पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नायजेरिया दौऱ्यावर असून दौऱ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी त्यांच्या सन्मानार्थ नायजेरियाच्या स्टेट हाऊसमध्ये आयोजित समारंभात नायजेरियाचे राष्ट्रपती महामहिम बोला अहमद तिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दल तसेच भारत आणि नायजेरियातील संबंध वृद्धींगत करण्यासाठी दिलेल्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर‘ हा नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वात भारताने जागतिक महासत्ता म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनशील कारभारामुळे सर्वांसाठी एकता आणि शांतता प्रस्थापित केली आहे तसेच परस्पर सामायिक समृद्धी वाढली आहे, असे या पुरस्कारानिमित्त पंतप्रधानांना प्रदान केल्या केलेल्या मानपत्रात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर, हा पुरस्कार भारताच्या जनतेला तसेच भारत आणि नायजेरिया यांच्यामधील दीर्घकालीन, ऐतिहासिक मैत्रीला अर्पण केला. या पुरस्काराच्या निमित्ताने नायजेरियाने घेतलेली दखल म्हणजे भारत आणि नायजेरिया या दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी आणि ग्लोबल साऊथ अंतर्गत येत असलेल्या देशांच्या आकांक्षांप्रती दोन्ही देशांची परस्पर सामायिक वचनबद्धता अधोरेखित करते अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
1969 नंतर नायजेरियाच्या या पुरस्काराने सन्मानित केले गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले परदेशी नेते ठरले आहेत.
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
Honoured to be conferred with the ‘Grand Commander of the Order of the Niger’ Award by Nigeria. I accept it with great humility and dedicate it to the people of India. https://t.co/AyQ6v4EotH
— Narendra Modi (@narendramodi) November 17, 2024
नाइजीरिया के राष्ट्रीय पुरस्कार, 'Grand Commander of the Order of the Niger' से सम्मानित किए जाने पर मैं आपका, नाइजीरिया की सरकार और लोगों का, हृदय से आभार व्यक्त करता हूँ।
— PMO India (@PMOIndia) November 17, 2024
मैं इस सम्मान को विनम्रता और आदरभाव से स्वीकार करता हूँ।
और, इस सम्मान को 140 करोड़ भारतवासियों और…
भारत और नाइजीरिया के संबंध आपसी सहयोग, सद्भाव और परस्पर सम्मान पर आधारित हैं।
— PMO India (@PMOIndia) November 17, 2024
दो vibrant democracies और dynamic economies के रूप में हम मिलकर दोनों देशों के लोगों की भलाई के लिए काम करते रहे हैं: PM @narendramodi
आज, हमने आपसी सहयोग को और अधिक सुदृढ़ और व्यापक बनाने पर विस्तार से चर्चा की।
— PMO India (@PMOIndia) November 17, 2024
अर्थव्यवस्था, ऊर्जा, कृषि, सुरक्षा, fintech, Small and Medium scale enterprise और सांस्कृतिक क्षेत्रों में नई संभावनाओं की पहचान की है: PM @narendramodi
अफ्रीका में नाइजीरिया की बहुत बड़ी और सकारात्मक भूमिका रही है।
— PMO India (@PMOIndia) November 17, 2024
और, अफ्रीका के साथ करीबी सहयोग भारत की उच्च प्राथमिकता रहा है: PM @narendramodi
भारत और नाइजीरिया भी मिलकर दोनों देशों के लोगों और पूरे अफ्रीका महाद्वीप की समृद्धि के लिए मिलकर आगे बढ़ेंगे।
— PMO India (@PMOIndia) November 17, 2024
हम करीबी समन्वय के साथ काम करते हुए, ग्लोबल साउथ के हितों और प्राथमिकताओं को महत्व देंगे: PM @narendramodi