पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 4:30 वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये ही केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांमध्ये विविध क्षेत्रांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक केंद्रामध्ये सुमारे 100 युवकांना किमान दोन व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण पॅनल वर असलेल्या औद्योगिक भागीदारांद्वारे आणि राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या विविध संस्थांमार्फत दिले जाईल. या केंद्रांच्या स्थापनेमुळे या क्षेत्रात अधिक सक्षम आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी लक्षणीय प्रगती साधण्यात मदत होईल.
****
Sonal T/ Bhakti S/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai