नवी दिल्ली , 1 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यास आणि मान्यता देण्यास मंजुरी दिली.
या करारामुळे गुंतवणूकदारांचा, विशेषत: मोठ्या गुंतवणुकदारांचा आत्मविश्वास वाढेल अशी अपेक्षा आहे, परिणामी परदेशी गुंतवणूक आणि थेट परदेशी गुंतवणूक संधींमध्ये वाढ होईल आणि याचा रोजगार निर्मितीवर सकारात्मक प्रभाव पडू शकेल.
या मंजुरीमुळे भारतातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता असून देशांतर्गत निर्मितीला प्रोत्साहन मिळेल, आयातीवरील अवलंबित्व कमी होईल , निर्यात वाढेल आणि परिणामी आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल.
H.Raut/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai