Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय न्यायवैद्यक पायाभूत सुविधा संवर्धन या केंद्र पुरस्कृत योजनेला (NFIES) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्ली, 19 जून 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 2024-25 ते 2028-29 या काळासाठी 2254.43 कोटी रुपये खर्चाच्या ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक पायाभूत सुविधा संवर्धन योजना (NFIES)  या केंद्र पुरस्कृत   योजनेला मंजुरी दिली. गृहमंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता.

गृहमंत्रालय स्वतःच्या अर्थसंकल्पात केंद्रसरकारच्या या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करेल. 

मंत्रिमंडळाने या योजनेअंतर्गत पुढील तरतुदींना मान्यता दिली:

  1. देशात राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या (NFSU) च्या कॅम्पसची (परिसर) स्थापना.
  2. देशात केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांची उभारणी.
  3. दिल्ली मधील सध्याच्या NFSU च्या कॅम्पसमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा.

पुराव्यांच्या वैज्ञानिक आणि वेळेवरील न्यायवैद्यक तपासणीवर आधारित प्रभावी आणि कार्यक्षम फौजदारी न्याय प्रणाली स्थापन करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

ही योजना कार्यक्षम फौजदारी न्याय प्रक्रियेसाठी पुराव्यांचे वेळेवर आणि वैज्ञानिक पद्धतीने परिक्षण करण्यासाठी उच्च दर्जा, प्रशिक्षित न्यायवैद्यक व्यावसायिकांचे महत्व अधोरेखित करते. यासाठी तंत्रज्ञानातील प्रगतीचा लाभ घेणे आणि गुन्ह्यांच्या प्रकटीकरण आणि पद्धती विकसित करणे आवश्यक आहे.

7 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेचा समावेश असलेल्या गुन्ह्यांसाठी न्यायवैद्यक तपासणी अनिवार्य करणाऱ्या नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे, न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांच्या कामात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. तसेच, देशातील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांमध्ये (FSL) प्रशिक्षित न्यायवैद्यक मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, राष्ट्रीय न्यायवैद्यक पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय गुंतवणूक आणि वाढ करणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (NFSU) आणि नवीन केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांच्या (CFSLs) च्या अतिरिक्त ऑफ-कॅम्पसची स्थापना, प्रशिक्षित न्यायवैद्यकीय मनुष्यबळाची कमतरता दूर करेल आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळांमधील केसचा भार/विलंब कमी करेल. 90% पेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये आरोप सिद्ध करण्याच्या केंद्र  सरकारच्या उद्दिष्टाशी ते सुसंगत असेल.    

Jaydevi PS/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai