Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सुगम्य भारत अभियानाला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा


नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुगम्य भारत अभियानाला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. दिव्यांग भगिनी आणि बंधूंसाठी सुलभता,समानता आणि संधी वाढवण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.दिव्यांग भगिनी आणि बंधूंच्या मनोधैर्याचे आणि कर्तृत्वाचे कौतुक करताना मोदी यांनी आपल्या सर्वांना त्याचा अभिमान वाटतो असे नमूद केले.

मायगव्हइंडिया आणि मोदी अर्काइव्ह हँडल्सद्वारे X वर पोस्ट मालिकेला प्रतिसाद देताना मोदींनी लिहिले:

“आज, आपण #9YearsOfSugamyaBharat पूर्ण करत आहोत आणि आपल्या दिव्यांग भगिनी आणि बंधूंसाठी सुलभता,समानता आणि संधी वाढवण्याप्रति आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.”

“आपल्या दिव्यांग भगिनी आणि बंधूचे मनोधैर्य आणि कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. पॅरालिम्पिकमधले भारताचे यश हे याचे एक अतिशय ज्वलंत उदाहरण आहे. हे दिव्यांग व्यक्तींची  ‘कॅन डू’ भावना दर्शवते. #9YearsOfSugamyaBharat”

“खरंच एक अविस्मरणीय आठवण! #9YearsOfSugamyaBharat”

“दिव्यांग व्यक्तींचा अधिकार कायदा  2016 ऐतिहासिक रूपात पारित होणे याकडे  दिव्यांगांच्या  सक्षमीकरणाप्रति  आमच्या वचनबद्धतेचा स्पष्ट संकेत म्हणून पाहता येऊ शकते.#9YearsOfSugamyaBharat”

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai