Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महान अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कपूर कुटुंबाशी साधला संवाद

महान अभिनेते  राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कपूर कुटुंबाशी साधला संवाद


महान अभिनेते  राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या  निमित्ताने  कपूर कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हृदयस्पर्शी संवाद साधला. या विशेष मुलाखतीत राज कपूर यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदान आणि त्यांच्या चिरस्थायी वारशाचा गौरव करण्यात आला. कपूर कुटुंबीयांशी पंतप्रधानांनी दिलखुलास संवाद साधला.

राज कपूर यांच्या कन्या  रीमा कपूर यांनी  राज कपूर यांच्या आगामी शताब्दी सोहळ्याच्या  निमित्ताने कपूर कुटुंबाला भेटण्यासाठी आपला बहुमोल वेळ दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. रीमा कपूर यांनी राज कपूर यांच्या चित्रपटातील एका गीताच्या  काही ओळी ऐकवल्या आणि सांगितले की मोदी यांनी या भेटीदरम्यान कपूर कुटुंबियांना दिलेले प्रेम, जिव्हाळा आणि आदर संपूर्ण भारत पाहील.  राज कपूर यांच्या महत्वपूर्ण  योगदानाची प्रशंसा करून, पंतप्रधानांनी कपूर कुटुंबाचे स्वागत केले.

राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा उत्सव  भारतीय चित्रपट उद्योगाच्या सुवर्ण प्रवासाची गाथा असल्याचे मोदी यांनी नमूद केले.  ‘नील कमल’ हा चित्रपट 1947 मध्ये बनला होता आणि आता आपण  2047 च्य दिशेने आगेकूच करत आहोत आणि या 100 वर्षांतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे ते म्हणाले. मुत्सद्देगिरीच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या ‘सॉफ्ट पॉवर’ या शब्दाचा उल्लेख  करून, मोदी यांनी अधोरेखित केले की राज कपूर यांनी त्याकाळी भारताची सॉफ्ट पॉवर प्रस्थापित केली होती जेव्हा हा शब्द प्रचलित देखील  नव्हता. भारताच्या सेवेत राज कपूर यांचे हे मोठे योगदान आहे असे ते म्हणाले.

इतक्या वर्षांनंतरही मध्य आशियातील लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या राज कपूर यांच्यावर  विशेषत: मध्य आशियावर केंद्रित एक चित्रपट बनवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी कपूर कुटुंबीयांना  केले. ते पुढे म्हणाले की  त्यांच्या जीवनावर राज कपूर यांचा प्रभाव होता. मध्य आशियामध्ये भारतीय चित्रपटांसाठी  प्रचंड संधी आहेत , त्यांचा योग्य वापर करण्याच्या दिशेने काम करण्याची गरज आहे.  मध्य आशियातील नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जायला हवेत असे मोदी यांनी कपूर  कुटुंबासमोर अधोरेखित केले. आणि असा चित्रपट तयार करण्याचे आवाहन त्यांनी कुटुंबाला केले जो एक दुवा म्हणून काम करेल .

***

SonalT/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai