नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025
हरे कृष्णा – हरे कृष्णा!
हरे कृष्णा – हरे कृष्णा!
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री देवा भाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, श्रद्धेय गुरु प्रसाद स्वामी जी, हेमा मालिनी जी, सर्व मान्यवर पाहुणे, भक्तगण, बंधू आणि भगिनींनो.
आज ज्ञान आणि भक्तीने ओथंबलेल्या या महान भूमीवर इस्कॉनच्या प्रयत्नांमुळे श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन होत आहे. अशा अलौकिक सोहळ्यात सहभागी होण्याचे पुण्य मला मिळाले आहे, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हे इस्कॉनच्या संतांचे अपार प्रेम आणि त्यांची आपुलकी आहे, श्रील प्रभुपाद स्वामींचे आशीर्वाद आहेत. मी सर्व पूज्य संतांचे आभार मानतो आणि त्यांच्या चरणी वंदन करतो.
मी आत्ता पाहिले, श्री राधा मदनमोहनजी मंदिराच्या परिसराची जी रचना आहे, त्या मंदिरामागील जी संकल्पना आहे, त्यात अध्यात्म आणि ज्ञान परंपरेचा साक्षात्कार होतो. या मंदिरामध्ये ईश्वराच्या विविध स्वरूपांचे दर्शन होते, जे ‘एको अहम् बहु स्याम’ या विचारांना अभिव्यक्त करतात. नवीन पिढीच्या आवडीला अनुसरून येथे रामायण, महाभारत आणि त्यावर आधारित संग्रहालय देखील उभारले जात आहे. वृंदावनच्या 12 जंगलांवर आधारित एक उद्यानही येथे विकसित केले जात आहे. मला खात्री आहे की, हा मंदिर परिसर केवळ आस्थेचे केंद्र नाही, तर भारताच्या सांस्कृतिक चेतनेला समृद्ध करणारे एक पुण्य केंद्र बनेल. मी या पवित्र कार्यासाठी इस्कॉनच्या सर्व संतांचे आणि सदस्यांचे तसेच महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज या शुभ प्रसंगी परम श्रद्धेय गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज यांचे स्मरण होत आहे. या प्रकल्पामध्ये त्यांचा दृष्टिकोन सामावलेला आहे, भगवान श्रीकृष्णावरील त्यांची अनन्य भक्ती यामध्ये प्रतिबिंबित होते. जरी ते भौतिक स्वरूपात आज आपल्या समोर नसले, तरी त्यांची आध्यात्मिक उपस्थिती प्रत्येकाला जाणवते.
माझ्या जीवनात त्यांच्या स्नेहाचे, त्यांच्या आठवणींचे एक वेगळे स्थान आहे. त्यांनी जेव्हा जगातल्या सर्वात मोठ्या गीतेचे लोकार्पण केले तेव्हा सुद्धा त्यांनी मला आमंत्रित केले आणि मला सुद्धा तो पूर्ण प्रसाद मिळाला श्रील प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीच्या वेळी सुद्धा मला त्यांचे सानिध्य प्राप्त झाले. मला खूप समाधान आहे की आज मी त्यांच्या आणखीन एका स्वप्नाला पूर्ण होताना बघतोय त्याचा मी साक्षीदार आहे.
मित्रांनो,
आज या शुभ प्रसंगी मला परम श्रद्धेय गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज यांचे भावुक स्मरण होत आहे. या प्रकल्पामध्ये त्यांची दूरदृष्टी, भगवान श्रीकृष्णांप्रति त्यांची अगाध भक्ती आणि त्यांचे आशीर्वाद यांचा मोठा वाटा आहे. आज ते जरी आपल्यासोबत भौतिक रूपाने उपस्थित नसले तरी, त्यांची आध्यात्मिक उपस्थिती आपण सर्वजण अनुभवत आहोत.
माझ्या जीवनात त्यांचा स्नेह आणि त्यांच्या आठवणींना एक विशेष स्थान आहे. जेव्हा त्यांनी जगातील सर्वात मोठ्या गीतेचे लोकार्पण केले, तेव्हा त्यांनी मला त्या सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते, आणि त्या पुण्य कार्यात सहभागी होण्याचा योग मला मिळाला. श्रील प्रभुपाद यांच्या 125व्या जयंतीनिमित्तही मला गोस्वामी महाराजांच्या सान्निध्याचा लाभ झाला होता.
आज मला संतोष आहे की त्यांच्या आणखी एका स्वप्नाच्या पूर्ततेचा मी साक्षीदार बनत आहे. हे मंदिर केवळ त्यांचेच नव्हे,तर भक्ती आणि अध्यात्माचे एक भव्य प्रतीक ठरणार आहे.
मित्रांनो,
जगभरातल्या इस्कॉनच्या अनुयायांना भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीने एका धाग्याने बांधून ठेवले आहे. हा धागा त्यांना परस्पर जोडण्यासोबतच सतत मार्गदर्शन करणारे एक महत्त्वाचे सूत्र आहे . हे सूत्र श्रील प्रभुपाद स्वामींच्या विचारांच्या अमूल्य तत्त्वज्ञानाचे आहे. त्या काळात, जेव्हा भारत गुलामीच्या बेड्यांत जखडला होता, तेव्हा श्रील प्रभुपाद स्वामींनी वेद, वेदांत आणि भगवद्गीतेच्या महान शिकवणीला लोकांच्या समोर आणले. त्यांनी भक्ती-वेदांताला सामान्य जनतेच्या जीवनाशी आणि चेतनेशी जोडण्याचे कार्य केले. विशेष म्हणजे, 70 वर्षांच्या वयात, जेव्हा बहुतेक लोक जीवनातील कर्तव्ये पूर्ण झाल्याचे मानून विश्रांती घेतात, त्या वयात त्यांनी इस्कॉनसारख्या जागतिक मिशनची सुरुवात केली.
यानंतर त्यांनी थांबण्याचे नाव न घेता जगभर प्रवास केला आणि भगवान श्रीकृष्णाचा दिव्य संदेश पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला.आज, त्यांच्या परिश्रम आणि तपस्येचे फळ म्हणून, जगभरातील कोट्यवधी लोकांना श्रीकृष्णभक्तीचा प्रसाद मिळत आहे. श्रील प्रभुपाद स्वामींची सक्रियता आणि त्यांचे प्रयत्न आज सुद्धा आम्हाला प्रेरित करतात.
मित्रांनो,
आपला भारत एक असाधारण आणि अद्भुत भूमी आहे . ही केवळ भौगोलिक सीमा असलेली भूमी नाही, तर एक जिवंत धरती आहे जिवंत संस्कृती आहे,जिवंत परंपरा आहे.आणि या संस्कृतीची चेतना आहे येथील अध्यात्म. म्हणून, भारताला समजून घ्यायचे असेल, तर आधी या आध्यात्मिक चेतनेला आत्मसात करावे लागेल. ज्यांनी जगाला फक्त भौतिक नजरेने पाहिले, त्यांना भारत सुद्धा अनेक भाषा आणि प्रांतांनी विभागलेला देश वाटतो. पण ज्यांनी आपल्या आत्म्याला या सांस्कृतिक चेतनेशी जोडले, त्यांनाच भारताच्या विराट स्वरूपाचे दर्शन होऊ शकते. तेव्हांच आपल्या सुदूर पूर्वेच्या बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंसारखे संत अवतार घेतात . पश्चिमेत महाराष्ट्रामध्ये संत नामदेव, तुकाराम आणि ज्ञानेश्वरांसारख्या संतांनी जन्म घेतला. चैतन्य महाप्रभूंनी भक्तीची शक्ती जन-जनापर्यंत पोहोचवली. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून भगवद्गीतेचे गूढ ज्ञान सामान्य माणसाच्या आयुष्यात सहजपणे आणले. महाराष्ट्रातील संतांनी ‘रामकृष्ण हरी’च्या मंत्रातून समाजाला आध्यात्मिक अमृत दिले. त्याचप्रमाणे, श्रील प्रभुपाद यांनी इस्कॉनच्या माध्यमातून भगवद्गीता जगभर प्रसिद्ध केली. त्यांनी गीतेचे संदेश लोकांच्या जीवनाशी जोडले आणि कृष्ण भक्तीचा प्रकाश पसरवला.
चैतन्य महाप्रभूंनी महावाक्य मंत्र जन-जनांपर्यंत पोहोचवला. महाराष्ट्रातील संतांनी ‘रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी’ या मंत्राच्या माध्यमातून आध्यात्मिक अमृताची वाटणी केली. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाच्या गूढ ज्ञानाला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. याचप्रमाणे, श्रील प्रभुपादजींनी इस्कॉनच्या माध्यमातून गीतेला लोकप्रिय केले. त्यांनी गीतेची टीकास्वरूप पुस्तके प्रकाशित करून लोकांना तिच्या भावनेशी जोडले.
वेगवेगळ्या ठिकाणी जन्मलेले हे सर्व संत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कृष्णभक्तीच्या प्रवाहाला गती देत राहिले. या संतांच्या जन्मकाळामध्ये वर्षांचा मोठा फरक होता, भाषा वेगवेगळ्या होत्या, पद्धतीही भिन्न होत्या. पण त्यांचा बोध एक होता, विचार एक होता, आणि चेतना एक होती. या सर्व संतांनी भक्तीच्या प्रकाशाने समाजात नवसंजीवनी दिली, त्याला नवी दिशा दिली आणि अखंड ऊर्जा दिली.
मित्रहो,
तुम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहे की, आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा मुख्य पाया सेवा भाव हाच आहे. आध्यात्मिकतेत जनार्दन सेवा आणि लोकसेवेचा मिलाफ होत असतो. आपली आध्यात्मिक संस्कृती साधकांना समाजाशी जोडते, त्यांच्यात करुणेची भावना निर्माण करते. हाच भक्ती भाव त्यांना सेवा भावनेच्या दिशेने घेऊन जातो.
दातव्यम् इति यत् दानम दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तत् दानं सात्त्विकं स्मृतम्।।
श्री कृष्णांनी या श्लोकातून खऱ्या सेवेचा अर्थ आपल्याला समजावला आहे.त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे की, खरी सेवा तीच आहे ज्यात तुमचा कोणताही स्वार्थ नसतो.आपल्या सर्व धर्मग्रंथांच्या आणि शास्त्रांचे मुळाशीही सेवेची भावना आहे. इस्कॉनसारखी इतकी प्रचंड मोठी संस्थाही याच सेवेच्या भावनेने काम करते. शिक्षण, आरोग्य, पर्यावरणाशी संबंधित कित्येक कामे आपल्या प्रयत्नांमुळे होत आली आहेत.कुंभ मेळ्यातही इस्कॉन सेवेसंबंधी अनेक मोठी कामे करत आहे.
मित्रहो,
मला समाधान आहे की आमचे सरकार देखील याच सेवेच्या भावनेने पूर्ण निष्ठेने देशवासीयांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे. प्रत्येक घरात शौचालय बांधणे, प्रत्येक गरीब महिलेला उज्ज्वला गॅस जोडणी देणे, प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाण्याची सुविधा पोहचवणे, प्रत्येक गरीबाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा देणे, 70 वर्षांवरील प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तिला या सुविधेचा लाभ देणे, प्रत्येक बेघरांना पक्के घर देणे, सेवेच्या याच भावनेने, त्याच निष्ठेने केलेली ही कामे आहेत, ही कामे माझ्यासाठी आपल्या महान सांस्कृतिक परंपरेची देणगी आहे. सेवेची हीच भावना, खरा सामाजिक न्याय मिळवून देणारी असते, खऱ्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे.
मित्रहो,
आमचे सरकार कृष्ण सर्किटच्या माध्यमातून देशातील विविध तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळांना जोडत आहे.हे सर्किट गुजरात, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशापर्यंत विस्तारलेले आहे. स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेच्या माध्यमातून या ठिकाणांचा विकास केला जातो आहे. या मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या विविध रूपांचे दर्शन होते. कुठे तो बाल रूपात दिसतो,तर कुठे त्याच्यासोबत राधा राणींचीही पूजा केली जाते. काही मंदिरांमध्ये त्यांचे कर्मयोगी रूप दिसून येते, तर कुठे राजाच्या रुपात त्यांची पूजा केली जाते. आमचा प्रयत्न आहे की, श्रीकृष्णांच्या जीवनाशी संबंधित विविध ठिकाणांपर्यंत पोहचणे आणि मंदिरांना भेट देणे सोपे व्हावे.यासाठी विशेष रेल्वे गाड्या देखील चालवल्या जात आहेत. इस्कॉन देखील कृष्ण सर्किटशी जोडलेल्या या श्रद्धेच्या ठिकाणांपर्यंत भाविकांना पोहचता यावे यासाठी नक्कीच सहकार्य करू शकते. माझी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही तुमच्या केंद्रासोबत जोडल्या जाणाऱ्या सर्व भाविकांना भारतातील अशा किमान 5 ठिकाणी जरूर पाठवावे.
मित्रहो,
गेल्या दशकभरात देशात विकास आणि वारशाला एकाच वेळी गती मिळाली आहे. वारशाच्या माध्यमातून विकास करण्याच्या या मोहिमेला इस्कॉनसारख्या संस्थांचे मोलाचे पाठिबळही मिळत आहे. आपली मंदिरे किंवा धार्मिक स्थळे तर शतकानुशतके सामाजिक जाणिवेची केंद्रे राहिली आहेत. आपल्या गुरुकुलांचे शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देण्यात महत्त्वाचे योगदान राहिले आहे. इस्कॉन देखील आपल्या कार्यक्रमांद्वारे तरुणांना प्रेरणा देते की, त्यांनी अध्यात्माला आपल्या जीवनाचा भाग बनवावे. आणि त्यांच्या परंपरेला अनुसरून वाटचाल करत असतानाच इस्कॉनचे युवा साधक आधुनिक तंत्रज्ञानही कशा तऱ्हेने आत्मसात करतात हे पाहणे तर खूपच अद्भूत असते. आणि आपली माहिती संपर्क व्यवस्था तर इतरांनी त्यांतून काही शिकावे अशीच आहे. मला विश्वास आहे की इस्कॉनच्या नेतृत्वाखाली युवक अधिक सेवा भावनेने आणि निष्ठेने देशहिताचे काम करतील. या संकुलात भक्तीवेदांत आयुर्वेदिक उपचार केंद्राची सुविधाही नागरिकांना मिळणार आहे. आणि माझे तर असे मत आहे की, जगाला मी नेहमीच एक संदेश दिला आहे – ‘हील इन इंडिया’. शुश्रुषेसाठी आणि सर्वांगीण निरोगी स्वास्थ्यासाठी, निरामयतेसाठी ‘हील इन इंडिया’. इथे भक्ती वेदांत वैदिक शिक्षण महाविद्यालयही स्थापन करण्यात आले आहे. याचा लाभ प्रत्येक समाजाला होईल, संपूर्ण देशाला होईल.
मित्रहो,
आपण सगळेच हे पाहतो आहोत की सध्याचा समाज जितका आधुनिक होत चालला आहे, तितकीच त्याला संवेदनशीलतेची देखील गरज आहे, आपल्याला संवेदनशील माणसांचा समाज निर्माण करायचा आहे. एक असा समाज जो मानवी मुल्यांच्या आधारे पुढे वाटचाल करेल. एक असा समाज जिथे आपलेपणाच्या भावनेचा विस्तार झालेला असेल. इस्कॉनसारखी संस्था आपल्या भक्ती वेदांताच्या माध्यमातून जगाच्या संवेदनांना नवसंजीवनी देऊ शकते. आपली संस्था आपल्या क्षमतांचा उपयोग करून जगभर मानवी मूल्यांचा प्रसार करू शकते. मला विश्वास आहे की प्रभुपाद स्वामींचे आदर्श जिवंत ठेवण्यासाठी इस्कॉनमधील महान व्यक्तिमत्वे सदैव तत्पर राहतील. मी पुन्हा एकदा राधा मदनमोहनजी मंदिरासाठी संपूर्ण इस्कॉन परिवाराचे आणि सर्व देशवासीयांचे खूप खूप अभिनंदन करतो.
आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।
हरे कृष्ण – हरे कृष्ण!
हरे कृष्ण – हरे कृष्ण!
हरे कृष्ण – हरे कृष्ण !
SK/SP/Tushar/Gajendra/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Speaking at the inauguration of Sri Sri Radha Madanmohanji Temple in Navi Mumbai. https://t.co/ysYXd8PLxz
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2025
दुनियाभर में फैले इस्कॉन के अनुयायी भगवान श्रीकृष्ण की भक्ति के डोर से बंधे हैं।
— PMO India (@PMOIndia) January 15, 2025
उन सबको एक-दूसरे से कनेक्ट रखने वाला एक और सूत्र है, जो चौबीसों घंटे हर भक्त को दिशा दिखाता रहता है।
ये श्रील प्रभुपाद स्वामी के विचारों का सूत्र है: PM @narendramodi
भारत केवल भौगोलिक सीमाओं में बंधा भूमि का एक टुकड़ा मात्र नहीं है।
— PMO India (@PMOIndia) January 15, 2025
भारत एक जीवंत धरती है, एक जीवंत संस्कृति है।
और, इस संस्कृति की चेतना है- यहाँ का आध्यात्म!
इसलिए, यदि भारत को समझना है, तो हमें पहले आध्यात्म को आत्मसात करना होता है: PM @narendramodi
हमारी आध्यात्मिक संस्कृति की नींव का प्रमुख आधार सेवा भाव है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 15, 2025
नवी मुंबई में इस्कॉन के दिव्य-भव्य श्री श्री राधा मदनमोहन जी मंदिर में दर्शन-पूजन कर मन को अत्यंत प्रसन्नता हुई है। pic.twitter.com/3WlVpgeEnY
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2025
भगवान श्रीकृष्ण के संदेश को दुनिया के कोने-कोने में पहुंचाने वाले श्रील प्रभुपाद स्वामी जी के प्रयास आज भी सभी देशवासियों को प्रेरित करने वाले हैं। pic.twitter.com/JDN2bVLVQA
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2025
श्रील प्रभुपाद जी ने इस्कॉन के माध्यम से गीता को लोकप्रिय बनाया। अलग-अलग कालखंड में जन्मे कई और संतों ने भी भक्ति के प्रकाश से समाज को नई दिशा दी है। pic.twitter.com/WwgfApsmtO
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2025
हमारे सभी धार्मिक ग्रंथों और शास्त्रों के मूल में सेवा भावना ही है। मुझे संतोष है कि हमारी सरकार भी इसी सेवा भावना के साथ लगातार देशवासियों के हित में काम कर रही है। pic.twitter.com/m9Q1wekk9k
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2025