वर्ष 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प भारताच्या प्रगतीच्यादृष्टीने कायापालट घडवून आणणारा आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे. विकसित भारत घडविण्यासाठी देशाच्या वाटचालीच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प महत्वाची भूमिका पार पाडणार आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
हा केंद्रीय अर्थसंकल्प कृत्रिम प्रज्ञा , खेळणी उत्पादन, कृषी, पादत्राणे, अन्न प्रक्रिया आणि अस्थायी- कंत्राटी कामगार विषयक अर्थव्यवस्था यांसह अनेक क्षेत्रांमधील नवोन्मेष, उद्योजकता आणि शाश्वत विकासाचा मार्ग प्रशस्त करणारा आहे.
यासंदर्भात MyGov च्या वतीने ‘एक्स’ या समाज माध्यमावर सामायिक केलेल्या संदेश श्रृंखलेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया;
‘’एक असा अर्थसंकल्प, जो विकसित भारताच्या निर्मितीच्या आपल्या सामूहिक संकल्पाला गती देईल!#ViksitBharatBudget2025″
A Budget that will add momentum towards our collective resolve of building a Viksit Bharat! #ViksitBharatBudget2025 https://t.co/kDONUwP4b2
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2025
***
S.Bedekar/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
A Budget that will add momentum towards our collective resolve of building a Viksit Bharat! #ViksitBharatBudget2025 https://t.co/kDONUwP4b2
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2025