्याला शाळेत चांगले गुण मिळाले नाहीत, 10वीत इतके गुण मिळाले नाहीत, 12वीत इतके गुण मिळाले नाहीत तर जणू काही आयुष्य उद्ध्वस्त होईल.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान: आणि त्यामुळे संपूर्ण घरात ताण , तणाव, दडपण असते.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान: तर, तुम्ही पालकांना तर समजावून सांगू शकत नाही, आता परीक्षेला 2 महिने उरले असतील . आता त्यांना म्हटले, आई, आता भाषण देऊ नकोस, असे तर करू शकत नाही ना . स्वतःला तयार करायचे आहे.  याचा अर्थ तुमच्यावर दबाव आहे, सर्वजण म्हणतात हे करा, ते करा, हे करा, ते करा, असे वाटते का?

पंतप्रधान: म्हणजे तुम्ही पालकांना समजावून सांगू शकत नाही, आता परीक्षेला २ महिने बाकी आहेत. आता त्यांना सांगा आई, आता भाषण देऊ नकोस, तू हे करू शकत नाहीस. स्वतःला तयार करावे लागेल. म्हणजे तुमच्यावर दबाव आहे, सगळे म्हणतात हे करा, ते करा, हे करा, ते करा, असे वाटते का?

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान: तुमच्यापैकी किती लोक असे आहेत जे कधी क्रिकेट मॅच असेल तर टीव्ही वर क्रिकेट पाहतात, किती लोक आहेत?

विद्यार्थी: सर, सर्व जण येस सर!

पंतप्रधान: तुम्ही पाहिले असेल, जेव्हा ते खेळतात तेव्हा स्टेडियममधून आवाज येतो.

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान: कोणता आवाज येतो?

विद्यार्थी: सर लोकांची संपूर्ण गर्दी प्रोत्साहन देत असते.

पंतप्रधान: सिक्सर-सिक्सर! कोण म्हणते फोर!

विद्यार्थी: कोणी म्हणते सिक्स!

पंतप्रधान: आता बॅट्समन काय करतो, तुमचे ऐकतो की तो समोरचा तो चेंडू पाहतो.

पंतप्रधान: जर तो त्या मागेच लागला, त्याने सिक्सर म्हटले आहे, चला मारुया sixer, तर मग काय होईल?

विद्यार्थी: आऊट होईल.

पंतप्रधान: याचा अर्थ हा की बॅट्समन त्या प्रेशरची पर्वा करत नाही.

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान: त्याचे संपूर्ण लक्ष त्या चेंडूवर असते. जर तुम्ही देखील हा ताण मनावर न घेता  आपले लक्ष, आज मी इतका अभ्यास करायचे ठरवले होते, यावर जर द्याल तर तुम्ही आरामात त्या ताणातून देखील स्वतःला बाहेर काढू शकता.

विद्यार्थी: आमच्या प्रश्नांची उत्तरे देखील दिली सरांनी, त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावले, कशा प्रकारे आम्ही लोकांनी परीक्षेचा ताण घ्यायचा नाही आहे, त्यांनी बरेच काही शिकवले.

विद्यार्थी: तुम्हाला तुमचे लक्ष्य माहीत असेल तर तुम्हाला ना कोणतेही डिस्ट्रक्शन असेल, ना कोणती ना कोणती गोष्ट तुम्हाला अडवू शकेल. तुम्ही स्वतः प्रेरित राहिले पाहिजे.

विद्यार्थी: ते म्हणाले की ताण कितीही असो, खुलेपणाने त्याचा आनंद घ्या. पण त्याचा विचारही मनात आणू नका.

पंतप्रधान: प्रत्येक वेळी स्वतःला सज्ज केले पाहिजे.

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान: प्रत्येक वेळी स्वतःला आव्हान देत राहिले पाहिजे.

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान: जर गेल्या वेळी 30 मार्क्स मिळाले असतील तर यावेळी 35 मार्क्स मिळवायचे आहेत. आव्हाने तर आपण स्वतःच तयार केली पाहिजेत. बरेचसे लोक स्वतःची लढाई स्वतः लढत नाहीत. तुम्ही कधी स्वतःशी स्वतः लढा देण्याचा विचार केला आहे का?

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान: स्वतःशी लढायचे असेल तर सर्वप्रथम स्वतःची स्वतःशी भेट झाली पाहिजे.

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान: कधी तुम्ही स्वतःलाच विचारले आहे का? की जीवनात मी काय बनू शकतो, काय करू शकतो आणि मी काय केले तर मला समाधान मिळेल? अनेकदा, अनेकदा आपण स्वतःलाच विचारले पाहिजे. असे नाही की आज सकाळी वर्तमानपत्र वाचले तर मनात आले की अरे वा हे तर चांगले आहे, दुसऱ्या दिवशी टीव्ही वर काही पाहिले तर मनात आले की हे चांगले आहे, असे नाही आहे. हळू-हळू आपले मन कुठे तरी स्थिर केले पाहिजे. बऱ्याचदा काय होते तर लोकांचे मन इथे-तिथे भरकटत राहाते.

विद्यार्थी: विचलित होत जाते.

पंतप्रधान: तेव्हा कुठे तुम्हाला आव्हान कशाचे स्वीकारायचे आहे, हे ठरवता येते, तर मग करणार का प्रयत्न?

विद्यार्थी: येस सर!

विद्यार्थी: पीएम सर, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही इतके मोठे जागतिक नेते आहात. तुम्ही अनेक पदे भूषवलेली आहेत. तर तुम्ही आमच्या सोबत अशा दोन तीन गोष्टी सामाईक करा ज्या नेतृत्वाशी संबंधित असतील, ज्या आम्हा मुलामुलींसाठी पुढे जाण्यासाठी महत्त्वाच्या असतील.

पंतप्रधान: विराज!

विद्यार्थी: जी सर!

पंतप्रधान: बिहारचा मुलगा असेल आणि राजकारणाचा प्रश्न नाही, असे होऊ शकतच नाही. तुम्ही पहा बिहारचे लोक खूप तेजस्वी असतात आणि कोणाच्या मनात नेतृत्वाचा विषय येतो…

विद्यार्थी: जी सर! माझ्या मनात देखील येते, कसे सांगू?

पंतप्रधान: कसे सांगणार? जसे सांगायचे असेल तसे सांगा.

विद्यार्थी: कधी, कधी शिक्षकांनी आम्हाला पाठांतर करून घेण्यासाठी नियुक्त केले आहे, मॉनिटर बनवले आहे, मुले ऐकत नाहीत तर त्यांना समजवण्याची एक पद्धत असते. आता त्यांना थेट तर बोलू शकत नाही की खाली बसा, खाली बसा नाही तर तुमचे नाव लिहीणार. असे केले तर ते आणखी गोंधळ करतील, तर मग त्याची कोणती तरी वेगळी पद्धत आहे, जेणेकरून त्यांना समजेल की बाबा रे, हे अमुक-अमुक आहे, गप्प बसा?

पंतप्रधान: तुम्ही हरियाणाचे आहात?

विद्यार्थी: नाही, मी पंजाबचा आहे, चंडीगढ़ चा!

पंतप्रधान: चंडीगढ़ चे आहात!

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान:  नेतृत्वाची जी व्याख्या आहे ना,नेता म्हणजे सदरा-लेंगा घातलेला, जाकीट घातलेला आणि मोठ-मोठ्या मंचांवर भाषण करणारा,असे नाही होत. जसे तुम्ही इतके लोक आहात, पण तुमच्यातील कोणी एखादा नेता बनला असेल. कोणत्याही कारणाविना तुम्ही त्याला विचारत असाल, तो म्हणत असेल चला, तुम्हाला वाटत असेल चला बुवा चला, स्वतःहून एखादा बनला असेल. तुम्हाला इतरांच्या कामात सुधारणा करण्यासाठी सांगितलेले नाही. तुम्हाला स्वतःला एक उदाहरण बनवायचे आहे. जर वेळेवर यायचे असेल, तर मॉनिटर असे म्हणेल की मी मॉनिटर आहे, तुम्ही लोक जा, मी नंतर येईन तर तुमचे म्हणणे कोणी ऐकेल का?

विद्यार्थी: नाही सर!

पंतप्रधान: जर गृहपाठ करायचा आहे, जर मॉनिटरने गृहपाठ केला असेल, तर बाकींना वाटेल, तुम्ही कोणाला तरी म्हणाल, अरे तुझा गृहपाठ नाही झाला का, हरकत नाही मी तुला मदत करतो चल.

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान: शिक्षकांचा ओरडा आपण कशाला खायचा, चल मी तुझी मदत करतो, जेव्हा तुम्ही त्याला सहकार्य करता, त्याच्या अडचणी समजून घेता, कधी कोणाची चौकशी केली, अरे बाबा तू तर आजारी दिसत आहेस, ताप आला आहे का, रात्री झोपला नव्हता का, त्याला वाटेल की अरे हा मॉनिटर तर माझी किती काळजी घेतो, माझी विचारपूस करतो, मला ओरडत नाही, तुम्ही आदराची मागणी करू शकत नाही…

विद्यार्थी: हो सर, येस सर!

पंतप्रधान: will have to command you!

विद्यार्थी: येस सर! येस सर!

पंतप्रधान: पण हे कसे होणार?

विद्यार्थी: तुम्हाला स्वतः बदलावे लागेल!

पंतप्रधान: स्वतःला बदलावे लागेल.

विद्यार्थी: तुमच्या वर्तनातून सर्वांना माहीत होईल.

पंतप्रधान: तुमच्या स्वतःच्या व्यवहारातून बदलेल.

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान: नेतृत्व लादले जात नाही. तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला स्वीकारत आहेत का, तुम्ही त्यांच्यावर ज्ञानाचा भडीमार केलात तर कोणीही स्वीकारणार नाही. तुमच्या व्यवहारांना ते स्वीकारत असतात. आता स्वच्छतेसाठी भाषण ठोकले आणि स्वतःच अस्वच्छता करत आहात …

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान: तर मग तुम्ही नेते बनू शकत नाहीत.

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान: नेता बनण्यासाठी टीम वर्क शिकणे अतिशय गरजेचे आहे. धैर्य अतिशय गरजेचे आहे. कधी कधी असे होते की एखाद्याला काही काम दिले आणि त्याने नाही केले तर आपण त्याच्यावर तुटून पडतो.

विद्यार्थी: येस सर!

पंतप्रधान : आपण त्यांना विचारतो, हे का नाही केले ? तर मग आपण नेता नाही बनू शकत.

विद्यार्थी :  हो सर.

पंतप्रधान : जर कोणाला काही काम सांगितले तर त्यात त्याला काही अडचणी येत आहेत का, हे पाहिले पाहिजे. आणखी एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे ‘जिथे कमी, तिथे आम्ही’.

विद्यार्थी : हो सर.

पंतप्रधान : आपल्या मित्रांना जिथे कुठे अडचण येईल, तिथे आपण पोहोचणे आवश्यक आहे, त्याला काही त्रास होत असेल तर तिथे आपण पोहोचणे आवश्यक आहे, यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि मग त्याला असेही वाटेल की, हे काम तर मीच केले आहे, मी स्वतः केले आहे. पण हे देखील तितकेच खरे की 80 टक्के मदत तर तुम्हीच केली होती.

विद्यार्थी : हो सर.

पंतप्रधान : पण, तुमच्या मित्राला वाटेल की हे काम त्याने पूर्ण केले आहे. यामुळे त्याचा विश्वास वाढेल आणि त्याचा हाच विश्वास आहे जो तुमच्या नेतृत्वाला मान्यता देईल. तुम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल. एक छोटा मुलगा यात्रेत गेला होता. त्याच्या वडिलांनी त्या मुलाला सांगितले की माझा हात धर. तर मुलगा म्हणतो, नाही! तुम्ही माझा हात पकडा. हे ऐकून कोणालाही असे वाटेल की काय मुलगा आहे, वडिलांना सांगतोय की माझा हात धरून चाला. मुलगा वडिलांना म्हणाला की, बाबा तुम्ही माझा हात पकडणे आणि मी तुमचा हात पकडणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण तो मुलगा म्हणतोय की जर मी तुमचा हात पकडला तर तो कधी तरी सुटून जाईल.

विद्यार्थी : हो सर.

पंतप्रधान : पण जर तुम्ही माझा हात पकडला तर तो कधीच सुटणार नाही, याची मला संपूर्ण खात्री आहे. हा जो विश्वास आहे तोच नेतृत्वाची खूप मोठी ताकद आहे. अजून कोण बोलणार आहे?

विद्यार्थी : मी त्रिपुरा राज्यातील पीएमसी आर्या हायर सेकंडरी स्कूल मधील इयत्ता बारावीचा विद्यार्थी प्रीतम दास.

पंतप्रधान : कुठे आहे ते ?

विद्यार्थी : दक्षिण त्रिपुरा मधील बेलोनिया जिल्ह्यात.

पंतप्रधान : इथेपर्यंत कसे पोहोचलात?

विद्यार्थी : एक उत्कटता होती, तुमची भेट घ्यायची होती, काही नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, काही नवीन गोष्टी शिकायच्या होत्या, बस इतकेच.

पंतप्रधान : कशी, निवड कशी झाली तुमची? लाच द्यावी लागली का?

विद्यार्थी : नाही सर.

पंतप्रधान : मग कशी निवड झाली?

विद्यार्थी : सर, त्रिपुरामध्ये लाचखोरी चालत नाही.

पंतप्रधान : चालत नाही?

विद्यार्थी : आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि माझ्या मनातल्या गोष्टी बोलण्यासाठी मी इथे आलो आहे.

पंतप्रधान : चला, मी ‘मन की बात’ करतो, तुम्ही ‘दिल की बात’ करा.

विद्यार्थी : सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जेव्हा आम्ही दहावी किंवा बारावी सारख्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असतो, तेव्हा आमचे जे छंद असतात किंवा अभ्यासक्रमेतर उपक्रम जसे की नृत्य करणे जे मला खूप आवडते, बागकाम करणे, चित्रकारिता, या सर्वांवर आमचे कुटुंबीय बंदी घालतात, या गोष्टी चालणार नाहीत असे सांगतात. इतकेच काय तर बोर्डाच्या परीक्षेनंतर देखील आम्हाला हे छंद जोपासू दिले जात नाहीत. शिक्षणावर लक्ष केंद्रित करा, करिअरवर लक्ष केंद्रित करा असेच सांगितले जाते. या क्षेत्रांमध्ये भवितव्य घडू शकत नाही असा त्या लोकांचा विचार आहे. म्हणून ते म्हणतात की तुम्ही शिकलात तरच तुमची प्रगती होऊ शकते.

पंतप्रधान : म्हणजे तुम्हाला नृत्य करता येते.

विद्यार्थी : हो सर. मला लहानपणी नृत्य शिकवले गेले नाही कारण मी अगदी छोट्या गावात राहतो. माझ्या गावात जेव्हा मुले नाचतात तेव्हा त्याचा फारच विपरीत अर्थ काढला जातो.

पंतप्रधान : कसे नृत्य करता, दाखवा जरा.

विद्यार्थी : असे आणि असे, आणि बंगाली लोकांचे धुनुची नृत्य, ते अशाप्रकारे केले जाते.

पंतप्रधान : अच्छा जेव्हा तुम्ही नृत्य करता, तेव्हा तुम्हाला कसे वाटते?

विद्यार्थी : मनाला आनंद होतो, समाधान वाटते.

पंतप्रधान : थकवा जाणवतो की शीण निघून जातो?

विद्यार्थी : नृत्यामुळे शीण निघून जातो.

पंतप्रधान : हा अर्थ तुम्ही तुमच्या आई-वडिलांना समजावून सांगा. तुम्हीच सांगा! दिवसभर जर तुम्ही तणावात राहिलात तर तुमचा दिवस नीट जाईल का?

विद्यार्थी : नाही.

पंतप्रधान : तुम्हाला असे वाटत नाही का की, तुम्ही देखील थोडे तणावमुक्त झाला पाहिजेत? असा विचार करा की, तुम्ही घरात एक कुत्रा पाळला आहे. तुम्ही तुमच्या कुत्र्यावर जीवापाड प्रेम करता. ज्याने लहानपणापासून आपल्या कुत्र्यावर इतके प्रेम केले आहे तो मुलगा जर दहावीत आला आणि त्याचे आई-बाबा त्याला म्हणाले की नाही आता कुत्र्यासोबत वेळ घालवू नको. आम्ही कुत्र्याकडे लक्ष देऊ, तू मात्र फक्त अभ्यास कर. मग तुम्हाला काय वाटेल?  तुमचे मन अस्वस्थ होईल. म्हणजेच, तुमचे विचार बरोबर आहेत. आपण रोबो सारखे जगू शकत नाही, हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण मनुष्यप्राणी आहोत, शेवटी आपण अभ्यास का करतो? तर पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी.

