नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11:45 च्या सुमारास सोनमर्ग बोगद्याला भेट देतील आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन हस्ते केले जाणार आहे. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
सुमारे 12 किमी लांबीचा सोनमर्ग बोगदा प्रकल्प 2,700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. या प्रकल्पात सोनमर्ग मुख्य बोगदा, एक बहिर्गमन बोगदा आणि पोहोच मार्ग यांचा समावेश आहे. समुद्रसपाटीपासून 8,650 फूट उंचीवर असलेला हा बोगदा लेहकडे जाताना श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान सर्व ऋतुंमध्ये संपर्क सुविधा सुकर बनवेल. तसेच भूस्खलन आणि हिमस्खलन या समस्यांना मागे टाकून आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या लडाख प्रदेशात सुरक्षित आणि विनाखंड प्रवास सुनिश्चित करेल. या बोगद्यामुळे सोनमर्गचे वर्षभर पोहचता येणाऱ्या पर्यटन स्थळात रूपांतर होऊन हिवाळी पर्यटन, साहसी खेळ आणि स्थानिक उपजीविकेला चालना मिळेल, परिणामी पर्यटनाला चालना मिळेल.
2028 सालापर्यंत पूर्ण होणाऱ्या झोजिला बोगद्यामुळे या मार्गाची लांबी 49 किमी वरून 43 किमी पर्यंत कमी होईल तर वाहनाचा वेग ताशी 30 किमी वरून ताशी 70 किमी पर्यंत वाढेल, आणि श्रीनगर खोरे ते लडाख दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 वर संपर्क सुविधेची अखंडता सुनिश्चित होईल. ही वर्धित संपर्क सुविधा, संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये संरक्षण लॉजिस्टिक्स, आर्थिक वाढ आणि सामाजिक-सांस्कृतिक एकात्मतेला चालना देईल.
या अभियांत्रिकी साहसिक कार्यातील त्यांच्या योगदानाची नोंद घेत, अत्यंत कठीण परिस्थितीत काळजीपूर्वक काम करणाऱ्या बांधकाम कामगारांनाही पंतप्रधान भेटणार आहेत.
* * *
M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai