पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नवी दिल्ली येथील कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या नाताळ विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ख्रिस्ती समुदायातील कार्डिनल, बिशप आणि चर्चचे इतर प्रमुख नेत्यांशी संवाद साधतील.
पंतप्रधान कॅथलिक चर्चच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) ची स्थापना 1944 साली झाली असून, हे भारतातील कॅथलिक समाजासोबत काम करणारी संस्था आहे.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com