नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2024
रशियन महासंघाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मंतुरोव्ह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
दोन्ही देशांच्या दरम्यान व्यापार आणि आर्थिक संबंध, उर्जा तसेच संपर्क यांसह विविध क्षेत्रांतील सहकार्यात वाढ करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.
भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने, पंतप्रधानांच्या नुकत्याच पार पडलेल्या रशिया भेटीदरम्यान तसेच राष्ट्रपती पुतीन यांच्याशी झालेल्या बैठकींमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांतील पथकांकडून करण्यात येत असलेल्या निरंतर आणि संयुक्त प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले.
राष्ट्रपती पुतीन यांना स्नेहमय शुभेच्छा देत पुतीन यांच्यासोबत आगामी काळात विचारांची देवाणघेवाण सुरु ठेवण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Glad to meet Russia’s First Deputy PM Denis Manturov today. Happy to see that teams on both sides are working together to implement decisions taken during my recent visits and meetings with President Putin to further strengthen India-Russia Special and Privileged Strategic… pic.twitter.com/CvMlc22iAx
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2024