नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2023
महामहिम,
माननीय महोदय,
आपण मांडलेल्या मौल्यवान विचारांची मी पुन्हा एकदा प्रशंसा करतो. तुम्ही ज्या मोकळ्या मनाने आपले मत व्यक्त केले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.
नवी दिल्ली घोषणापत्रात आपण अनेक क्षेत्रांमधील वचनबद्धतेला मान्यता दिली होती.
आज आपण पुन्हा एकदा त्या वचनबद्धतेला पुढे नेण्याचा संकल्प केला आहे.
आपण विकासाच्या उद्दिष्टा व्यतिरिक्त, जागतिक परिस्थिती आणि त्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांवरही विचारांची देवाण घेवाण केली होती.
पश्चिम आशियातील गंभीर परिस्थितीवर आपल्या सर्वांची मते ऐकल्यानंतर मी म्हणू शकतो की G-20 मध्ये अनेक मुद्द्यांवर एकमत आहे.
सर्वप्रथम, आपण सर्वजण दहशतवाद आणि हिंसेची कठोर निंदा करतो.
दहशतवादाबाबत आपले शून्य सहिष्णुतेचे धोरण आहे.
दुसरे म्हणजे, निष्पाप लोकांचे, विशेषत: लहान मुले आणि महिलांचे मृत्यू कदापी स्वीकारार्ह नाहीत.
तिसरे, मानवतावादी सहाय्य लवकरात लवकर, प्रभावीपणे आणि सुरक्षितपणे पोहोचवले जावे.
चौथे, मानवतावादी युद्ध विरामावरील सहमती आणि ओलिसांच्या सुटकेच्या वृत्ताचे स्वागत आहे.
पाचवे, इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या समस्येवर द्विराष्ट्रवादाच्या उपायाद्वारे कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे.
सहावे, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे.
आणि सातवे, मुत्सद्देगिरी आणि संवाद हा भू-राजकीय तणाव सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे.
जी –20 यामध्ये शक्य ते सर्व सहकार्य देण्यास तयार आहे.
महोदय
महामहिम,
मी पुन्हा एकदा माझे प्रिय मित्र, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांना जी –20 च्या अध्यक्षपदासाठी शुभेच्छा देतो.
मला विश्वास आहे की ,ब्राझीलच्या नेतृत्वाखाली आपण मानवकेंद्रित दृष्टीकोनातून पुढे वाटचाल करत राहू
वसुधैव कुटुंबकम्च्या भावनेने, आपण एकत्र येऊ आणि जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा मार्ग प्रशस्त करू.
ग्लोबल साउथच्या अपेक्षांसाठी काम करत राहू.
आपण अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देऊ.
आपण निश्चितपणे बहुस्तरीय विकास बँका आणि जागतिक प्रशासन सुधारण्याच्या दिशेने वाटचाल करू.
हवामानासंबंधी कृतीसह, आपण न्याय्य, सुलभ आणि परवडणाऱ्या दरात हवामान वित्तपुरवठा देखील सुनिश्चित करू.
कर्ज पुनर्गठनासाठी पारदर्शक पध्दतीने पावले उचलली जातील.
महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, कुशल स्थलांतराचे मार्ग, मध्यम आणि लघु उद्योगांचा विकास यावर भर,
ट्रोइकाचे सदस्य म्हणून, मी आपल्या सामायिक वचनबद्धतेला पुढे नेण्यासाठी आपल्या निर्धाराचा पुनरुच्चार करतो.
मी ब्राझीलला जी –20 अध्यक्षपदाच्या यशासाठी भारताच्या पूर्ण पाठिंब्याची ग्वाही देतो.
पुन्हा एकदा, भारताच्या जी –20 अध्यक्षपदाच्या यशात तुमच्या सहकार्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.
तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद !
GC/SB/R.Agashe/S.Chavan/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Sharing my concluding remarks at the @g20org Virtual Summit. https://t.co/OegU6xYRNg
— Narendra Modi (@narendramodi) November 22, 2023