विद्यार्थी : हो सर.

पंतप्रधान : आपला प्रत्येक स्तरावर सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण अभ्यास करतो, शिक्षण घेतो. जेव्हा तुम्ही शिशुविहारात शिकत होता, तेव्हा तुम्हाला असे सांगण्यात आले असेल. त्यावेळी तुम्हाला असे वाटले असेल, आपल्याकडून ही कसली मेहनत करून घेतली जात आहे? हे आपल्याला का शिकवले जात आहे? मला माळी बनायचे नाही, मग मला फुलांच्या संदर्भात का सांगत आहे? आणि म्हणूनच मी नेहमी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना, त्यांच्या शिक्षकांना देखील सांगतो की मुलांना तुम्ही चार भिंतीत बंदिस्त करून एका प्रकारे पुस्तकांच्या तुरुंगात कैद करता. यामुळे मुलांचा विकास होऊ शकत नाही, मुलांना मोकळ्या आकाशात भरारी घेण्याची संधी दिली तरच त्यांचा विकास होऊ शकतो. मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्याची संधी मिळाली पाहिजे. मुले आपल्या आवडीच्या गोष्टी जर  व्यवस्थित करू शकली तर ती अभ्यास देखील व्यवस्थित करतील. परीक्षा म्हणजेच आयुष्य हा विचार सोडून दिला पाहिजे. जर तुम्ही हे जाणून घेतले तर तुम्ही हे आपल्या कुटुंबीयांना देखील हे समजावून सांगू शकता, आपल्या शिक्षकांना देखील समजावून सांगू शकता, याचा मला विश्वास आहे.

पंतप्रधान : वैभव तुमचा काय अनुभव आहे याबाबतीत ?

विद्यार्थी : सर! तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात, सर. लोकांची उत्सुकताच संपून जाते म्हणून आपल्यामध्ये….

पंतप्रधान : हो.

विद्यार्थी : जर आपण पुस्तकी किडा बनून राहिलो तर असे आपण आयुष्य जगू शकत नाही.

पंतप्रधान : म्हणजेच पुस्तकातूनही बाहेर पडले पाहिजे.

विद्यार्थी : आपण पुस्तके वाचली पाहिजेत कारण त्यामध्ये खूप ज्ञान असते, पण आपल्यासाठी देखील वेळ काढला पाहिजे.

पंतप्रधान: मी पुस्तके वाचू नका असे म्हणतच नाही, खरे तर खूप पुस्तके वाचली पाहिजेत. तुम्ही जितके जास्त ज्ञान मिळवू शकता तितके मिळवले पाहिजे. पण परीक्षा म्हणजेच आयुष्य नाही. ज्ञान आणि परीक्षा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

विद्यार्थी : हो सर.

पंतप्रधान : दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

विद्यार्थी : त्यांनी आम्हाला खूप काही शिकवले आहे. आयुष्याबाबत बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. परीक्षेचा ताण कसा येऊ द्यायचा नाही, हा तणाव कसा दूर ठेवायचा म्हणजे कसा पळवून लावायचा आणि परीक्षेत कसे व्यवस्थित लिहायचे, कोणत्या उद्दिष्टाने लिहायचे, हे सर्व शिकवले आहे.

विद्यार्थी : ते खूप सकारात्मक विचारांचे आहेत आणि त्यांनी आम्हाला देखील खूप सकारात्मकता दिली आहे.

विद्यार्थी : ते सर्व पिढ्यांना सक्षम बनवत आहेत.

विद्यार्थी : त्यांनी आम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांचा मी माझ्या रोजच्या जीवनात अवलंब करण्याचा प्रयत्न करेन.

पंतप्रधान : बसा बसा. हां, चला पुढचा प्रश्न विचारणाऱ्याने येथे येऊन प्रश्न विचारावा.

विद्यार्थी: नमस्कार सर, माझे नाव प्रीती बिस्वाल आहे. मी माझ्या मित्रमंडळींना पाहिले आहे. माझ्या वर्गात अनेक मुले आहेत जी खूप हुशार आहेत आणि अशी मुले आहेत जी खूप मेहनत करतात पण त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?

पंतप्रधान: सल्ला तर नको द्यायला, तुम्ही बसा!

पंतप्रधान: जर मी तुम्हाला सल्ला दिला तर तुम्हाला लगेच वाटेल की हे मला का सांगितले असेल, असे का सांगितले असेल, त्यांना माझ्याबद्दल काय वाटले असते, माझ्यात काही कमतरता आहे का?

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: म्हणजे एखादी व्यक्ती गोंधळून जाऊ शकते, म्हणजेच असे करून तुम्ही तुमच्या मित्रमंडळींची मदत करू शकणार नाही. त्यांच्यात काय चांगले आहे ते शोधून काढले तर बरे होईल; जर तुम्ही त्यांच्याशी 5 – 7 दिवस बोललात तर तुमच्या लक्षात येईल की तो चांगले गातो, तुमच्या लक्षात येईल की तो खूप चांगल्या पद्धतीने कपडे घालतो, त्याच्यात काहीतरी चांगले नक्कीच असेल. त्यानंतर तुम्ही त्याच्याशी चर्चा केली तर त्याला वाटेल की तुम्ही त्याच्यात रस घेत आहात, तुम्हाला त्याच्या चांगल्या गुणांबद्दल माहिती आहे. मग जर तुम्ही त्या मित्राला सांगितले की तू खूप कष्ट करतोस, मग नेमके काय होते, फक्त त्याला विचारा, तो म्हणेल की नाही मी त्यात चांगला नाही, मला अमके येत नाही. त्याला सांगा, चल, माझ्या घरी ये, चल, एकत्र अभ्यास करूया. दुसरे म्हणजे, तुम्ही पाहिले असेल की बहुतेक शिक्षक शिकवतात, पण जेव्हा परीक्षेची वेळ येते तेव्हा ते प्रश्नांची उत्तरे लिहायला सांगतात.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: मला नेहमीच वाटत आले आहे की आयुष्यात आपले वय कितीही असो, लिहिण्याची सवय लावून घेतली पाहिजे. जे कविता लिहितात, विराजने जशा कविता ऐकवल्या, आकांक्षाने कविता ऐकवल्या, अशा प्रकारे जे कविता लिहितात ना, म्हणजे ते आपले विचार त्यातून व्यक्त करतात. मला आठवते की मी अहमदाबादमध्ये एका शाळेतील लोकांना भेटलो होतो. आता एका मुलाने, कदाचित त्याच्या पालकांनी मला पत्र लिहून सांगितले असेल की माझ्या मुलाला शाळेतून काढून टाकले जात आहे. का काढत आहेत त्याला? तर त्यांनी सांगितले की तो लक्ष देत नाही. गंमत म्हणजे नंतर त्या शाळेत एक टिंकरिंग लॅब सुरू झाली आणि सर्वांना आश्चर्य वाटले की तो मुलगा त्याचा बहुतेक वेळ टिंकरिंग लॅबमध्ये घालवत असे. तिथे एक रोबोट स्पर्धा होती आणि त्या शाळेने रोबोटमध्ये पहिला क्रमांक मिळवला. कसा? तर तो त्या मुलाने बनवला, म्हणजेच ज्या मुलाला ते शाळेतून काढून टाकणार होते, तो रोबोट बनवण्यात नंबर वन होता. याचा अर्थ त्याच्याकडे काही विशेष क्षमता आहे. ती क्षमता ओळखणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. मी तुम्हाला एका प्रयोगाबद्दल सांगेन. तुम्ही आज तो कराल का, नक्की कराल का?

विद्यार्थी: हो, आम्ही करू! होय!

पंतप्रधान: तुमच्या लहानपणापासून आतापर्यंतच्या 25-30 मित्रांबद्दल विचार करा. मग त्यांची पूर्ण नावे लिहायचा प्रयत्न करा, त्यांची नावे आणि त्यांच्या वडिलांची नावे लिहिण्याचा प्रयत्न करा. असे जेमतेम दहा उरतील.. मग त्याच्या वडिलांचे, आईचे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे लिहा, मग ती संख्या आणखी कमी होईल. याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचा चांगला मित्र मानता, त्याच्याबद्दल तुम्हाला फारशी माहिती नाही, तुम्हाला माहितीच नाही. असेच अधांतरी चालू आहे सगळे. मग स्वतःला एक प्रश्न विचारा आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की अरे, मी वैभवसोबत इतक्या दिवसांपासून, तीन दिवसांपासून सोबत आहे, तर वैभवमध्ये कोणते गुण आहेत, मी त्यांच्याबद्दल लिहू शकतो का, जर तुम्ही ही सवय लावली तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीत काय सकारात्मक आहे ते शोधण्याची सवय सुद्धा लागेल. जर तुम्ही हे केले तर मला वाटते की तुम्हाला फायदा होईल.

विद्यार्थी: सर, माझा प्रश्न असा आहे की परीक्षा जवळ येऊ लागल्यावर विद्यार्थ्यांच्या मनात शक्य तितक्या लवकर सगळा अभ्यास करण्याचा, शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्याचा ताण येतो, म्हणून सर, या काळात ते अभ्यासाकडे अधिक लक्ष देतात आणि झोपणे, खाणे आणि पिणे यांचे वेळापत्रक थोडे बिघडते. पण सर, तुम्ही मात्र तुमचा दिवस उत्पादक राहिल, अशा पद्धतीने व्यवस्थापन करता. मग सर, अशा परिस्थितीत तुम्ही विद्यार्थ्यांना त्यांचा संपूर्ण दिवस आणि अभ्यास याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे, याबद्दल काय सल्ला द्याल?

पंतप्रधान: पहिली गोष्ट, प्रत्येकाकडे 24 तास असतात?

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: हे तर माहिती आहे.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: काही लोक 24 तासांत खूप चांगले काम करत आहेत. काही लोकांना मात्र 24 तास घालवल्यानंतरही, काहीच करता आले नाही, असे वाटते.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, त्यांच्याकडे व्यवस्थापन नाही, त्यांना तेवढी समज नसते.

विद्यार्थी: हो!

पंतप्रधान:असाच एखादा मित्र आला तर ते गप्पा मारू लागतात.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: फोन वाजला की तिथेच चिकटले. आपण आपला वेळ कसा वापरावा हेच त्यांना कळत नाही. सर्वप्रथम आपण आपल्या वेळेचा विचार केला पाहिजे. मी माझ्या वेळेचा जास्तीत जास्त वापर कसा करू शकतो याबद्दल मी खूप काळजी घेतो. मी माझा वेळ वाया जाऊ देत नाही. याचा अर्थ असा नाही की मी एकामागून एक कामे करण्यात व्यग्र आहे. तुम्ही कामाच्या वेळेचे व्यवस्थापन करावे आणि ते कागदावर लिहून ठरवावे. मग बघा, मी ठरवले आहे की उद्या मी तीन कामे नक्कीच करेन, जर तीन कामे करता आली तर मी ती नक्कीच करेन आणि दुसऱ्या दिवशी ती केली की नाही ते तपासा. आपला आवडता विषय असला की आपण लगेच त्यासाठी वेळ देतो आणि आपल्याला अजिबात आवडत नसलेल्या विषयाला हातही लावत नाही.

विद्यार्थी: हो सर! हे अगदी खरे आहे.

पंतप्रधान: सर्वप्रथम याच्या अगदी उलट करायला हवे.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: आव्हान दिले पाहिजे. काय समजतो हा. या भूगोलाची भीती मनात का बसली आहे. भूगोल मला का कळत नाही? मी भूगोलाचा पराभव करेनच, असा दृढ निश्चय मनाने केला पाहिजे. गणित विषय घ्या, अरे तुला काय वाटते, ये, ये आणि माझ्याशी दोन हात कर, आपण आपली लढाई सुरू करू. माझ्या मनात अशी भावना आहे की मला विजेता व्हायचे आहे, मला शरणागती स्वीकारायची नाही, मला झुकायचे नाही.

विद्यार्थी: प्रत्येकाकडे 24 तास असतातच, पण काही जणाचे संपूर्ण 24 तास खूप उत्पादक असतात तर काही जण ते गप्पा मारण्यात वाया घालवतात, जसे सरांनी सांगितले. म्हणजेच आपल्याला वेळेचे व्यवस्थापन करावे लागेल, जेणेकरून आपण आपले काम वेळेवर करू शकू आणि 24 तास उत्पादक राहू शकू…

विद्यार्थी: सर सुरुवातीला तुम्ही खूप छान उत्तर दिलेत म्हणून आम्ही टाळ्या वाजवल्या, पण नंतर फ्लॉवर क्लॅपिंग झाले .

पंतप्रधान:- हे का करतात माहिती आहे?

विद्यार्थी:- सर हे दिव्यांगांसाठी आहे जे ऐकू शकत नाहीत.

पंतप्रधान : ते लगेच असे करून दाखवतात.

विद्यार्थी : सर, आमच्या मनात विविध प्रकारच्या कल्पना, शक्यता आणि प्रश्न येत राहतात.  सर, परीक्षेच्या वेळी यामुळे मन विचलीत  होते. मग सर, अशा परिस्थितीत मन शांत कसे ठेवायचे?

पंतप्रधान : बघा, मला नाही वाटत तुम्ही विचलीत होत असाल.

विद्यार्थी: सर, हे थोडे बहुत तर होतेच कारण…

पंतप्रधान: तुम्ही विचलीत होत असाल असे वाटत नाही.

विद्यार्थी: सर, थोडे बहुत तरी मन  विचलित होते.

पंतप्रधान: कारण मी तुमचा आत्मविश्वास पाहत आहे.  सकाळपासून मी पाहतोय तुम्हाला… तुमचा आत्मविश्वास कमालीचा आहे.

विद्यार्थी: पण तरीही सर, एक गोष्ट तर होतेच.. कारण परीक्षा नेहमीच कठीण असतात…

पंतप्रधान : तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वत:ला ओळखत नाहीत… आणि तुम्हाला सुद्धा वाटतं की सगळ्या मित्रांमध्ये सांगायला हेच बरंय की …हो यार….जरा कठीणच आहे…. सर्व मुले…. दहावीची मुले एकमेकांशी बोलतील, यार, मला काल अभ्यास करता आला नाही, मला झोप लागली होती, यार, काल माझी मनोवस्था (मूड) चांगली नव्हती… सगळे असेच म्हणत असतात. फोनवर मित्रांसोबतही…

विद्यार्थी: होय!

पंतप्रधान: मग लक्ष केंद्रित कसे होणार बाबांनो?

पंतप्रधान: सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे?

विद्यार्थी: सध्या… आत्ताची वेळ… वर्तमान!

पंतप्रधान: ही वेळ निघून गेली, तर असेच, भूतकाळात जमा होणार … तुमच्या हातात काही राहणार नाही…हा काळ जगून घेतला तर .…

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान :…..तर तो आयुष्याचा एक भाग होऊन जातो, पण आपण कधी जगू शकतो, बघा, खूप छान वारा वाहत आहे, पण तुमचे लक्ष आहे की वारा वाहतोय…. काय मस्त झरा आहे, थोडं लक्ष दिलं तर, मी म्हटल्यावर तुम्हाला वाटले असेल, हो यार…

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान: याआधीही वारे वाहत होते.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान: पण लक्ष नव्हते.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान: आमचे लक्ष दुसरीकडेच होते.

विद्यार्थी : हो सर!

विद्यार्थी : माझा तुम्हाला प्रश्न आहे की, आजचे तरुण विद्यार्थी अभ्यास करताना नैराश्यात आणि चिंतेमध्ये बुडतात सर,…. मग यातून आपण  बाहेर कसे पडायचे सर?

पंतप्रधान: ही पिडा कुठून सुरू होते?  हळूहळू तुमच्या लक्षात आले असेल की घरी कोणी काही बोलले की तुम्हाला ते आवडत नाही.  पूर्वी तुम्ही लहान भावासोबत खूप गप्पा मारत असत.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान : आता वाटते की हा डोकं खातोय…जा तू जा, पूर्वी शाळेतून धावत यायचो, शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टी आईला सांगायचो.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान: आणि आता तुम्ही आईला सांगत नाही…काय ते सांगायचे…सोडा.आलात…थोडावेळ पुस्तक घेतले, नंतर ते ठेवले.हे वर्तन…तुम्ही अनुभवले असेल… हळूहळू आपल्याला कातरत जाते… संकुचित करत जाते आणि हळूहळू तुम्ही नैराश्यात जाता.तुमच्या मनातील द्विधा मन:स्थिती कुणाकडे तरी न डगमगता व्यक्त करण्याचा प्रयत्न करा.काही बोलला नाही आणि मनात ठेवलं तर हळूहळू मोठा स्फोट होईल.पूर्वी आपल्या समाजव्यवस्थेचे खूप चांगले लाभ होते. आपले कुटुंब स्वतःच एक विद्यापीठ होते. कधी आजोबांसोबत, कधी आजीशी, कधी मामाकडच्या आजोबांसोबत, कधी मामाकडच्या आजीशी, कधी मोठ्या भावाशी, कधी वहिनीशी, मनमोकळे बोलणे व्हायचे.म्हणजे काही ना काही मिळायचे तुम्हाला.कुकरची शिट्टी वाजते ना…

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान : कुकर फुटत नाही.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान : तसाच, हा दबाव आहे तुमच्यावर कुठे ना कुठे तरी.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान: आणि चालता बोलता सहज आजोबा म्हणतात…नाही-नाही बेटा, असं नाही करायचं.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान: तर मग आम्हाला बरं वाटतं… हो मित्रांनो… आम्ही ते नाही करणार. आजोबा म्हणायचे, काका म्हणायचे, अरे बाळा… पडशील, काळजी घे….बरं वाटायचं.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान : मानवी स्वभाव आहे….कुणी तरी आपली काळजी घेतलेली आवडते. आता मी सुद्धा इथे येऊन भाषण दिले असते… तर हे पंतप्रधान स्वतःला काय समजतात असा प्रश्न तुम्हाला पडला असता… पण तुमची गाणी ऐकावीशी वाटतात मला… तुमच्या गावाविषयीचे तुमचे बोल ऐकावेसे वाटतात.  याचा अर्थ तुम्हालाही वाटते…यार…हा तर  आपल्या सारखाच वाटतो. चला… आपणही बोलूया.तुमच्यावर कोणतेही दडपण येणार नाही… नैराश्याचे सर्वात मोठे कारण हे आहे. दुसरे… पहिले शिक्षक… मला आठवते मी शिकत असताना, मला असे वाटायचे की माझे शिक्षक कुणीही असले तरी ते माझ्यासाठी खूप मेहनत घेत असत…. माझे हस्ताक्षर चांगले नाही…. परंतु मला आठवते की माझे हस्ताक्षर सुधारण्यासाठी माझे शिक्षक खूप मेहनत घ्यायचे. कदाचित त्यांचे हस्ताक्षर होते त्यापेक्षा अधिक चांगले झाले असावे…. पण माझे काही झाले नाही.पण मी… माझ्या मनाला हे खूप भावले की ते माझ्यावर इतकी मेहनत घेत होते.

विद्यार्थी: सर माझा एक शेवटचा प्रश्न आहे.

पंतप्रधान: हं!

विद्यार्थी: पालकांच्या दबावामुळे अनेक विद्यार्थी त्यांना रस नसलेले अभ्यासक्रम….करीयर निवडतात. मग  विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या भावना न दुखावता आपल्या आवडीचे करिअर किंवा अभ्यासक्रम कसे निवडायचे?

पंतप्रधान : असं असतं की आई-वडिलांचा आग्रह असतो,  पण तो पूर्ण झाला नाही तर आई-वडिलांचे मन दुखावते असे काही नाही. त्यांची अपेक्षा असते की माझ्या मुलाने असे व्हावे, माझ्या मुलाने असे करावे आणि त्याला एक कारणही असते. त्यांच्या मनात असा स्वत:चा विचार नसतो….जेव्हा ते इतरांच्या मुलांकडे पाहतात…तेव्हा त्यांचा स्वत:चा अहंकार दुखावतो की हे त्याच्या मावशीच्या मुलाने केले, मात्र आपला करत नाही.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान: तर… त्यांचा जो सामाजिक दर्जा असतो, तो त्यांच्यासाठी अडथळा ठरतो.

विद्यार्थी : हो सर!

पंतप्रधान: तेव्हा माझा पालकांना सल्ला आहे की कृपया तुमच्या मुलाला सर्वत्र मॉडेल म्हणून उभे करू नका.  तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करा, त्यांच्यात जी काही क्षमता असेल ती स्वीकारा, जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जिच्याकडे काहीच नाही.  मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे एखाद्या मुलाला शाळेतून काढून टाकले जाणार होते, त्याला यंत्रमानव (रोबोट) बनवण्यात प्रथम क्रमांक मिळाला…शाळेत खेळात खूप मोठा असलेला मुलगा….सचिन तेंडुलकर सारखे मोठे नाव तुम्ही ऐकत आहात, तो स्वतः अभ्यासाबद्दल सांगतो, तो माझा विषय नव्हता…मला जास्त अभ्यास करण्याची इच्छा नव्हती…. पण त्याच्या पालकांनी त्याच्यामध्ये ही क्षमता पाहिली, त्याच्या शिक्षकांनी पाहिली…त्याचे आयुष्य बदलले.मला एकदा कुणीतरी विचारलं की, तुम्ही पंतप्रधान नसता, मंत्री असता, आणि कुणी तुम्हाला कुठले खाते हवे असं विचारलं असतं ….तर तुम्ही कोणतं खातं निवडलं असतं ?  तर मी कौशल्य विकास विभाग घेतला असता, असे उत्तर दिले.

विद्यार्थी:  होय सर!

पंतप्रधान: कौशल्यामध्ये प्रचंड शक्ती असते, आपण कौशल्यावर भर दिला पाहिजे आणि पालकांना हे देखील माहित आहे की जर त्यांचा मुलगा अभ्यासात रस घेत नाही म्हणजे त्याचे बलस्थान दुसरे कुठले असले पाहिजे, ती बाब ओळखा आणि त्याला त्या दिशेने पुढे जाऊ द्या, असे केल्यास मला वाटते की हा दबाव कमी होईल.

विद्यार्थी: पंतप्रधान मोदींनी पालकांना असा संदेशही दिला की मुलांवर दबाव आणू नये. मुलांनी त्यांच्या पालकांकडून शिकले पाहिजे आणि पालकांनी त्यांच्या मुलांना समजून घेतले पाहिजे. परस्पर समजूतदारपणा असला पाहिजे.

पंतप्रधान: आपल्याला तिथे जायचे आहे, आपण सगळे थोडे जवळ येऊया, आपण खूप दूर आहोत. आपल्याला  ध्यान करायचे आहे.

विद्यार्थी:  होय सर!

पंतप्रधान: आता जर मी सोप्या भाषेत ‘ध्यान’ म्हटले तर मी काय म्हणेन, लक्ष केंद्रित करणे.

विद्यार्थी: लक्ष केंद्रित करणे!

पंतप्रधान: बघा, हा कारंजे आता चालू आहे, त्याचा आवाज ऐका, तुम्हाला त्यात काही गाणे ऐकू येते का?

विद्यार्थी: मला सरांबद्दल सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे पंतप्रधान सरांनी सर्वांना ध्यान करायला सांगितले, विशेषतः जेव्हा ते सर्वांना कारंज्याचे निरीक्षण करायला आणि आमच्या मनात काय चालले आहे त्याचे निरीक्षण करायला सांगत होते, ते मला खूप भावले

पंतप्रधान: तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकू आला का?

विद्यार्थी:  होय सर!

पंतप्रधान: तुम्हाला कसे वाटले?

विद्यार्थी: खूप छान सर!

पंतप्रधान: पाच आवाज एकत्र आले असतील. कोणता आवाज कुठून येत आहे आणि कोणाचा आवाज येत आहे हे तुम्ही कधी ओळखले आहे का? जर तसे झाले म्हणजेच तुमचे लक्ष वेधले गेले. त्याच्याकडे जे काही सामर्थ्य होते ते त्यासोबत तुम्ही स्वतःला त्याच्याशी जोडून घेतले. वैभवने मला विचारले की , त्याला खूप अस्वस्थ वाटते, यावर उपाय काय आहे, ब्रीदिंग/ श्वासावर लक्ष केंद्रित करणे!

विद्यार्थी: सर प्राणायाम!

पंतप्रधान: हो, प्राणायाम खूप महत्वाचा आहे. तुम्ही एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करता. श्वास घेताना, तुम्हाला असे वाटले पाहिजे की थंड हवा आत जात आहे आणि गरम हवा बाहेर पडत आहे. तुम्ही कोणत्या नाकपुडीतून हवा आत घेत आहात ते तपासावे?

