पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यासमवेत 1 डिसेंबर 2023 रोजी दुबई येथे कॉप-28 मध्ये ‘ग्रीन क्रेडिट प्रोग्राम‘ (हरित कर्ज कार्यक्रम) या उच्चस्तरीय कार्यक्रमाचे सह-आयोजन केले. या कार्यक्रमात स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन, मोझांबिकचे अध्यक्ष फिलिप न्युसी आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल सहभागी झाले.
पंतप्रधानांनी सर्व देशांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.
ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्हची (हरित कर्ज उपक्रम) संकल्पना हवामान बदलाच्या आव्हानाला प्रभावी प्रतिसाद म्हणून प्रो-प्लॅनेट (ग्रह-अनुकूल) कृतींना ऐच्छिक प्रोत्साहन देण्यासाठी एक यंत्रणा म्हणून मांडण्यात आली आहे. नैसर्गिक परिसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि पुनर्निर्माण करण्यासाठी, कचरा/निकृष्ट जमिनी आणि नदीच्या पाणलोट क्षेत्रावरील वृक्षारोपणासाठी ग्रीन क्रेडिट्स अशी ही संकल्पना आहे.
कार्यक्रमादरम्यान पर्यावरणाला अनुकूल कृतींना प्रोत्साहन देणारी धोरणे आणि सर्वोत्तम पद्धतींचे भांडार म्हणून काम करणाऱ्या एका एक वेब प्लॅटफॉर्मचा (व्यासपीठ) देखील शुभारंभ करण्यात आला (https://ggci-world.in/).
ग्रीन क्रेडिट सारख्या कार्यक्रम/यंत्रणांद्वारे पर्यावरण अनुकूल कृतींचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी ज्ञान, अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करून. जागतिक सहयोग, सहकार्य आणि भागीदारी सुलभ करणे हे या जागतिक उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
I am always very happy to meet my brother HH Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan. Today’s meeting during #COP28 has been very productive. Thanked him for the warm hospitality. Also discussed various issues aimed at deepening India-UAE friendship and making our planet more… pic.twitter.com/PmM3188lEx
— Narendra Modi (@narendramodi) December 1, 2023
يسعدني دائماً أن ألتقي بأخي صاحب السمو الشيخ محمد بن زايد آل نهيان. كان اجتماع اليوم خلال #COP28 مثمرًا للغاية. وشكرته على كرم الضيافة. كما ناقشا مختلف القضايا التي تهدف إلى تعميق الصداقة بين الهند والإمارات العربية المتحدة وجعل كوكبنا أكثر استدامة.@MohamedBinZayed pic.twitter.com/EVGS141MBk
— Narendra Modi (@narendramodi) December 1, 2023