Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोकसभा अध्यक्षांनी आणीबाणीचा निषेध केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा


नवी दिल्‍ली, 26 जून 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभा अध्यक्षांची, आणीबाणीचा आणि त्यानंतरच्या अतिरेकाचा तीव्र निषेध केल्याबद्दल प्रशंसा केली.

पंतप्रधान मोदी यांनी X या समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

“मला आनंद आहे की माननीय सभापतींनी आणीबाणीचा तीव्र निषेध केला, त्या काळात झालेल्या अतिरेकावर प्रकाश टाकला आणि ज्या पद्धतीने लोकशाहीची गळचेपी झाली, त्याचाही उल्लेख केला. त्या दिवसात ज्यांनी यातना भोगल्या त्या सर्वांच्या सन्मानार्थ शांतपणे उभे राहणे, ही देखील एक अनोखी कृती होती.

आणीबाणी 50 वर्षांपूर्वी लादली गेली होती पण आजच्या तरुणांना त्याची माहिती असणे गरजेचे आहे, कारण राज्यघटना पायदळी तुडवली जाते, जनमत दडपले जाते आणि संस्था उद्ध्वस्त होतात तेव्हा काय होते याचे ते एक समर्पक उदाहरण आहे. आणीबाणीच्या काळातील घडामोडींनी हुकूमशाही कशी असते, हे दाखवून दिले.” 

 

* * *

S.Patil/R Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai