Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 11 डिसेंबर रोजी ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’  उपक्रमाची सुरुवात करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 :30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत @2047 : युवकांचा आवाजया उपक्रमाचा प्रारंभ करणार आहेत. यावेळी विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापक यांच्यासाठी देशभरातल्या राजभवनांमध्ये आयोजित केलेल्या कार्यशाळांनाही पंतप्रधान संबोधित करणार असून ही या उपक्रमाची प्रतिकात्मक सुरुवात असेल.

देशाच्या  राष्ट्रीय योजना, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टांच्या निर्मितीत युवकांचा सक्रिय सहभाग असावा हा पंतप्रधानांचा दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनाला अनुरूप  विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’  उपक्रम देशातल्या युवकांना विकसित भारत @2047 च्या पूर्ततेसाठी  आपल्या कल्पनांचं योगदान देण्यासाठी एक मंच प्रदान करेल. विकसित भारत @2047 साठी आपल्या कल्पना आणि सूचना सामायिक करण्याच्या प्रक्रियेत युवकांना सामावून घेण्यासाठी ही कार्यशाळा हे एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.

देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला शंभर वर्ष पूर्ण होतानाच म्हणजे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे हे  विकसित भारत @2047 चे लक्ष्य आहे. या दृष्टिकोनात  विकासाच्या विविध पैलूंसह आर्थिक वृद्धी, सामाजिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशासनासह इतर बाबी यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

***

S.Kane/S.Naik/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai