नवी दिल्ली , 5 फेब्रुवारी 2024
‘सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत’ श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल उस्ताद झाकीर हुसेन, राकेश चौरसिया, शंकर महादेवन, सेल्वागणेश व्ही आणि गणेश राजगोपालन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
त्यांच्या ‘शक्ती’ या फ्युजन म्युझिक ग्रुपने ‘धिस मोमेंट’साठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे.
त्यांची अनोखी प्रतिभा आणि संगीत क्षेत्रातील समर्पणाने जगभरातील मने जिंकली आहेत आणि याचा भारताला अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
झाकीर हुसेन, राकेश चौरसिया, शंकर महादेवन, सेल्वागणेश व्ही आणि गणेश राजगोपालन यांचे ग्रॅमी पुरस्कारांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल अभिनंदन! तुमची अनोखी प्रतिभा आणि संगीत क्षेत्रातल्या समर्पणाने जगभरातील मने जिंकली आहेत.
याचा भारताला अभिमान आहे! ही कामगिरी तुम्ही करत असलेल्या मेहनतीची साक्ष आहे. यामुळे नवीन पिढीच्या कलाकारांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि संगीतात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल.
Congratulations @ZakirHtabla, @Rakeshflute, @Shankar_Live, @kanjeeraselva, and @violinganesh on your phenomenal success at the #GRAMMYs! Your exceptional talent and dedication to music have won hearts worldwide. India is proud! These achievements are a testament to the hardwork…
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2024
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai