नवी दिल्ली, 5 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील संगारेड्डी येथे 6,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, विमान वाहतूक आणि नैसर्गिक वायू यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.
तेलंगणाच्या विकासासाठी केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे असे ते यावेळी म्हणाले. आज त्यांच्या तेलंगणा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. त्यांनी काल आदिलाबाद येथून ऊर्जा, हवामान आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सुमारे 56,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केल्याची आठवण करुन दिली आणि आजच्या कार्यक्रमांत सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण आणि पायाभरणी केली जात आहे. यात महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग आणि पेट्रोलियम क्षेत्रांचा समावेश आहे.
“राज्यांच्या विकासाच्या माध्यमातून राष्ट्र विकासाच्या मंत्रावर माझा विश्वास आहे”, असे सरकारच्या कार्यप्रणालीविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले. त्याच भावनेने तेलंगणाची सेवा करण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगून आजच्या विकासकामांसाठी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
हैदराबादमधील बेगमपेट विमानतळावर नागरी विमान वाहतूक संशोधन संस्था (सी ए आर ओ) केंद्राचे उद्घाटन, विमान वाहतूक क्षेत्रात तेलंगणासाठी मोठी भेट असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हे केंद्र अशा प्रकारचे पहिलेच असून ते तेलंगणाला या क्षेत्रात नवीन ओळख देईल. यामुळे देशातील विमान वाहतूक क्षेत्रातील स्टार्टअप्सना संशोधन आणि विकासाचे व्यासपीठ मिळेल, असेही पंतप्रधान म्हणाले.
विकसित भारताच्या संकल्पात आधुनिक पायाभूत सुविधांच्या केंद्रस्थानावर भर देत, यंदाच्या अर्थसंकल्पात 11 लाख कोटी रुपयांच्या तरतूदीचा पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला. तेलंगणाला याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असून, राष्ट्रीय महामार्ग 161 च्या कांडी ते रामसनपल्ले विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग-167 च्या मिर्यालागुडा ते कोडाड विभागामुळे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दरम्यान वाहतूक सुविधा अधिक चांगली होईल असे पंतप्रधान म्हणाले.
“तेलंगणा हे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते” आणि जलद गतीने होत असलेल्या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरणासह राज्यातील रेल्वे संपर्क व्यवस्था तसेच सेवा सुधारण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदींनी आज सहा नवीन स्थानकांच्या इमारतींसह सनथनगर-मौला अली मार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचा उल्लेख केला.
घाटकेसर – लिंगमपल्ली मार्गे मौला अली – सनथनगर येथून एमएमटीएस रेल्वे सेवेला आज पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. हैदराबाद आणि सिकंदराबाद प्रदेशातील अनेक भाग आता प्रवाशांसाठी सोयीस्कररीत्या जोडले जातील असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी आज इंडियन ऑइल पारादीप-हैदराबाद उत्पादन वाहिनीचे उद्घाटन केले. यामुळे पेट्रोलियम उत्पादने स्वस्त आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत मार्गाने वाहून नेले जातील, असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे विकसित तेलंगणाच्या माध्यमातून विकसित भारताला चालना मिळेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सुंदरराजन आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये एनएच-161 च्या कांडी ते रामसनपल्ले या 40 किमी लांबीच्या चौपदरीकरणाचा समावेश आहे. हा प्रकल्प इंदूर – हैदराबाद इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक भाग आहे आणि हा प्रकल्प तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान अखंडित प्रवासी सेवा आणि मालवाहतूक सुलभ करेल. या विभागामुळे हैदराबाद आणि नांदेड दरम्यानचा प्रवासाचा वेळही जवळपास ३ तासांनी कमी होईल. पंतप्रधानांनी एनएच -167 च्या 47 किमी लांबीच्या मिर्यालागुडा ते कोडाड विभागाला पेव्हड शोल्डरसहित दोन लेनमध्ये सुधारित करण्याचे उद्घाटनही केले. यामुळे संपर्कात सुधारणा होईल तसेच या भागातील पर्यटनाला तसेच आर्थिक उलाढालीला आणि उद्योगांना चालना मिळेल.
पुढे, पंतप्रधानांनी एनएच -65 च्या पुणे-हैदराबाद विभागाच्या 29 किमी लांबीच्या सहा पदरी कामाची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे तेलंगणातील प्रमुख औद्योगिक केंद्रांनाही पतनचेरूजवळील पशाम्यलाराम औद्योगिक क्षेत्रासारखी संपर्कसेवा मिळेल.
सहा नवीन स्टेशन इमारतींसह सनथनगर – मौला अली रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. प्रकल्पाचा संपूर्ण २२ मार्ग किलोमीटर स्वयंचलित सिग्नलसह कार्यान्वित करण्यात आला आहे आणि एमएमटीएस (मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस) फेज – II या प्रकल्पाचा भाग म्हणून पूर्ण करण्यात आला आहे. त्याचाच आणखी एक भाग म्हणून, फिरोजगुडा, सुचित्रा सेंटर, भूदेवी नगर, अम्मुगुडा, नेरेडमेट आणि मौला अली हाऊसिंग बोर्ड स्टेशनवर सहा नवीन स्टेशन इमारती उभ्या राहिल्या आहेत. दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामामुळे या विभागात प्रथमच प्रवासी गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे इतर अत्यंत व्यस्त असणाऱ्या विभागांवरील भार कमी करून या प्रदेशातील गाड्यांची वक्तशीरपणा आणि एकूण गती सुधारण्यास मदत करेल.
घाटकेसर-लिंगमपल्ली मार्गे मौला अली-सनथनगर या एमएमटीएस रेल्वे सेवेला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे सेवा हैदराबाद – सिकंदराबाद या एकमेकांना जोडलेल्या शहरांमधील लोकप्रिय उपनगरीय रेल्वे सेवेचा विस्तार पहिल्यांदाच नवीन भागात करते आहे. हे शहराच्या पूर्व भागातील चेर्लापल्ली आणि मौला अली यांसारख्या नवीन क्षेत्रांना एकमेकांना जोडलेल्या शहरी भागाच्या पश्चिम भागाशी जोडते. पूर्वेला जोडणारे सुरक्षित, जलद आणि किफायतशीर मार्गांमुळे या जुळ्या शहरांच्या प्रदेशाच्या पश्चिमेकडील भागाला जोडणे प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
त्यानंतर, पंतप्रधानांनी इंडियन ऑइल पारादीप-हैदराबाद उत्पादन पाइपलाइनचे उद्घाटन केले. 4.5 एमएमटीपीए क्षमतेची 1212 किमी उत्पादन पाइपलाइन ओडिशा (329 किमी), आंध्र प्रदेश (723 किमी) आणि तेलंगणा (160 किमी) या राज्यांमधून जाते. पाइपलाइन पारादीप रिफायनरीपासून विशाखापट्टणम, अच्युतापुरम, आंध्र प्रदेशातील विजयवाडा आणि तेलंगणामधील हैदराबाद जवळ मलकापूर येथील वितरण केंद्रांपर्यंत पेट्रोलियम उत्पादनांची सुरक्षित आणि किफायतशीर वाहतूक सुनिश्चित करेल.
पंतप्रधानांनी हैदराबादमध्ये नागरी विमान वाहतूक संशोधन संस्था (सीएआरओ) केंद्राचे उद्घाटन केले. नागरी उड्डाण क्षेत्रातील संशोधन आणि विकासात्मक कार्यांमध्ये (आरएनडी) सुधारणा करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हैदराबाद येथे बेगमपेठ विमानतळाची स्थापना केली आहे. याद्वारे स्वदेशी आणि नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करण्यासाठी देशांतर्गत आणि सहयोगी संशोधनाद्वारे विमानचालन समुदायासाठी जागतिक संशोधन मंच प्रदान करण्याची कल्पना आहे. 350 कोटींहून अधिक खर्च करून बांधलेली ही अत्याधुनिक सुविधा 5-स्टार-ग्रिहा मानांकन आणि एनर्जी कन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड (इसीबीसी) नियमांचे पालन करते. भविष्यातील संशोधन आणि विकास उपक्रमांना समर्थन देण्यासाठी सीएआरओ सर्वसमावेशक प्रयोगशाळा क्षमतांचा वापर करेल. हे ऑपरेशनल विश्लेषण आणि कार्यप्रदर्शन मापनासाठी डेटा विश्लेषण क्षमतांचा देखील लाभ घेईल. सीएआरओ मधील प्राथमिक आरएनडी कार्यांमध्ये हवाई क्षेत्र आणि विमानतळ संबंधित सुरक्षा, क्षमता आणि कार्यक्षमता सुधारणा कार्यक्रम, प्रमुख हवाई क्षेत्र आव्हाने, विमानतळ पायाभूत सुविधांच्या प्रमुख आव्हानांचा शोध घेणे आणि भविष्यातील हवाई क्षेत्र आणि विमानतळ गरजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात तंत्रज्ञान आणि उत्पादने विकसित करणे यांचा समावेश असेल.
Addressing a programme at the launch of development works in Sangareddy, Telangana.https://t.co/NTXrp0hh1a
— Narendra Modi (@narendramodi) March 5, 2024
हैदराबाद के बेगमपेट एयरपोर्ट पर Civil Aviation Research Organization यानी ‘कारो’ की स्थापना की गई है।
ये अपने तरह का देश का पहला एविएशन सेंटर होगा, जो ऐसे आधुनिक स्टैंडर्ड्स पर बना है: PM @narendramodi pic.twitter.com/tpLKioFiKp
— PMO India (@PMOIndia) March 5, 2024
आज 140 करोड़ देशवासी विकसित भारत के निर्माण के लिए संकल्पबद्ध हैं: PM @narendramodi pic.twitter.com/OGrzD3mz1s
— PMO India (@PMOIndia) March 5, 2024
* * *
NM/JPS/Vinayak/Gajendra/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Addressing a programme at the launch of development works in Sangareddy, Telangana.https://t.co/NTXrp0hh1a
— Narendra Modi (@narendramodi) March 5, 2024
हैदराबाद के बेगमपेट एयरपोर्ट पर Civil Aviation Research Organization यानी ‘कारो’ की स्थापना की गई है।
— PMO India (@PMOIndia) March 5, 2024
ये अपने तरह का देश का पहला एविएशन सेंटर होगा, जो ऐसे आधुनिक स्टैंडर्ड्स पर बना है: PM @narendramodi pic.twitter.com/tpLKioFiKp
आज 140 करोड़ देशवासी विकसित भारत के निर्माण के लिए संकल्पबद्ध हैं: PM @narendramodi pic.twitter.com/OGrzD3mz1s
— PMO India (@PMOIndia) March 5, 2024