विद्यार्थी: बरोबर!

पंतप्रधान: जर दोन्ही नाकपुडीतून हवा बाहेर पडत नसेल तर दुसऱ्या नाकपुडीला वाईट वाटेल. आता समजा तुम्हाला उजवीकडून डावीकडे जायचे आहे आणि तुम्ही असे ऑर्डर केले तर ते मान्य होईल का?

विद्यार्थी: नाही!

पंतप्रधान: यासाठी एक तंत्र आहे. जर तुमचा उजवी बाजू सक्रिय असेल तर तुमचा डावा दात दाबा आणि तुमचे बोट एका बाजूला अशा प्रकारे दाबा. बघा, पूर्वी इथे श्वास वाहत होता पण आता तो हळूहळू येथून कमी होत आहे.

विद्यार्थी:  होय सर!

पंतप्रधान: इथे तुम्ही ५ सेकंदात तुमच्या शरीरावर नियंत्रण मिळवत आहात.

विद्यार्थी:  होय सर!

पंतप्रधान: तुम्ही तुमच्या दोन्ही नाकपुड्यांमधून श्वास घ्यावा. संतुलन असायला हवे, म्हणून तुम्ही असे बसावे, जसे शिक्षक तुम्हाला शाळेत सांगतात, तुमचे हात अशा प्रकारे असावे, आता एक श्वास घ्या. दोन्ही नाकपुड्या चालू आहेत का ते पहा.

विद्यार्थी: होय सर! होय सर! होय सर!

पंतप्रधान: मी म्हणतोय, म्हणून म्हणत आहे की हे प्रत्यक्षात घडत आहे?

विद्यार्थी: सर, हे खरोखर घडत आहे.

विद्यार्थी: जेव्हा सर इथे आले तेव्हा त्यांनी आम्हाला ध्यानाबद्दल सांगितले, आम्हाला खूप बरे वाटले आणि आमची सर्व चिंता वगैरे निघून गेली.

विद्यार्थी: त्यांनी आम्हाला ध्यान कसे करावे हे शिकवले? ज्यामुळे आम्हाला, आम्ही तणावमुक्त वाटले, त्यांनी आम्हाला आमच्या श्वासावर नियंत्रण कसे ठेवता येईल हे देखील सांगितले. आपणही इतका ताण घेऊ नये. ताणतणाव काहीही असोत फक्त त्यांचा मुक्त आनंद घ्या. याचा विचारही करू नका.

पंतप्रधान: ठीक आहे, चला, सगळे जवळ या! आज आपले गुरुकुल आहे.

विद्यार्थी: सर, आम्ही सकाळी आम्ही morning मध्ये  laughter therapy देखील केली

पंतप्रधान: ठीक आहे! व्वा! सर्वात जास्त कोण हसत होते?

विद्यार्थी: सर सगळेच!

पंतप्रधान: तुम्हाला काय शिकवले? कोणीतरी मला ते कसे करायचे ते दाखवा!

विद्यार्थी: हा-हा! हो-हो! हा-हा! हो-हो! हा-हा! हो-हो! हा-हा! हो-हो!

पंतप्रधान: जर तुम्ही कुटुंबात जाऊन ते करून घेतले तर ते काय म्हणतील की हा वेडा होऊन इथे आला आहे. एक काम करा, सर्वांना घरी एकत्र करा आणि ते करा. या आनंदाची स्वतःची शक्ती आहे, त्यामुळे तुम्हाला तीन दिवसांत घरात फरक दिसेल, वातावरण बदलेल.

विद्यार्थी: आम्हाला वाटलं होतं, मागच्या वेळेप्रमाणे, पंतप्रधान थोड्या वेळासाठी स्टेजवर येतील आणि बाकीची मुले खाली बसतील, आम्हाला वाटलं होतं की असं काहीतरी होईल. ते तसं नव्हतं, आज ते मित्रासारखे बोलत होते, आम्हाला भारताचे पंतप्रधान इथे आहेत असं वाटलंच नाही.

विद्यार्थी: माझे नाव युक्ता मुखी आहे सर!

पंतप्रधान: बेटा, तू कुठून आली आहेस?

विद्यार्थी: छत्तीसगड!

पंतप्रधान: छत्तीसगड!

विद्यार्थी: हो सर,मला विचारायचे आहे की आपण छोट्या छोट्या यशप्राप्तीने कसे आनंदी राहू शकतो? कारण मी प्रत्येक गोष्टीबद्दल अधिक नकारात्मक होते!

पंतप्रधान: तुम्हाला स्वतःला असे का वाटते की इतर लोक असे म्हणतात म्हणून तुम्ही नकारात्मक बनता?

विद्यार्थी: मी विचार केला होता की मला दहावीत 95 टक्के मिळतील पण मला 93 मिळाले, 2% कमी, त्यामुळे मी खूप निराश झाले होते.

पंतप्रधान: बघ बेटा, मी याला यश मानेन. लक्ष्य असे असले पाहिजे की ते आपली पोहोच जितकी आहे त्याच्या आत असेल, पण आपल्या हातात नसेल, म्हणून सर्वप्रथम मी तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या ताकदीपेक्षा दोन गुण जास्त लक्ष्य ठेवले. हे वाईट नाहीये आणि तुम्ही 93 गुण मिळवलेत आणि तुम्ही बघा, पुढच्या वेळी जर तुम्ही 97 चे लक्ष्य ठेवले तर तुम्हाला 95 मिळतील, तुम्हाला अभिमान असेल  की तुम्ही 95 चे लक्ष्य ठेवले होते आणि तुम्ही 97 सेट केले नाही, तुम्ही 99 सेट केले नाही, तुम्ही 100 सेट केले नाही, तुम्ही 95 सेट केले, तेव्हा तुम्हाला तुमच्या विषयात आत्मविश्वास आला. तुम्ही एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या प्रकारे पाहू शकता.

विद्यार्थी : सर परिक्षेचा काळ पाहता, अनेक विद्यार्थ्यांना सर बोर्डाच्या परीक्षेची भीती वाटते आणि ते तब्येतीची काळजी घेत नाही.

पंतप्रधान: पहिली गोष्ट म्हणजे या समस्येमागील कारण म्हणजे विद्यार्थ्यांची कमी संख्या. पहिली चूक त्याच्या कुटुंबातील सदस्यांची आहे; त्याला एक चांगला कलाकार व्हायचे आहे, तो खूप चांगले चित्र काढतो, पण ते म्हणतात नाही, तुम्हाला इंजिनिअर व्हावे लागेल, तुम्हाला डॉक्टर व्हावे लागेल.

विद्यार्थी:होय सर!

पंतप्रधान: आणि मग तो नेहमीच तणावाखाली असतो, म्हणून मी सर्वप्रथम पालकांना आणि कुटुंबातील सदस्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या इच्छा समजून घ्या, त्यांच्या क्षमता समजून घ्या, त्यांच्या अंगभूत क्षमतेनुसार ते काय करतात यावर लक्ष ठेवा. शक्य असल्यास, त्याला मदत करा. जर तुम्हाला दिसले की त्याला खेळात रस आहे, तर त्याला कुठेतरी क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी घेऊन जा. बघा, त्याला हुरूप येईल. दुसरे म्हणजे, शिक्षक, ते शाळेत असे वातावरण निर्माण करतात कि फक्त चार हुशार विद्यार्थ्यांनाच महत्व देतात आणि बाकीच्यांना हे तुम्हाला जमणार नाही, शेवटच्या बाकावर बसा असे म्हणत त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांना नैराश्य येते. मी शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही तुलना करू नये. एखाद्या विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांसमोर न ओरडता त्याला मायेने समजून सांगितले कि बाळा, तू खूप चांगला आहेस, तू खूप मेहनती आहेस, फक्त याकडे थोडे लक्ष दे तर मग विद्यार्थ्यालाही जाणीव होईल कि खूप अभ्यास करून घवघवीत यश मिळवेन, गेल्या वेळेपेक्षा चांगले गुण मिळवून आपल्या मित्रांपेक्षा चांगली कामगिरी करेन. पण आयुष्य इतकेच मर्यादित नाही. जेव्हापासून मी निरीक्षण करतोय, तेव्हापासून तू तुझ्याच विश्वात रममाण झाली आहेस, उघडपणे व्यक्त होताना दिसत नाहीस.

विद्यार्थिनी: माझ्या शाळेतील वरच्या वर्गातील विद्यार्थिनी म्हणून, माझा बहुतेक वेळ माझ्यापेक्षा खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांबद्दल किंवा सांस्कृतिक साहित्य स्पर्धांबद्दल रुची निर्माण करण्याचा प्रयत्न करते, परंतु कधीकधी मला असे वाटते की मी स्वतःला प्रेरित करू शकत नाही.

पंतप्रधान: कधीही स्वतःला एकटं वाटू देऊ नका, तुम्ही एकटे स्वतःबद्दल खूप विचार करता. तुम्ही ते कोणाला सांगत नाही, तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणीतरी हवे असते. तुमच्या कुटुंबातील कोणीतरी, तुमच्यापेक्षा मोठ्या सहाध्यायींपैकी कोणीतरी, शक्य असल्यास कोणीतरी. स्वतःला आव्हान द्या की आज मला 10 किलोमीटर सायकल चालवायची आहे. अरुणाचलच्या पर्वतांमध्ये तुम्ही 10 किलोमीटर जरी प्रवास केला तरी तुम्ही संपूर्ण दिवसाचा आनंद घेऊ शकता, असा विचार करून, बघा, मी आज हे केले. तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल. हे छोटे छोटे प्रयोग आहेत, नेहमी स्वतःशी स्पर्धा करत स्वतःला हरवा. आपण वर्तमान अशा प्रकारे जगले पाहिजे की आपला भूतकाळ पराभूत होईल.

विद्यार्थी: त्यांनी एक गोष्ट सांगितली की स्वतःचे ध्येय ठेवणे खूप महत्वाचे आहे, तुम्ही स्वयंप्रेरित असले पाहिजे आणि स्वतःला उमेद मिळवण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टींचे अनुसरण करू शकता, जसे की तुम्ही स्वतःसाठी छोटी-छोटी साध्य करण्यायोग्य ध्येये ठेवावीत आणि जेव्हा तुम्ही ती उद्दिष्टपूर्ती करता तेव्हा नेहमी स्वतःला बक्षीस द्या. अशाप्रकारे त्यांनी मला अनेक गोष्टींमध्ये प्रेरित केले.

विद्यार्थी: सर, तुम्हाला कोण उमेद देते?

पंतप्रधान: तुमच्यापासूनच मला प्रेरणा मिळते. अजयने गाणे लिहिले तसे मी परीक्षा पे चर्चा हे पुस्तक जरी लिहिले असेल, पण अजयसारखा कोणी त्याच्या गावात बसून त्याचे कवितेत रूपांतर करत आहे. याचा अर्थ मला असे वाटते की मी हे काम अधिक करावे. जर आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टी असतात.

विद्यार्थी: मनन-चिंतन करणे म्हणजे आत्मसात करणे. याचा अर्थ असा की आपण प्रथम एखादी गोष्ट ऐकतो, नंतर ती समजून घेतो, परंतु आपण ती आत्मसात करू शकत नाही.

पंतप्रधान: तुम्ही ऐकले आणि मग त्यावर चिंतन केले. मग तुम्ही कशावर चिंतन केले? तुम्ही त्यांच्या शब्दांवर, त्याच्या शिकवणींवर चिंतन केले. जर कोणी म्हटले की सकाळी लवकर उठले पाहिजे, तर मी त्यावर मनन केले कि हो, लवकर उठण्याचे खूप फायदे आहेत. मग मी झोपी गेलो, मग ते कसे आत्मसात होईल. मी जे काही ऐकले आहे, ते मी स्वतःला एक प्रयोगशाळा मानून कसोटीवर उतरतोय का हे जाणण्याचा प्रयत्न केला तर मी ते आत्मसात करू शकेन. बहुतेक लोक स्वतःशी स्पर्धा करत नाहीत, ते इतरांशी स्पर्धा करतात, ते स्वतःपेक्षा कमकुवत असलेल्यांशी स्पर्धा करतात आणि नंतर आनंद साजरा करत राहतात कि अरे तो खूप मेहनत करायचा तरी 30 मिळाले आणि मला 35 मिळाले आणि जो स्वतःशी स्पर्धा करतो, त्याचा आत्मविश्वास कधीच तुटत नाही.

विद्यार्थी: एक व्यक्ती आहे जी या जगासाठी दीपक ठरली आहे,

अशी एक व्यक्ती ज्यांनी त्यांच्या कष्टाच्या बळावर इतरांच्या आनंदासाठी अहोरात्र 24 तास काम केले.

हो, एक अशी व्यक्ती जे आज आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत, जे आम्हा विद्यार्थ्यांना सल्ला देऊन, प्रेरणा देऊन, आमच्याशी संवाद साधून आम्हाला आनंद देत आहेत,

आमचे लाडके श्री नरेंद्र मोदीजी आहेत. धन्यवाद सर!

पंतप्रधान: धन्यवाद बेटा, धन्यवाद!

विद्यार्थी: सर, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की जेव्हा जेव्हा आपण परीक्षा द्यायला जातो तेव्हा पेपर लिहिताना माझ्या मनात नेहमीच ही चिंता असते की जर मी नापास झाले तर; त्याचे परिणाम काय होतील याची मला नेहमीच काळजी असते. अपयश कसे टाळू शकतो?

पंतप्रधान: शाळेत 40%, 30% मुले दहावी आणि बारावीत नापास होतात, त्यांचे काय होते?

विद्यार्थी: ते पुन्हा प्रयत्न करतात.

पंतप्रधान: त्यानंतरही नापास झाले तर?

पंतप्रधान: हे पहा, आयुष्य थांबत नाही. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे की पुस्तकांच्या माध्यमातून यशस्वी व्हायचे आहे हे तुम्हाला ठरवायचे आहे. जीवनात यशस्वी होण्याचा एक मार्ग म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व अपयशांना तुमचे शिक्षक बनवणे. तुम्हाला माहित असेलच की क्रिकेट सामन्यात संपूर्ण दिवसाचे चित्रीकरण असते, सर्व खेळाडू बसून ते पाहतात, त्यांनी कोणती चूक केली आणि मग ते ठरवतात की त्यांनी कोणत्या सुधारणा करायच्या आहेत. तुम्ही तुमच्या अपयशांकडे शिक्षक म्हणून बघू शकता का? दुसरे म्हणजे, जीवन म्हणजे फक्त परीक्षा नाही, जीवनाचा साकल्याने विचार करायला हवा. आता जर तुम्ही कोणत्याही दिव्यांग व्यक्तीच्या आयुष्याकडे बारकाईने पाहिले तर देवाने त्यांना काही गोष्टी दिलेल्या नसतात पण देवाने त्यांना असे काहीतरी विलक्षण दिलेले असते की ते त्याच्या आयुष्याचा आधार आणि ताकद बनते. पण देवाने आपल्यातही काही उणिवा आणि काही वैशिष्ट्ये ठेवली आहेत.

विद्यार्थी: हो सर!

पंतप्रधान: त्या वैशिष्टयांनी अधिक चांगले बनायचे, मग कोणीही विचारणार नाही की तुमची पदवी काय आहे, तुम्ही कुठे शिकलात, तुम्हाला दहावीत किती गुण मिळाले, कोणीही विचारणार नाही आणि म्हणूनच प्रयत्न असा असावा की गुण कमवायचे की आयुष्य?

विद्यार्थी: सर, आयुष्य!

पंतप्रधान: तर आयुष्य घडवले पाहिजे.

विद्यार्थी: मी अजय, मी अरोही मॉडेल सीनियर सेकेंडरी विद्यालयाचा विद्यार्थी आहे. सर, आजकाल तंत्रज्ञान खूपच विकसित झालं आहे, पण कधी कधी आपण त्याचा अतिवापर करतो. तर सर, मी आपल्याकडून मार्गदर्शन घेऊ इच्छितो की आपण तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करू शकतो?  

पंतप्रधान: पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्व भाग्यवान आहोत आणि तुम्ही सर्व विशेष भाग्यवान आहात. तुम्ही अशा काळात मोठे होत आहात, ज्या काळात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात विस्तार, प्रभाव आणि उपयोग केला जात आहे. त्यामुळे तंत्रज्ञानापासून पळून जाण्याची गरज नाही. पण तुम्हाला ठरवावं लागेल की,मी कोणतेही ताळतंत्र न बाळगता फक्त रिल्स बघत राहतो का? की मला एखाद्या गोष्टीत रस आहे, मी त्याच्या बारकाव्यांमध्ये जाऊ का, त्याचे विश्लेषण करु का? जर असं केलं, तर तंत्रज्ञान हे एक शक्ती बनेल. तंत्रज्ञानाला एखादे  वादळ समजू नका. ते  कोणतेही मोठे  चक्रीवादळ नाही, जे  तुम्हाला कोसळवून टाकेल.  

तुम्ही हे धरून चला की जे लोक संशोधन करत आहेत, नवनिर्मिती करत आहेत, तंत्रज्ञान वाढवत आहेत, ते तुमच्या भल्यासाठी करत आहेत. तसेच आपली सुद्धा ही जबाबदारी आहे की आपण तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि त्याचा योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे.  

विद्यार्थी: सर, माझ्याकडे अजून एक प्रश्न आहे. एखाद्या कामात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आपण आपले सर्वोत्तम कसे द्यावे?  

पंतप्रधान: आपण नेहमीच आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सर्वोत्तम देण्याची पहिली अट म्हणजे ‘कालच्या दिवसापेक्षा आज उत्तम करणं’.  

विद्यार्थी: आमच्या कुटुंबातील लोक नेहमी आमच्या भल्यासाठी सांगतात की तु ही शिक्षण शाखा  निवडायला हवी, तुला हा  विषय घ्यायला हवा  , तू यासाठी योग्य आहेस. अशा वेळी आम्ही काय करावं? त्यांचं ऐकावं की स्वतःच्या मनाचं ऐकावं?  

पंतप्रधान : पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या मताचा सन्मान करा आणि मग त्यांना समजवा. जेव्हा तुम्ही त्यांना विचाराल की, “होय, हा एक चांगला विचार आहे, मी हे करावं का? मग सांगा, ते कसं करायचं? कुठे शिकता येईल? तुम्ही माझी काय मदत करू शकता?” मग तुम्ही प्रेमाने त्यांना विचारा की, “माझ्या मनात असाही एक विचार आहे, हे कसं वाटतं तुम्हाला?” हळूहळू तेही विचार करू लागतील आणि चर्चा होईल.  

विद्यार्थी: सर, खूप खूप धन्यवाद! आपण माझा प्रश्न ऐकला, त्याचे उत्तर दिले आणि मला अनेक गोष्टी शिकवल्या. शांत राहायला हवं, सकारात्मक विचार करायला हवेत, नकारात्मक विचार मनात आणू नयेत, हे शिकायला मिळालं. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद!

विद्यार्थी: सर, आजकाल अनेक विद्यार्थी परीक्षेदरम्यान एका समस्येला सामोरे जातात. त्यांना त्यांचा पेपर वेळेत पूर्ण करता येत नाही आणि त्याचा खूप तणाव येतो, मोठे दडपण निर्माण होते. अशा परिस्थितीला आम्ही कसं हाताळावं?  

पंतप्रधान: यासाठी पहिला उपाय म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांवर आधारित जास्तीत जास्त सराव परीक्षा घ्यायला हवी. जर तुम्ही पुरेसा सराव केला, तर तुम्हाला समजेल की कमी शब्दांत योग्य उत्तर लिहिल्यास तुमचा वेळ वाचेल. सुरवातीला आपल्याला जे उत्तम येते त्यावर लक्ष केंद्रित करा, त्यानंतर मध्यम आणि अखेरीस, जे प्रश्न अधिक विचार करायला लावणारे असतील, त्यावर वेळ द्यायचा. काही वेळा आपण असे प्रश्न अडून बसतो जे आपल्याला येत नाहीत, त्यामुळे जो येतो त्यासाठी वेळच उरत नाही.  कधी कधी उत्तर येत असलं तरी जास्त पाल्हाळीक लिहून टाकतो आणि त्यामुळे वेळ वाया जातो. म्हणून यावर उपाय म्हणजे सराव करणे!

विद्यार्थी: मी पीव्हीआर बालिका अंगती  पाठशाळेत दहावीमध्ये शिकते. मी आंध्र प्रदेशमधून आले आहे आणि या सुंदर वनामध्ये आपल्यासोबत असणं आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे—आम्ही पुस्तकांमध्ये वाचतो की हवामानात खूप बदल होत आहेत. आपण यासाठी काय करू शकतो?  

पंतप्रधान: फार चांगला प्रश्न विचारलात आणि मला आनंद झाला की माझ्या देशातील मुलांच्याही मनात पर्यावरणाची चिंता आहे.  जगभरात जी विकासाची प्रक्रिया झाली, त्यात भोगवादी मानसिकता  तयार झाली. हे सर्व माझं आहे, मला हवं तसं वापरायचं आहे, अशी वृत्ती निर्माण झाली. एखाद्या चांगल्या  फर्निचरसाठी 200 वर्ष जुनं झाड तोडायला त्यांना काहीही वाटत नाही. कोळसा कितीही जाळला तरी चालेल ,मी  24 तास लाईट चालू ठेवणार, त्यामुळे त्यांनी पर्यावरणाचं सर्वाधिक नुकसान केलं.  

परंतु भारताची संस्कृती वेगळी आहे. माझं एक मिशन आहे LiFE – Lifestyle for Environment. म्हणजे आपल्या जीवनशैलीतच आपण पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. आपल्या संस्कृतीतही हेच शिकवलं जातं; सकाळी  उठल्यावर आपण जमिनीवर पाय ठेवतो, तेव्हा धरती मातेची क्षमा मागतो.आपल्याकडे झाडांची पूजा केली जाते, त्यांच्या सणांदरम्यान सन्मान केला जातो. आपल्याकडे नद्या मातेसमान मानल्या जातात.  भारताने सध्या एक मोठा उपक्रम सुरू केला आहे, “एक पेड मां के नाम “. याचा अर्थ दोन मातांची आठवण ठेवणे. एक आई जिने जन्म दिला आणि दुसरी आई जिने आपल्याला जीवन दिलं, म्हणजेच पृथ्वी. म्हणून आपल्या आईच्या स्मरणार्थ झाड लावा आणि त्याचं संवर्धन करा.  जर तुमच्या आईचं नाव त्या झाडाशी जोडलेलं असेल, तर तुम्ही त्याची विशेष काळजी घ्याल आणि हेच पर्यावरण रक्षणाचं मोठं पाऊल असेल.  

विद्यार्थी: कारण निसर्ग हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण झाडांशी संवाद साधायला हवा, कारण ती आपल्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. त्यामुळे आपण निसर्गसंवर्धनाला प्रोत्साहन दिलं पाहिजे.

पंतप्रधान: सर्व जण तयार आहेत का झाडं लावायला? चला, लावूया! आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडाला पाणी द्यायचं, पण कसं? तर झाडाच्या बाजूला एक मातीचं मडकं गाडून ठेवा आणि महिन्यातून एकदाच त्यात पाणी भरा. असं केल्याने झाड लवकर वाढेल आणि कमी पाण्यातही चांगलं फोफावेल. हे प्रत्येक ठिकाणी लागू केलं पाहिजे. चला, सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

विद्यार्थी: धन्यवाद सर!

विद्यार्थी: सर, इथे येण्यासाठी आणि आम्हाला ही अद्भुत संधी दिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार!

पंतप्रधान: चला, आज तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त लक्षात राहिली?  

विद्यार्थी: सर, पर्यावरणासंदर्भातली!

प्रधानमंत्री: पर्यावरणासंदर्भातली!  

विद्यार्थी: होय, सर! सर, तुम्ही खूप प्रेरणा देता. आजचा संपूर्ण दिवस आम्हाला कायम आठवणीत राहील. आता परीक्षा आम्हाला अजिबात तणावपूर्ण वाटणार नाही.  

पंतप्रधान: परीक्षा तणावपूर्ण वाटणार नाही! आता  गूण कमी आले तरीही  

विद्यार्थी: सर, आपणच सांगितलं की जीवनात यशस्वी व्हायला हवं!

विद्यार्थी: सर, आता परीक्षाच आम्हाला घाबरणार!

प्रधानमंत्री: चला, सर्वांना खूप धन्यवाद!  

विद्यार्थी: धन्यवाद सर!

पंतप्रधान: आणि आता घरी जाऊन दादागिरी करायची नाही.  

“आता तर आमची थेट ओळख आहे” असं म्हणून शिक्षकांना घाबरवायचं नाही!  

विद्यार्थी: नाही, सर! अच्छा सर!

JPS/ST/NM/NC/NC/SK/SP/SM/MP/AS/HK/VJ/GD/PM       

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai