Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हॉर्नबिल महोत्सवाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नागालँडच्या जनतेचे अभिनंदन


नवी दिल्‍ली, 5 डिसेंबर 2024

 

नागालँडमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या हॉर्नबिल महोत्सवाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवासाठी नागालँडवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.  यंदाच्या महोत्सवात कचरा व्यवस्थापन आणि शाश्वततेच्या संकल्पनेवर भर दिला गेला असल्याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. काही वर्षांपूर्वी आपण या  महोत्सवाला भेट दिल्याच्या आठवणींनांही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजाळा दिला असून, इतरांनी देखील या महोत्सवाला भेट द्यावी आणि नागा संस्कृतीचे चैतन्य आणि विविधता अनुभवण्याचे आवाहन केले आहे.

यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी लिहेलेला एक संदेश, आपल्या खात्यावरून सामायिक करत त्यावर प्रतिसाद म्हणून संदेश लिहिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक्स या समाज माध्यमावरील संदेश:

सध्या सुरू असलेल्या हॉर्नबिल महोत्सवासाठी माझ्याकडून शुभेच्छा आणि या महोत्सवाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही सर्व नागालँडवासियांचे अभिनंदन. यंदाच्या महोत्सवात कचरा व्यवस्थापन आणि शाश्वततेच्या संकल्पनेवर भर दिला गेला आहे,

हे पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे.

काही वर्षांपूर्वी मी या महोत्सवाला भेट दिली होती, त्या भेटीच्या आठवणी माझ्या मनात तरळत आहेत आणि, मी इतर सर्वांना आवाहन करतो की त्यांनी या महोत्सवाला भेट द्यावी आणि नागा संस्कृतीचे चैतन्य आणि विविधता अनुभवावी.

 

* * *

S.Tupe/T.Pawar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai