Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ


नवी दिल्‍ली, 5 जून 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेचा आज प्रारंभ  केला.  पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमध्ये पिंपळाचे झाड लावले. आपल्या पृथ्वीला अधिक उत्तम करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना यावेळी केले. गेल्या दशकात, भारताने अनेक असे सामूहिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे  संपूर्ण देशभरातील वनक्षेत्र वाढले आहे, असे  त्यांनी यावेळी सांगितले.  हे आपल्या शाश्वत विकासाच्या दिशेने होत असलेल्या  प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे, असेही त्यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी  आपल्या X  पोस्टवर लिहिले आहे;

“आज, जागतिक पर्यावरण दिवस, यानिमित्ताने #एक_पेड़_माँ_के_नाम ही मोहीम सुरू करताना मला आनंद होत आहे. मी भारतातील आणि जगभरातील प्रत्येकाला आवाहन करतो की, तुमच्या आईसोबत किंवा आईला अभिवादन म्हणून  म्हणून येत्या काळात एक झाड लावा.  ही तुमच्याकडून आईसाठी अनमोल भेट ठरेल.  यासंबधीची छायाचित्रे  #Plant4Mother किंवा #एक_पेड़_माँ_के वापरून  शेअर करा.

”आज सकाळी, मी निसर्ग मातेचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत जीवनशैली निवडण्याच्या आपल्या  वचनबद्धतेनुसार एक झाड लावले. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, की आपण आपल्या पृथ्वीला  अधिक उत्कृष्ट बनवण्यासाठी आपणही योगदान द्यावे.  #Plant4Mother #एक_पेड़_माँ_के_नाम”

“आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब म्हणजे  गेल्या दशकात, भारताने अनेक सामूहिक प्रयत्न केले.  त्यामुळे देशभरात वनक्षेत्रात वाढ झाली आहे.  शाश्वत विकासाच्या दिशेने होत असलेल्या आपल्या  प्रयत्नांचे  हे उत्तम उदाहरण आहे. स्थानिक समुदायांनी यासाठी घेतलेला पुढाकार  कौतुकास्पद आहे. ”

 

* * *

S.Kakade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai