Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधील प्रगतीचे केले कौतुक


नवी दिल्‍ली, 5 ऑगस्ट 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधील प्रगतीबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला आहे. भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात जागतिक स्तरावर अव्वल 3 क्रमांकामध्ये पोहोचली आहे. पंतप्रधानांनी याचे श्रेय नवोन्मेषी युवा शक्तीला दिले आहे. येत्या काळात ही प्रगती अशीच कायम ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

भारताची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यात अव्वल तीन मध्ये असल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी एक्स समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये दिली आहे. त्यांनी बिझनेस स्टॅंडर्ड या वृत्तपत्रातील एक लेख सामायिक केला असून ज्यामध्ये म्हटले आहे की भारतातून ऍपल आयफोनच्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन निर्यातीने, 2024-25च्या (पहिल्या तिमाहीत) एप्रिल-जून तिमाहीच्या अखेरीस भारतातील अव्वल 10 निर्यातीत रत्ने आणि दागिने यांना मागे टाकत तिसरे स्थान मिळवले आहे.

अश्विनी वैष्णव यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले:

“ही खरोखरच अतिशय आनंदाची बाब आहे. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स मधील प्रभुत्वाचे श्रेय नवोन्मेषी युवाशक्तीला आहे. तसेच सुधारणा आणि @makeinindia ला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केल्याची ही साक्ष  आहे.

येत्या काळात ही प्रगती अशीच कायम  ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.”

 

* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai