नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2023
प्रसारण, बातम्यांची देवाणघेवाण आणि दृक-श्राव्य कार्यक्रम या क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्याची तसेच भारताशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध लक्षणीयरीत्या वाढवण्याची अफाट क्षमता आहे अशा सामंजस्य करार/कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली. या करारांवर 7 नोव्हेंबर 2023 रोजी स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यामुळे प्रसार भारतीने विविध देशांशी केलेल्या सामंजस्य करारांची एकूण संख्या 46 वर पोहोचली आहे.
प्रसार भारती, राष्ट्र उभारणीत खूप महत्वाची भूमिका बजावते. देशात आणि परदेशात संबंधित प्रत्येकाला अर्थपूर्ण आणि अचूक आशय प्रदान करण्यावरही ती सतत लक्ष केंद्रित करते. इतर देशांमध्ये आशयसाहित्याचे वितरण करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय प्रसारण संस्थासोबत भागीदारी विकसित करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञानाची दाखल घेण्याकरिता नवीन धोरणे शोधण्यासाठी हे सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
संस्कृती, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, बातम्या आणि इतर क्षेत्रांतील कार्यक्रमांची देवाणघेवाण हे या सामंजस्य करारांमुळे होणारे प्रमुख फायदे आहेत.
भारताची सार्वजनिक सेवा प्रसारण संस्था, प्रसार भारतीने आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात सार्वजनिक प्रसारणातील सहकार्याला चालना देण्यासाठी मलेशियातील सार्वजनिक सेवा प्रसारण संस्था रेडिओ टेलिव्हिजन मलेशियाशी सामंजस्य करार केला आहे.
N.Chitale/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai