नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांची भेट घेतली. हा त्यांचा कतार दौऱ्यातील पहिला कार्यक्रम होता.
दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, अर्थ आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या विस्तारावर विचारांची देवाणघेवाण केली. पश्चिम आशियामधील अलीकडच्या काळातील घडामोडींवर देखील त्यांनी चर्चा केली आणि या भागात आणि त्या पलीकडे शांतता आणि स्थैर्य टिकवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
त्यानंतर पंतप्रधान कतारमध्ये त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या मेजवानी समारंभात सहभागी झाले.
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Had a wonderful meeting with PM @MBA_AlThani_. Our discussions revolved around ways to boost India-Qatar friendship. pic.twitter.com/5PMlbr8nBQ
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2024