Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे पंतप्रधानांनी केले स्वागत

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे पंतप्रधानांनी केले स्वागत


नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे स्वागत केले.

उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मॅक्रॉ सहभागी होणार आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

“माझे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ, भारतात आपले सहर्ष स्वागत आहे.

मला आनंद आहे की राष्ट्रपती मॅक्रॉ यांनी आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात राजस्थानमधील जयपूर येथून केली. जयपूर ही  समृद्ध संस्कृती, वारसा आणि प्रतिभावान लोकांची भूमी आहे.  उद्या, 26 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.  त्यांची उपस्थिती केवळ दोन राष्ट्रांमधील संबंध मजबूत करत नाही तर आपली सामायिक मैत्री आणि सहकार्याच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण अध्याय देखील जोडते.”

* * *

R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai