Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली जपानच्या पंतप्रधानांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली जपानच्या पंतप्रधानांची भेट


नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2024

 

क्वाड शिखर परिषदेच्या  निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 सप्टेंबर 2024 रोजी अमेरिकेत डेलावेर मधील विलमिंग्टन येथे जपानचे पंतप्रधान माननीय महोदय फुमियो किशिदा यांची भेट घेतली.

दोन्ही पंतप्रधानांनी त्यांच्या अनेक सुसंवादांना, विशेषत: मार्च 2022 मधील त्यांच्या पहिल्या वार्षिक शिखर परिषदेनंतरच्या भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या काही वर्षांत भारत-जपान दरम्यान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीमधील प्रगती गाठण्यास सक्षम करण्यासाठी पंतप्रधान किशिदा यांचे अतुलनीय समर्पण आणि नेतृत्वाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.

भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीने दहाव्या वर्षात पदार्पण केल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले आणि देशांमधील संबंधात झालेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंधांचा दोन्ही पंतप्रधानांनी आढावा घेतला आणि संरक्षण आणि सुरक्षा संबंध आणि B2B अर्थात आंतर-व्यापार आणि P2P अर्थात आंतर-व्यक्तिगत सहयोगासह सहकार्य आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने वैचारिक देवाणघेवाण केली.

पंतप्रधान किशिदा यांना पंतप्रधानांनी निरोप दिला आणि भविष्यातील त्यांच्या उपक्रमांच्या  यश आणि पूर्ततेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

* * *

H.Akude/S.Naik/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai