Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फलनिष्पत्तींची यादी : पंतप्रधानांचा गयानाचा शासकीय दौरा (19 ते 21 नोव्हेंबर, 2024)

फलनिष्पत्तींची यादी : पंतप्रधानांचा गयानाचा शासकीय दौरा (19 ते 21 नोव्हेंबर, 2024)


नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2024

1

हायड्रोकार्बन्स क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य करार

या विषयावरील सहकार्यात कच्च्या तेलाचे सोर्सिंग, नैसर्गिक वायू क्षेत्रातील सहकार्य, पायाभूत सुविधांचा विकास, संपूर्ण हायड्रोकार्बन मूल्य साखळीत क्षमता उभारणी आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांचा समावेश आहे.

2

कृषी आणि संलग्न क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यासाठी सामंजस्य करार

कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये संयुक्त व्यवहार, वैज्ञानिक सामग्री, माहिती आणि कर्मचारी यांच्या देवाणघेवाणीद्वारे सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी.

3

सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम(2024-27)

भारत आणि गयाना यांच्यात सांस्कृतिक देवाण घेवाण आणि नाट्य, संगीत, ललित कला, साहित्य, ग्रंथालय आणि संग्रहालय व्यवहार या क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासह त्यांच्यातील सांस्कृतिक सहकार्याला बळकटी देण्याचे उद्दिष्ट आहे.

4

भारतीय फार्माकोपिया नियमनाची मान्यता भारतीय फार्माकोपिया आयोग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय, गयाना यांच्यात भारतीय फार्माकोपियाच्या मान्यतेसाठी सामंजस्य करार

औषधांच्या नियमनाच्या क्षेत्रात त्यांच्याशी संबंधित कायदे आणि नियमन यांच्या अनुषंगाने घनिष्ठ सहकार्य विकसित करण्याचे महत्त्व विचारात घेण्याचे उद्दिष्ट

5

मेसर्स एचएलएल लाईफकेअर लि.  आणि गयानाचे आरोग्य मंत्रालय यांच्यात जनौषधी योजनेच्या(पीएमबीजेपी) अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार.

कॅरीकॉम देशांच्या सार्वजनिक खरेदी संस्थांना पीएमबीजेपी कार्यक्रमांतर्गत परवडणाऱ्या दरांमध्ये औषधांचा पुरवठा करणे.

6

सीडीएससीओ आणि गयानाचे आरोग्य मंत्रालय यांच्यात वैद्यकीय उत्पादनांच्या क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य करार

फार्मास्युटिकल वापरासाठीचा कच्चा  माल,  जीवशास्त्रीय उत्पादने,वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधाने यांच्यासह फार्मास्युटिकल्स संदर्भात वैद्यकीय उत्पादन नियमन संवाद आणि सहकार्य चौकट स्थापन करण्याचे उद्दिष्ट

7

डिजिटल परिवर्तनासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अंमलात आणलेल्या यशस्वी डिजिटल सोल्यूशन्स सामायिक करण्याच्या क्षेत्रातील सहकार्यावर भारत स्टॅक सामंजस्य करार

क्षमता उभारणी, प्रशिक्षण कार्यक्रम, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, सार्वजनिक अधिकारी आणि तज्ञांची देवाणघेवाण, पायलट किंवा डेमो सोल्यूशन्सचा विकास इत्यादींच्या माध्यमातून डिजिटल परिवर्तनाच्या क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करणे.

8

एनपीसीएल इंटरनॅशनल पेमेंट्स लि. आणि गयानाचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्यात गयानामध्ये यूपीआय सारखी प्रणाली सुरू करण्यासाठी सामंजस्य करार

गयानामध्ये यूपीआय सारखी रिअल टाइम पेमेंट प्रणाली सुरू करण्याच्या शक्यतेसाठी एकमेकांमध्ये प्रवेश करण्याची इच्छा समजून घेणे हा सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

9

प्रसारण क्षेत्रात प्रसार भारती आणि गयानाचे नॅशनल कम्युनिकेशन नेटवर्क यांच्यात सहकार्य आणि संयुक्त सहभाग याविषयी सामंजस्य करार

संस्कृती, शिक्षण, विज्ञान, मनोरंजन, क्रीडा, बातम्या या क्षेत्रांतील कार्यक्रमांची देवाणघेवाण करणे

10

नॅशनल डिफेन्स इन्स्टिट्युट, गयाना आणि आरआरयू (राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी) यांच्यात सामंजस्य करार

या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण अभ्यासांमध्ये संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण वाढवण्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये सहयोगात्मक चौकट स्थापन करणे आहे.

अनुक्रमांक स्वाक्षरीकृत सामंजस्य करार सामंजस्य कराराची व्याप्ती

 

 

G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai