नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना महागाई भत्ता (DA) आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाईवरील सवलतीचा हप्ता (DR) वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. 01.07.2023 पासून झालेल्या महागाईची भरपाई करण्यासाठी, सध्याच्या मूळ वेतनाच्या/निवृत्तीवेतनातच्या 42 टक्क्यात आणखी 4% वाढ झाली आहे. ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारीत स्वीकृत सूत्रानुसार केलेली आहे.
महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्हींमुळे सरकारी तिजोरीवर एकत्रित 12,857 कोटी रुपये प्रतिवर्ष इतका भार वाढेल.याचा लाभ सुमारे 48.67 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.
* * *
R.Aghor/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai