नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2023
आदरणीय अध्यक्ष महोदय,
मला बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल आणि मला वेळ दिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
मी आपला फक्त 2-4 मिनिटे वेळ घेणार आहे. भारताच्या संसदीय प्रवासातील कालचा दिवस हा सुवर्ण क्षण होता. आणि या सभागृहातील सर्व सदस्य, सर्वपक्षीय सदस्य, सर्वपक्षीय नेते त्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार ठरले. सभागृहात असो वा सभागृहाबाहेर, ते समान अधिकारी आहेत. आणि म्हणूनच आज मी तुमच्या माध्यमातून हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत आहे आणि देशाच्या मातृशक्तीमध्ये एका नव्या ऊर्जेचा संचार करत आहे, कालचा हा निर्णय आणि आज राज्यसभेतील प्रक्रियेनंतर जेव्हा आपण शेवटचा टप्पा पूर्ण करू तेव्हा देशाच्या मातृशक्तीच्या भावना बदललेल्या असतील. मला वाटते की यामुळे निर्माण होणारा विश्वास एक कल्पनातीत , अद्वितीय शक्ती म्हणून उदयास येईल आणि देशाला नवीन उंचीवर नेईल. आणि हे पवित्र कार्य पार पाडण्यासाठी तुम्ही सर्वांनी जे योगदान आणि पाठबळ दिले, अर्थपूर्ण चर्चा केली, त्याबद्दल सभागृह नेता या नात्याने मी आज तुम्हा सर्वांचे मनापासून आणि अगदी खऱ्या मनाने आदरपूर्वक अभिवादन करण्यासाठी येथे उभा आहे. मी तुमचे आभार मानायला उभा आहे.
नमस्कार.
R.Aghor/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai