Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक


नवी दिल्‍ली, 13 ऑक्‍टोबर 2023

पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांनी आज पंतप्रधान कार्यालयामध्ये दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर कृती दलाची उच्च स्तरीय बैठक घेतली. हिवाळ्याचे दिवस  जवळ येत असून, दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषणाची समस्या हाताळण्यासाठी विविध भागधारकांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीदरम्यान प्रधान सचिवांनी वायू प्रदूषणाच्या विविध स्रोतांचा प्रभाव कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. यामध्ये औद्योगिक प्रदूषण, वाहन प्रदूषण, बांधकाम आणि पाडकाम यामधून निर्माण होणारी धूळ, रस्त्यांवरील धूळ, घन कचरा आणि जैव कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर, शेतामधील भुसा जाळणे यासह इतर  वायू प्रदूषणाच्या स्त्रोतांचा समावेश होता. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हिरवळ आणि वृक्षारोपण यासारख्या उपक्रमांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेची (जीआरएपी) अंमलबजावणी, त्याचे निरीक्षण आणि क्षेत्रीय स्तरावर त्याची अंमलबजावणी सुधारण्यासाठी केलेल्या उपायांवरही चर्चा केली. ते म्हणाले की, हवेची गुणवत्ता खराब होऊ नये यासाठी सर्व संबंधितांनी जीआरएपी मध्ये सूचीबद्ध केलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये धान शेतामधील भुसा जाळण्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी तीन राज्यांच्या मुख्य सचिवांना या समस्येचे बारकाईने निरीक्षण करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीला भारत सरकारच्या सचिवांसह सर्व प्रमुख भागीदार उपस्थित होते.

* * *

R.Aghor/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai