Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी केली चर्चा


नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डनचे  राजे अब्दुल्ला द्वितीय  यांच्याशी  चर्चा केली आणि त्यांनी पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींवर विचार विनिमय केला. मोदी यांनी यावेळी दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली आणि सुरक्षा आणि मानवी हितासंबंधी निर्माण झालेली  संघर्षमय परिस्थिती  लवकर निवळण्यासाठी  एकत्रित प्रयत्नांच्या गरजेवर गरजेवर भर दिला.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“जॉर्डनचे  राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी चर्चा केली. पश्चिम आशिया क्षेत्रातील घडामोडींवर विचार विनिमय केला. आम्ही दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली . सुरक्षा आणि मानवी हितासंबंधी निर्माण झालेली संघर्षमय परिस्थिती  लवकर निवळण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे.”

 

* * *

G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai