Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान


नवी दिल्‍ली, 9 जुलै 2024

भारत-रशिया संबंध बळकट करण्यासाठीच्या  योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रेमलिनमधील सेंट अँड्र्यू हॉलमध्ये एका विशेष समारंभात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार “द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल” प्रदान केला. 2019 मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.

हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी तो भारतातील नागरिकांना तसेच भारत आणि रशिया यांच्यातील मित्रत्वाच्या  पारंपरिक बंधांना  समर्पित केला. हा बहुमान उभय देशांमधील खास आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी अधोरेखित करतो असेही त्यांनी नमूद केले.

या पुरस्काराची सुरुवात 300 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय नेते आहेत.

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai